Tuesday, April 27, 2021

प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व पणाला........(पार्श्वभूमी आणि भाग 1)

मोठेपणा आणि अविर्भावात सत्य आणि विवेकाचे अस्तित्व जसे फडफडणाऱ्या दिव्यासारखे असते,तसेच काही आज काही प्रादेशिक पक्षांचे झाले आहे आपल्या तथाकथित पक्षाचा महान इतिहास आणि संघर्ष,स्थानिक नेत्यांना खऱ्या आणि वास्तविक परिस्तितीची जाणीवच होऊ देत नाहीये..
पुतळे बांधून, आपल्या दिवंगत आणि हयात असलेल्या नेत्यांच्या नावांनी योजना चालू करून पक्ष बळावत नसतो तर फक्त जस्याश तसा राहतो किंबहुना परस्परावलंबी बनत असतो.
मुळात निवडणुका जरी आकड्यांचा आणि समीकरणांचा खेळ असला तरी राजकारण आणि लोकमान्यता ह्या गोष्टी समीकरणांवर तग धरू शकत नाहीत,त्याच उत्तम उदाहरणं म्हणजे मोदी आणि इंदिरा गांधी राजकारणाच्या खेळात यशस्वी झाले,आणि दुसऱ्या बाजूला मोरारजी देसाई,कामराज आणि शरद पवार हे भावी पंतप्रधान म्हणूनच राहिले,असंख्य तडजोडी,खोटारडेपणा आणि बरच काही.....काहीच कामी आलं नाही.
माणसाचे अस्तित्व त्याचे कर्म आणि आयुष्यातील सक्रियतेत असते,जिवंत असण्यात नाही तसेच प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व हे स्थानिक भावना आणि प्रश्नात असते,आकड्यात नाही.
काँग्रेस च्या काळात म्हणजे नेहरूनपासून ते अगदी राहुल गांधींपर्यंत कोणत्याही राज्याच्या स्थानिक अस्मिता बळकावण्याचा प्रयत्न हा कमी प्रमाणात झालेला दिसतो,दरबारी राजकारणाची प्रथा जी प्रचलित आहे ती अशी की,स्थानिक एखादा नेता जो लोकप्रिय आहे आणि बहुसंख्यनच्या गटातला आहे (मराठा,धनगर रेड्डी,शीख,जाट,मुस्लिम )त्याच्याकडे नेतृत्व सोपवलं जायचं आणि सर्व हक्क दिल्लीकडे अबाधित ठेवायचे,हे नेहरूंपेक्षा इंदिरा गांधींनी चांगल्या प्रकारे राबवलं.
काँग्रेस च्या विरोधात त्याकाळी जे लोक आणि पक्ष उभे राहत होते,काही पर्याय उभे राहत होते ते फक्त काही काँग्रेस विरोधांमुळेच उभे राहत होते असं मुळीच नव्हतं.
आपण वाचून आकलन करतो पण वास्तविक आणि तर्कशुद्ध आकलन करत नाही,त्यामुळे आपले अंदाज चुकतात.
आज खलिस्तानी अस्मितेवर उभे राहिलेले पक्ष कुठे आहेत?त्यांच्या विचारधारेचं काय झालं ?
आज द्राविडी अस्मितेवर उभे राहिलेले पक्ष कुठे आहेत ?त्यांना राजकीय तडजोडी का कराव्या लागल्या ?आंध्र अस्मिता आज का विभागली ?उत्तरपूर्वेकडील देश आज दिल्लीप्रती इतके संवेदनशील कसे झाले ?ज्या मराठी अस्मितेवर महाराष्ट्राची निर्मिती झाली,त्या विचारांची आणि अस्मितेची धडगत का झाली (उडाली)शेतकरी चळवळी,डाव्या चळवळी आणि इतर सामाजिक चळवळी आज गलितगात्र आणि हतबल का झाल्या?
भारतात भावनिक आणि मूर्तिपूजक लोक जास्त राहतात त्यामुळे संस्कृती ला विचारधारेसोबत जोडूनच लोकांना एकत्रित बांधता येऊ शकत हे सर्वात आधी कट्टर हिंदुत्ववादी आणि इस्लामिस्ट संघटनांनी हेरलं आणि त्याचेच हे परिणाम आहेत की,आज लोकांना संस्कृती आणि धर्मातला फरक कळत नाही.


Sunday, April 25, 2021

महाराष्ट्राची अस्तिरतेकडे वाटचाल भाग 1-भावनिक राष्ट्रवादाचा बळी महाराष्ट्र

विस्कटलेल्या कुटुंबाला हल्ली social मीडिया चा आधार घेऊन आपल्या स्थिरतेचा पुरावा द्यावा लागतो,जे की टिकण्यासाठी गरजेचं आहे.एक काळ असा होता जेव्हा दोन दिवसाच्या आठवणीं वर्षभर पुरून जायच्या,आणि ते ठीकही होत आज वेळ आणि काळ दोन्हीही बदलले आहेत.

संयुक्त कुटुंब पद्धत नाहीशी होत चाललीये भारताच्या मुळात रुजलेली आणि काळजात वसलेली संस्कृती फक्त एक इव्हेंट (event )बनून राहिलीये.सांगण्याचा उद्देश असा की कुटुंब आणि परिवार एकत्रित ठेवणे आज अवघड आहे,ज्याच्या त्याच्या स्वप्नांचा आणि इच्छेनचा परीघ वेगळा आणि मोठा आहे एक व्यक्ती म्हणून आज तो/ती  स्वतः चे अस्तित्व आणि काळासोबतची जीवघेणी स्पर्धा यात गुंतलेले आहेत,मग भारत देश फक्त भावनिकतेच्या आधारावर किती दिवस तग धरू शकतो ?

नरकाला स्वर्गाचे लेबल लावून नरकाचे उदात्तीकरण म्हणजे केवळ आणि केवळ कल्पनाविलास आणि मूर्खपणा आहे,भारत हा कधी हिंदुराष्ट्र होतो तर कधी धर्मनिरपेक्ष राष्ट्र,भावनिक राष्ट्रवाद ही एक सुंदर कल्पना आहे ती लोकांच्या,जनतेच्या मनात असायला हवी पण जेव्हा ती डोक्यात जाते आणि राष्ट्र एकात्मतेचे प्रतीक बनते तेव्हा मात्र त्या भावनिक राष्ट्रवादाचे भेदक रूप जनतेसमोर येणे अनिवार्य आहे.
1947 ला ठरलं की भाषावार प्रांतरचना होणार आणि सर्व संयुक्त राज्यांच्या मागण्या पूर्ण होणार,पण ते होण्यासाठी महाराष्ट्राला 13-15 वर्ष वाट पहावी लागली,जर ठरलंच होत तर एवढा वेळ का ?आणि बाकींच्या राज्यांना तुम्ही अधिकृत दर्जा दिलाच आहे तर महाराष्ट्राबद्दल असा भेदभाव का ?कदाचित महाराष्ट्र एकटवण्याची पहिली आणि शेवटची वेळ म्हणजे "संयुक्त महाराष्ट्र चळवळ "त्याखेरीज महाराष्ट्र कधीच एक झाला नाही आणि होणारही नाही.
मुंबई,कोकण आणि विदर्भ अश्या नैसर्गिक आणि आर्थिक दृष्ट्या मजबूत असणाऱ्या प्रदेशांवर आर्थिक आणि राजकीय प्रस्थ कोणाला नकोये ?अगदी तेच तेव्हाच्या दिल्लीतील सत्ताधाऱ्यांना सुद्धा हवं होत
समाजवाद आणि राष्र्टीय एकतेच्या नावाखाली जेवढी लूट दिल्लीने महाराष्ट्राची केलीये तेवढी कदाचित कुबेराची संपत्तीही नसेल.
सत्तेचे विकेंद्रीकरण ही संकल्पना फक्त राजकीय किंवा प्रशासकीय नाहीये तिचे मूळ सामाजिक आहे, कारण समाज जेव्हा स्थानिक आणि व्यावहारिक प्रश्न बाजूला ठेवून फक्त नेता आणि राष्ट्र म्हणून मतदान आणि नेत्यांना मान्यता देत असेल तर तेथेच तुमची लोकशाही संपलेली आहे आणि जे काही चालू ते थोतांड आहे.
यशवंत राव चव्हाण यांनी संयुक्त म.च च्या वेळी सांगितले होते की मी मुंबई (महाराष्ट्र )च्या आधी नेहरूंना निवडेल,आपली स्वामीनिष्ठा आणि उदारता दाखवण्यातच महाराष्ट्राचं बारस झालं ,आणि आता तेरस्याकडे वाटचाल चालूये,कला ,खाद्यसंस्कृती  ,वास्तुशिल्प साहित्य यांची निर्मिती आणि प्रसार हा महाराष्ट्रात अभावानेच दिसून येतो,आणि जेव्हा जेव्हा काहीतरी अद्वितीय आणि कालातीत महाराष्ट्रात झाले ते अर्धवट आणि मर्यादित होते.जसा माशीचा जीव हा पाण्यात असतो तसच एका प्रदेशाचा जीव हा तेथील वास्तुकला,शिल्पकला,खाद्यसंस्कृती आणि साहित्यात असतो,नुसतं मोडेल पण वाकणार नाही किंवा अवास्तव ताठरता ही लवचिक आणि परस्परावलंबी असते,ज्या प्रदेशात आपण जन्मलो तो फक्त एक जमिनीचा तुकडा नसतो तुमच्या आयुष्याला आकार देणार दुवा असतो,तेथील खानपान,विचारप्रक्रिया सत्तासंस्कृती आणि सामाजिक वातावरण यातून एक नवंसंस्कृतीचा उदय होत असतो आणि त्यातून तुमच्या मूलभूत किंवा जुन्या संस्कृतीशी तडजोड होत असते,आणि तीच तडजोड आपल्याला एक राज्य म्हणून एकत्रित बांधून ठेवत असते पण दुर्दैवाने ते महाराष्ट्रात होताना दिसत नाही.
ना भाषा ना साहित्य ना राज्याची सामाजिक जाण आणि त्यावर हे सगळं नसल्याचा अभिमान फक्त वयक्तिक तुम्हालाच पोखरत नाहीये तर एका राज्याचे हिंदुत्वाच्या नावाखाली,मराठीच्या नावाखाली आणि शाहू फुले आंबेडकरांच्या नावाखाली खीळ-खीळ झालेले खांब भुंगा होऊन अधिक पोखरत आहेत.
भाग 2



Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...