Monday, December 10, 2018

विषवृक्ष


Dayanesh more-9623480172
आज आपण सामना करत आहोत एका मोठ्या विषवृक्षचा त्याची वृक्षारोपण  कधी झाले हे मलाही सांगता येणार नाही पण त्याचे पालन पोषण किमान 27वर्षांपूर्वी सुरु झाले होते.
हवा तसा वाट्टेल तसा आणि जमेल तसा वापर या वृक्षाचा होत राहिला आणि आजही होतो आहे 
पण आज तो उग्र झाला आहे त्याचा आवाका आपल्या आकलना बाहेर आहे आणि त्या वृक्षाच नाव आहे  "धर्म वृक्ष "
लोकशाही वर ठरवून मर्म भेदी आघात जेव्हा होतो तेव्हा तेथे लोकशाही ही नाममात्र असते मुळात आम्ही लोकशाहीचा आदर करणे फार वर्षांपूर्वी विसरून गेलो होतो आणि थाटात आम्ही "बाबरी पाडली होती "किंबहुना लोकशाही पाडली होती आणि अगदी गुर्मीत आणि वर आवाजाने आपला सहभाग दाखवला होता.
कोणत्याही हिंसाचार
रा विना जी शासन व्यवस्था चालत असते ती म्हणजे लोकशाही आम्ही तर नेहमीच "कत्लेआम "बघत असतो
किंवा आम्हाला ती सवय झाली आहे जसे जसे घोटाळे आणि आकडे वाढत गेले तशीच आमच्या येथे दंगलीतआणि धर्मकार्यमध्ये मारणारे वाढत गेले पार विभाजन ते गुजरात दंगल पण आम्ही नेहमी प्रमाणे चर्चा आणि enquirey commision ला महत्व दिले.
शासन ही अशी यंत्रणा असते जेथे धर्म आणि जात या भावनांवर  तुळशीपत्र ठेवलेले असते मग ते राजीव गांधी यांनी शिकविरोधी हिंसेत न केलेली कारवाई असो
मुस्लिम मतभोक्षाच्या भीतीने शाहबानो case मधील निर्णय असो,मंडळ आयोग स्थापना करून पेरलेले जातीवादाचे विष असो किंवा, 2002मधील गुजरात दंगल असेल किंवा काँग्रेस च्या राजवटीमध्ये बाबरी पडणाऱ्यावर न झालेली कारवाई असेल ह्या सर्व प्रकरणांमध्ये कुणाला क्षिशा झाली हे आपल्याला चांगलेच ठाऊक आहे आणि नेहमीप्रमाणे त्याला उत्तर देण्यात येते ही "लोकभावना "आहे असो
जेव्हा आपल्याकडे कुणावर अन्याय होतो,काही मोठा गुन्हा होतो  तेव्हा आपण त्याला धर्म,जात अल्पसंख्यांक, बहुसंख्य,आपला आणि परका याचे स्वरूप देत असतो आणि भावनेच्या लालसेच्या, अस्मितेच्या पोटी आपल्या संविधानाची पायमल्ली करत असतो.  तेव्हा आमचे संविधान धोक्यात येत नाही?
थोडक्यात काय तर आम्हाला बाहू करण्यात रस आहे.
या सर्व प्रकारच्या भेदभावा मध्ये आपली सामाजिक आणि राजकीय प्रगती खुंटली आहे त्यामध्ये जातीवाद हा अग्रगण्य आहे आज खूप वर्ष उलटून गेले तरी सुद्धा
Sc/st मधील लोक मन्हावे तसे प्रगत झाले का?फुकट अन्न आणि राशन प्राप्त करणारा आज पूर्णपणे गरिबीतून का बाहेर येऊ शकला नाही? त्याला आपलं आणि आपण निवडून दिलेले शासन आणि आपण स्वतः जबाबदार आहोत. आणि आमचे सर्व वाद, आंदोलने, संगर्ष यात्रा,मोर्चे आणि त्यावर केलेले उपाय
योजना हे सर्व मुख्य प्रवाह एका मुख्य प्रवाहा साठी करत आहेत म्हणजे आम्हाला हे जाणूनच नाही घ्याय ची इच्छाच नाही कि बाबा आपल्या देशामध्ये "आदिवासी "आहेत जे आजही 21 शतकात जगत नसून तो आजही आपल्यामध्ये सामावू शकलेला नाहीये
आम्ही फक्त आमच्या प्रश्नावर आम्ही मनाल तसे उपाय करा हाच जोर लावला आहे आणि जर तस नाही झालं तर मग काय काय धोक्यात येत हे वेगळं सांगण्याची गरज नाही असो
हद्द तेव्हा होते जेव्हा आजही आपण 20 वर्षांपूर्वीचा प्रश्न, वाद, घटना रस्ते, पाणी, वीज हे सर्व मुद्दे घेऊन निवडणूक लढवत असतो आणि आपण सुद्धा मूर्खपणें ते ऐकत असतो आणि आपले प्रथम कर्तव्य मानहून त्यानां निवडून देत असतो यातून एक गोष्ट सिद्ध होते ती म्हणजे आपल्या बापजाद्द्यनीं आपल्याला फक्त  जन्म देण्याचंच मोठं ऐतिहासिक कार्य पार पाडलं आणि हे सर्व प्रश्न आपल्या माथी मारले असो
आदर्श असावा पण आपल्या कडे आदर्शवाद, पुळका, आणि व्यक्ती केंद्रित राजकारण, निरर्थक लोकभावना या सर्व संकल्पना परंपरागत चालत आलेल्या आहेत आणि त्यांनी आपली कामे चोख बजावलेले आहेत म्हणजे आपली बरोबर वाट लावलेली आहे पण आजही आपण तेच करत राहिलो तर 2050 साली सुद्धा रस्ते पाणी, आबा, नाना, आणि जी येऊन आपल्याला आश्वासने देऊन निघून जातील.
आज आपल्याला आपल्या समस्या सोडवायच्या आहेत
आज आपण मूलभूत सुविधानपासून वंचित आहोत ना वीज ना पाणी ना शुद्ध हवा आपल्याला सर्व समावेशक सामाजिक आणि आर्थिक शास्वत विकासाची नितांत गरज आहे आज आपले तरुण एकदा विदेशात गेले कि परत भारतात येण्याचे नाव घेत नाहीयेत हे किती दुर्दैवी  आहे. आपला कोण कसा केव्हा आणि किती वापर करतोय हे आपल्याला समजून घेणे गरजेचे आहे आणि आपल्या विवेक बुद्धीने विचार करायचा आहे कारण वेळे नुसार आपल्या कडे, धर्म, जात, पंथ, गट आणि संविधान धोक्यात येत असते.
Dayanesh more-9764395505

1 comment:

  1. Agdi barobar aahe sir tumch...
    Aaple sagle prashn ajunahi vij, pani, raste, dhram, yatch gundale gele aahe...

    ReplyDelete

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...