Saturday, July 9, 2022

भाड्याचा आनंद आणि आनंदाचे भाडे

जर आपला हल्लीचा दिखाव्यातला आंनद घालवायचा नसेल तर लेख वाचू नका, ही विनंती करतो. मी सुद्धा त्यातलाच आहे पण कुठेतरी मनात खंत होती ती व्यक्त करावी असं वाटलं म्हणून हा प्रपंच.. आम्ही जेव्हा शाळेतल्या सहलीत जायचो तेव्हा अगदी निखळ आनंद असायचा, निवांत गप्पा, वाद आणि निसर्ग आपल्या डोळ्यात सामावून घ्यायचा, आणि तो असा सामावून घ्यायचा की चितेच्या बाजूला बसलेल्या माणसाला सांगेपर्यंत तो तेवढाच नवा आणि मनाचा ठाव घेणारा असावा..तेव्हा झाडांना आणि डोंगरांनाही दडपण नव्हतं की हजारोंचा लोंढा माझ्याकडे कूच करून येतोय, हजारो फोटोस आणि व्हिडिओस बनवून लोकांना माझ्याकडे बोलावतोय तसेंच माझी शांतता भंग करतोय.. काही दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी आपण फिरायला गेलो तिथची संपदा दाखवणे हा उद्देश लोकांचा किंवा हिंडफिर्या माणसाचा होता, आता आपली ऐपत, आपलं निसर्गप्रेम आणि दुःख दाखवण्यासाठी पर्यटन स्थळाचा वापर होयोय..जुने लोक आजही आयुष्यात जेमतेम फिरलेल्या ठिकाणची माहिती अगदी आपुलकीने आणि आत्मीयतेने सांगतात कारण त्यात खरा आणि चिरकाळ टिकलेला आनंद असतो  चार सुखाचे क्षण असतात.. आणि आयुष्याचं रवंथ करण्यासाठी पुरेसे असतात.. गावाकडे एका माउलीला रामण्यासाठी, फिरण्यासाठी वाव नसते किंवा पर्याय नसतो तरीपण आहे त्याच्यामध्ये, मिळेल त्याच्यामध्ये ती जगण्याचा प्रयत्न करते.. काय खाल्लं, काय घातलं आणि कोणत्या ठिकाणी फिरायला गेलो हे आपल्यासाठी की दुसर्यासाठी?  आयुष्यात प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट झाला तर आयुष्यातला खरेपणा आणि रोज जगण्याचं आयुष्य मागे पडून जाईल.. प्रेम व्यक्त करण ही अगदी सहज आणि सोपी गोष्ट आहे , पण ते टिकवणं, गरजेच्या वेळी आपल्या घरचयनसोबत, आपल्या मित्रांसोबत राहणं हे अत्यंत आवश्यक आहे, मग तिथे तुम्ही सोशल मीडियावर असा किंवा नसा त्याने फरक पडत नाही.. आई, वडील , मित्र, नवरा बायको यांच्याप्रति असणार प्रेम हल्ली सर्रास सर्व ठिकाणी पाह्यला मिळत पण ते टिकत का ओ? जर समाज माध्यमनावर सगळीकडे प्रेमाचा झरा वाहतोय, तर मग समाजात विपरीत आणि किळसवाण्या गोष्टी का ऐकू येत आहेत? माणुसकी आणि प्रत्यक्ष चार लोकांना बोलणं आपण का टाळतोय? आपण आपल्या खोट्या प्रतिष्टेसाठी आणि दिलश्यासाठी तर प्रेम व्यक्त करत नाही आहोत ना? दिसण्यापेक्षा असणं महत्वाचं असतं पण हल्लीच्या फिल्टरच्या जमान्यात दिसणं महत्वचाह झाल्यामुळे प्रेम आणि कर्तव्य पण दिसण्यापूर्तीचं मर्यादित झाली आहेत का? 
आणि हेच आनंदी दिसणं, प्रतिष्टेसाठी झटन तुम्ही गावाकडे घेऊन जाताय निरागस आणि साध्या लोकांना पण हल्ली आनंदी
 असण्यापेक्षा  दिसण महत्वाचं झालं आहे.. जो पर्यंत हातात फोन नव्हता तोपर्यंत बोलण्यासाठी वेळ होता, आता सगळं मेसेज न होत, तेव्हा ना मित्राचं, ना घरच्यांचा ना माझ्या प्रिय आणि सगळ्यात जवळ असणाऱ्या निसर्गाचा मला फोटो टाकण्याची गरज नव्हती.. पण या फोटोचक्रात मी कसा अडकलो हे मलाच कळले नाही, ज्या व्यक्तींच्या किंवा ज्या निसर्गाच्या मी खूप जवळ आहे अशी भावना माझ्या डोक्यात असते मला विश्वास वाटतो, पण जेव्हा मी त्या व्यक्तीला फोनवर बोलायला जातो तेव्हा मात्र मला त्याला काय बोलावे हे सुचत नाही, जेवलास का/ जेवलीस का याच्यापुढे आमचं संभाषण जात नाही असं का होतंय? आमच्याकडे जे बोलण्यासाठी होत ते तरी आम्ही फोटोत घेत आहोत मग लोकांना चांगलं आणि आनंद देणार आम्ही नेमकं बोलणार तरी काय?

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...