Saturday, August 16, 2025

2024 विधानसभा निवडणूक निकालांचा थोडक्यात आढावा

 2024 विधानसभा निवडणुका या राज्यातील प्रादेशिक तसेच महत्वाच्या दोन्हीही राष्ट्रीय पक्षांसाठी एक निर्णायक संदेश देणार्‍या होत्या. निवडणुकीपूर्वी दोन्हीही गटांकडून बांधलेले राजकीय अंदाज सपशेल अपयशी ठरले. महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीही राजकीय स्पर्धकांचे निवडणूक निकालाचे अंदाज फोल ठरले याचे प्रमुख कारण होते लोकांची ऐनवेळी आलेले प्रतिक्रिया आणि आधुनिक प्रचारयंत्रणा. महायुतीने विजय जरी मिळवला असला तरी अभूतपूर्व बहुमत त्यांना अपेक्षित नव्हते. लोकसभेला महायुतीला जनतेने धक्का देऊन त्यांच्यातील आत्मविशावसाला वेसण घातली होती दुसर्‍या बाजूला महाविकास आघाडी मात्र बेफाम झाली. याचाच महायुतीने फायदा घेत महाविकास आघाडीला गफिल ठेवले तसेच सांविधानाचे कारण पुढे करून महाविकास आघाडीला सक्रिय राहू दिले नाही याचा परिणाम महाविकास आघाडी निष्क्रिय झाली.


तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची राज्यातील लोकप्रियता शिखरावर होती याचा पुरेपूर फायदा भाजप किंवा महायुतीने घेतला . शिंदेसारखा मुख्यमंत्री तसेच काम करण्याची पद्धत याआधी महाराष्ट्राच्या जनतेने क्वचितच बघितली असावी. गावोगावी फिरणारा मुख्यमंत्री, डोंगर दर्या चढणारा मुख्यमंत्री हा महाराष्ट्रासारख्या राज्याला नवखा होता. हे नावीन्य शिंदेंना फायद्याचे ठरले, शिंदेची लोकप्रियता महायुतीला फायद्याची ठरली. देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्षा बावङ्कुले यांनी संघटना आणि प्रचार यंत्रणा अत्यंत प्रभावीपणे राबवत महायुतीचा वरचष्मा ठेवला अनई अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर येऊ दिले नाही. 



दुसर्‍या बाजूला महाविकास आघाडी मात्र रोज पोखरल्या चालली होती, पोखरणारे होते महाविकास आघाडीचे नेतेच. जाहीरनामा, माध्यम व्यवस्थापण, संघटन, महाविकास आघाडीतील अंतर्गत समन्वय समितीचा असमन्वय या गोष्टी महाविकास आघाडीची पराभव हळू हळू लिहीत होत्या. ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित न करणे ही सुधा महाविकास आघाडीची एक मोठी चूक होती, त्याबरोबरच शरद पवारांची अपेक्षित सक्रियता नसणे हे सुद्धा महाविकास आघाडीला मारक ठरले. 



मोदींचा थोडाफार प्रभाव, योजनांचे लाभार्थी, सक्रिय संघटन या काही बाबी महायुतीला फायद्याच्या ठरल्या. दुसर्‍या बाजूला राहुल गांधींची महाराष्ट्रात लोकप्रियता वाढून सुद्धा कॉंग्रेसकडून त्यांना राज्यात पाचारण करण्यात आले नाही किंवा त्यांनी राज्याच्या निवडणुकीत रस घेतला नाही, वायनाडच्या लोकसभा पोटनिवडणुकीला कदाचित त्यांनी महत्व दिले असावे. महाविकास आघाडी आपला उत्तम जाहीरनामा लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकली नाही याउलट प्रादेशिक अस्मिता आणि उद्योगांचे पलायन हे महत्वाचे पण लोकमान्यता नसलेले मुद्दे निवडणुकीचे मुद्दे बनवणायचे काम महाविकास आघाडीने केले.


तिकीट वाटप हा कोणत्याही निवडणुकीतील अत्यंत निर्णायक मुद्दा असतो आणि याबाबतीत महायुती सरस ठरली राज्यातील बर्‍याच जागांवर अदलाबदली केली, उमेदवार बदलले, याचा फायदा महायुतीला झाला. दुसर्‍या बाजूला महाविकास आघाडीमध्ये अनावश्यक वाद तिकीटवाटपावरून बघायला मिळाले, नेमक्या आणि जिंकण्याची शक्यता या निकषांचा वापर न होता पक्षीय बलाबल समान करण्याचा अधिक प्रयत्न महाविकास आघाडीने केला जी की त्यांची राजकीय घोडचूक होती.

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...