Tuesday, April 26, 2022

राष्ट्रवादी काँग्रेस च्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला का?


(पूर्वार्ध)..part1 (video-शिवाजी महाराज आणि जातीचे राजकारण https://youtu.be/HffNjJQ3wys)

महाराष्ट्र हा नेहमीचं एक मिश्र स्वरूपाचे राज्य राहिला आहे, जसा एखादा घरातील कर्ता माणूस पैसे कमावू शकतो, तसेच तो खर्चही करूही शकतो, तसंच महाराष्ट्राचं सुद्धा आहे. पेशवे आले की शाहू फुले आंबेडकर येतात, मग अण्णाभाऊ साठे येतात.. त्यामुळे सरासरी हे विधान गाह्य धरल्या जाऊ शकत नाही.. पण 2000 च्या नंतर मराठी अस्मिता संपायला सुरुवात झाली, आणि जातीय अस्मिता जागृत झाल्या.. तसेच काही अराजकीय संघटना जन्माला आल्याने ब्राह्मणद्वेष वाढायला लागला.. मग नंतर ब्राम्हण आणि ब्राम्हणवादी हा बुद्धिभेद करण्यात आला जो की एकदम पोकळ होता, शेवटी द्वेष तर व्यक्तीचाच होतं होता.. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जात हा एक सामाजिक विषय न राहता तो राजकीय बनत गेला..

 बदललेल्या प्रवाहाला शिवसेनेने सुद्धा स्वीकारले होते, नारायण राणे यांना एक मराठा मुख्यमंत्री म्हणून बाळासाहेब ठाकरे यांना पदावर बसवाव लागलं.. नकळत पणे महाराष्ट्रात मराठा, ब्राम्हण, आणि इतर असा राजकीय गट पडला होता, अनेक संघटना त्याकाळी टोकाचा प्रचार किंवा त्यांच्या भाषेत सांगायचे झाले तर खरा इतिहास समोर आणून ब्राम्हण कसे चुकीचे होते हे अत्यंत आक्रमक कधी कधी तर अभद्र भाषेत सांगू लागले,  यातून बऱ्याच तरुणांच्या मनात कायमचा जातिद्वेष पेरल्या गेल्या पर्यायाने व्यक्तीचा द्वेष पण लोक करू लागले किंबहुना आजही करतात.. त्यातून पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचा हक्काचा मराठा मतदार राज्यात गोळा झाला, तसच इतिहासात आणि वर्तमानात मुसलमानांना जवळ करून ती बाजू सुद्धा पक्षाने घट्ट केली.. दुर्दव्याने एवढ्या टोकाचा जातीवाद महाराष्ट्राने कधीच पाहिला नसेल तेवढा जातीवाद 2000-2010 यावर्षात बघितला, महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात ब्राम्हण विरुद्ध मराठा असा संघर्ष होताच, पण त्याला द्वेषाची कगार नव्हती, जी हल्लीच्या राजकारणात आहे.. यातून फक्त समाजाचे नुकसान झाले असे नाही तर छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना आणि विभागणी होऊन बसली, ज्या शाहू, फुले, आंबेडकर या सर्वांनी ज्यांची प्रेरणा घेतली त्यांची वाटणी एक जातीपूर्ती झाली होती तसेच महाराजांना वैचारिक मंचावरून पण बाजूला करण्यात आले होते.. कधी तुम्हाला एखाद्या कॉलेज किंवा खाजगी कार्यक्रमात महाराज दिसतात का? बाबासाहेब पुरंदरे आणि जेम्स लेन या प्रकरणामुळे तर सर्वच राजकीय पक्षांना मोठी संधी चालून आली होती, या घटनेतून ब्राम्हण विरुद्ध मराठा हे वितुष्ट किंवा विरोध अधिकच वाढत गेला, काही संघटना या आगीत
 सारख्या तेल टाकत होत्या आणि डोकी भडकवात होत्या.. आणि राजकारणी डाव साधत होते.. पुढे ब्राम्हण मतदार भाजपकडे वळला विखुरलेल्या obc समाजाला भाजपने एक करण्याचा प्रयत्न केला बऱ्यापैकी त्यात ते यशस्वी झाले, शिवसेना आणि भाजपने
 obc आणि काही प्रमाणात मराठा मतदार आपल्याकडे ओढला आणि..(part2)

Saturday, April 23, 2022

आजकाल खरंच कार्यकर्ते सतरंज्या उचलतात का ? cadre is needed to win election?

राजकारणात जिंकायच असेल तर कॅडर पाहिजे, संघटना पाहिजे अश्या अनेक गोष्टी पेरून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे बिचारा सर्वसामान्य माणूस या गोष्टींपासून खूप लांब राहतो.. या लेखात नेमके आणि मुद्द्याचे निकष मांडू, जेणेकरून अधिक क्लिष्ट होता कामा नये.. एखाद्या पक्षाला जिवंत ठेवण्यासाठी कॅडर ची आवश्यकता असते, ताकद दाखवायलाया लोकांची गरज असते नाकी निवडणुका जिंकायला..जर तस असत तर शिवसेना किंवा राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष असता, त्यामुळे

 आपल्या धारनेच्या आधारावर आणि लादल्या गेलेल्या विचारावर आपण राजकारणाकडे बघत असतो.. आक्रमक किंवा अनावश्यक बोलणाऱ्या नेत्यांना आणि पक्षांना आपल्या राज्याने नेहमीचं खांद्यावर ठेवले आहे, डोक्यावर कधीच घेतले नाही, उदाहरण म्हणून महाराष्ट्रात अशोक चव्हाण मुख्यमंत्री होऊ शकतात पण नाना पाटोले यांची हमी कोणी घेईल का? अजित दादांच कॅडर एवढं मजबूत असूनसुद्धा एकदाही मुख्यमंत्री नाही? असं का? दुसऱ्या देवेंद्र हे परिचित नसताना सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री होतात, आणि निवडणूका सुद्धा जिंकतात.. त्याच गणित स्पष्ट आहे, तुमच्याकडे मुद्दा आणि कर्तृत्व या दोन गोष्टी लागतात..2014 च्या नंतर
 भारताच्या राजकारणात खूप बदल झाले आहेत, प्रचारात सुद्धा बदल झाले आहेत, आता भोंग्याने किंवा जागोजागी जाऊन प्रचार होत नाही, प्रत्येक पक्ष आज सोशल मीडियावर हजारो कोटी रुपये खर्च करतो, माहिती विभाग हा एक सरकारी विभाग आहे ज्याद्वारे सरकार आपला प्रचार करत असते.. मोठ्या स्थरावर घेऊ भारतात 80 कोटी लोक फोन वापरतात, नेट सुद्धा वापरतात आज ते सगळे लोक कधीही आणि केव्हाही पक्षासोबत जोडू शकतात, किंवा संदेश पाठवून कॉल करून नागरिकांना आज राजकीय पक्ष संदेश देत आहेत.. भाजपकडे आज जवळपास 60 हजाराच्यावर ट्विटर खाते आहेत, मोठी it सेल आहे, देशात कधी कोणताही ट्रेंड ते चालवू शकतात, आणि राजकीय वार बदलू शकतात.. म्हणजे जो जमिनीवरचा कार्यकर्ता आहे त्याच काम खूप सीमित झालं आहे, त्याला जेव्हा गरज आहे, तेव्हाच बोलावलंय जाईल.. पण
 प्रचारासाठी आणि आपला संदेश पोहचवणेयासाठी कोणताच पक्ष आज कार्यकर्त्यांवर अवलंबून नाहीये.. राज ठाकरे हे जेव्हा शिवसेना सोडून गेले तेव्हा त्यांच्याकडे कोणता कॅडर होता? तरीही त्यांनी 2009 साली 17 आमदार निवडून आणले, ते मुद्द्यांच्या आणि गुडद्यांच्या जोरावर नाकी तुमच्या कॅडरवर.. मतदार आणि कार्यकर्त्यांना आज ऑनलाइन सिस्टिम द्वारे सर्व पक्ष जोडू पाहत आहेत, अनेक सदस्यनोंदनी मोहीमा चालवत आहेत, जे की पक्षाचं online कॅडर आहे, उद्या तेच लोक पक्षाचा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहचवतील.. एवढंच नाही तर प्रत्येक नेत्यांचे आणि पक्षांचे हल्ली काही समाज माध्यम आणि youtube वर प्रचारक असतात, त्यामुळे आता tv वर अवलंबून राहण्याची गरज सुद्धा त्यांना नाहीये.. काँग्रेसला नवजीवन देण्यासाठी अश्याच प्रकारचे काही सल्ले प्रशांत किशोर यांनी गांधींना दिले आहेत, आणि प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये नवचैत्यन टाकतील अशी आशा धरायला काही हरकत नाही.

Thursday, April 21, 2022

प्रशांत किशोर काँग्रेसला जीवदान देऊ शकतात का? prashant kishor can save congress?

अचूक भविष्यकथन मुरलेला जोतिषी सुद्धा करू शकत नाही, राजकारणाचं सुद्धा तसंच असत, काही घडामोडी आणि नेत्यांचं वलय या दोन गोष्टीवर अंदाज लावल्या जाऊ शकतात.. आपण या लेखात फक्त आढावा घेऊ की काँग्रेस या पक्षाला पुन्हा जिवंत होण्याला वाव का आहे ते? संघटनाच्या नावाखाली आज काँग्रेस खूप बदनाम होत आहे, पण उद्या सत्ता आली तर नाव ठेवणारे लोकच म्हणतील की काँग्रेसने मेहनत करून निवडणूक जिंकली ते. सत्तेत असल्यावर पक्ष वाढतो अस म्हणतात ते अगदी योग्य आहे, आणि नेमकं तेच काँग्रेस सोबत होतंय.. सत्ता नसल्यामुळे कार्यकर्ते थांबत नाहीयेत, जे लोक आहेत त्यांना हुरूप देण्याचं काम आधी काँग्रेसने हाती घेणे गरजेचे आहे.. मग ते कोणत्याही पद्धतीने असो, pk यांच्या मदतीने किंवा इतर कार्यक्रम राबवून. Pk यांना सक्रिय राजकारणात येण्याची ईच्छा गेल्या अनेक दिवसांपासून होती,

 बहुतेक काँग्रेस ती आता पूर्ण करणार आहे..पण प्रशांत किशोर हे जितके सल्लागार म्हणून पक्ष वाढवू शकतात ते तितके पक्षात सक्रिय होऊन पक्ष वाढवू शकत नाहीत.. काँग्रेस या पक्षाचे दरबारी राजकारण सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे प्रश्नात किशोर हे काँग्रेससाठी कोणत्याप्रकारे काम करतात हे महत्त्वाचं आहे.
2024 च्या साठी प्रशांत किशोर तयारी करत नसावेत, त्यांचा बहुदा हा प्रयत्न असावा की काँग्रेस च्या मताचा टक्का वाढला पाहिजे जेणेकरून 29 च्या निवडणुकीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष होऊ शकतो आणि तिसऱ्या आघाडीच्या चर्चा बंद होऊ शकतात.. त्यांचा पहिला प्रयत्न हा असेल की पक्षाला एखादा कार्यक्रम आणि जिवंतपणा देने.. ठोस विरोधी पक्ष आणि देशातील सर्वात जुना व मोठा पक्ष अशी ओळख pk पक्षाला देण्याचा प्रयत्न करतील.
त्याबरोबरच जुने खोड बाजूला सारून नवीन कार्यकर्ते आणि नवीन संकल्पना घेऊन लढण्याचा प्रश्नात किशोर आणि राहुल गांधी यांचा प्रयत्न असेल, कारण राहुल गांधी यांनीच pk यांना पक्षात येण्याची विनंती केली आहे.. pk जर पक्षात आले तरी ते राहुल गांधी यांच्यासाठी चांगले आहे कारण त्यामुळे त्यांचा गट आणि बाजू

 मजबूत होईल, कारण राहुल यांना पक्ष बहुतेक धुवून काढायचा आहे. सामाजिक आणि राजकीय अभ्यास व वेगवेगळ्या आयडिया देने ही प्रशांत किशोर यांची जमेची बाजू आहे, तसेच त्यांचे इतर राज्यात नेटवर्क आणि ओळखी चांगल्या आहेत, काँग्रेस बऱ्यापैकी ते आपल्या पदरात पाडू शकते.. तरीसुद्धा किशोर आले आणि पक्ष जिंकला असं मुळीच होत नसत, पक्षाला आपली बाजू ठोस मांडावी लागत असते, मुद्दे शोधावे लागत असतात 2014 च्या निवडणुकीचे उदाहरण घ्या.. मुद्दा आणि फक्त चेहरा या दोन गोष्टीवर मोदी जिंकले.. तसंच काहीसं काँग्रेसच्या बाबतीत आहे जर मुद्दा आणि प्रभावी प्रचारयंत्रणा असेल तर मग संघटना आणि इतर गोष्टी दुय्यम ठरतात..

Wednesday, April 20, 2022

शरद पवार यांच्याघरावरचा हल्ला आणि काही प्रश्न..

(Blog ला follow करा) हल्ला हा शब्द इतका सहजतेणे हल्ली आपण वापरत असतो, त्यामुळे मराठी माध्यमांच्या कृपेने आणि तुमच्या स्वारस्यातून या दोन तीन वर्षात हल्ला, टोला, आणि असे काही शब्द आपल्या रोज कानावर पडत असतात.. असो.. शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला हा निषेधार्थच आहे.. यात दुमत नाही..पण एखाद्या घटनेचे परिणाम किंवा परिणाम साधण्यासाठी केलेली घटना या दोन्ही गोष्टीतून फायदा कुणाला तरी होत असतो.. नक्कीच होत असतो.. लेख लांबता लिहण्याचा विचार आहे, त्यामुळे अनेक पैलू
 मांडण्याचा प्रयत्न मी येथे करणार आहे.. मराठा मोर्चा हा स्वतंत्र होता, पण तो शेवटपर्यंत स्वतंत्र होता का? मोर्चात राजकीय शक्ती घुसल्या आहेत, अशा अनेक चर्चा तेव्हा चालू होत्या.. अगदी शरद पवार हे या मोर्चाला फंडिंग करताय अशी चर्चा चालू होती.. या 58 मराठा मोर्चातून एकही नेतृत्व उदयाला आलं नाही, अगदी एकही नाही, आरक्षण तर मिळालंच नाही, पण एक झालेला समाज एक नेता का देऊ शकला नाही? कधी तरी निवांत विचार करा की मराठा नेतृत्व जर राज्यात तयार झाले तर अनेक पक्षांना ते धोकादायक ठरणार होते.. म्हणून मोर्चा किंवा आंदोलनं हे कधीच अराजकीय नसतात हे मान्य करा.. किंवा ध्यानात ठेवा. आरक्षण मिळणार नाही किंवा मिळूच शकत नाही हे काही जाणकारांना माहीत होते, तरीही त्यांनी ,जातीनं, लक्ष घालून सांगितलं नाही की तुम्ही माघार घ्या? आता st आंदोलनाची तुलना वरील मांडलेल्या मुद्द्यांशी करा.. अगदी बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत, गुणरत्न सदावर्ते तेव्हाच्या सरकारला धोकादायक होते आता या आंदोलनात ते या सरकारला
 धोकादायक आहेत.. चालू परिस्थितीत सदावर्ते यांचा फायदा भाजप उचलत होता, ते स्वाभाविक आहे..महाविकास आघाडी ही आधीच अनेक अडचणीत सापडली आहे, त्यातली त्यात सदावर्ते यांचा त्रास म्हणजे ते त्यांना अधिक जड गेलं असतं.. म्हणून तर सदावर्ते यांना राज्यात या ठिकाणावरून त्या ठिकाणावर फिरवल्या जात नाही ना? या आंदोलनातून एक दलित किंवा आजच्या भाषेत सांगायचं झालं तर बहुजन नेतृत्व समोर येणार होत, नक्कीच येणार होत, याची खात्री अनेकांना होती, कारण 1 लाखांच्या वर कर्मचारी पाच महिने त्या व्यक्तीसाठी थांबले याचा अर्थ नक्कीच सदावर्ते यांचा मोठा प्लॅन असेल.. संप टिकवणं हे काही खुळ्या माणसाचे काम नाही, किंवा दंगली घडवण्यासारखे सोपे काम ही नाही.. ते
 सदावर्ते यांना जमलं होत.. चांगलंच जमलं होत. त्यांची देहबोली आणि रगेल बोलणं तेच सांगून जातं होत की हा माणूस कोणत्यातरी तयारीत आहे, मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष.. घटनेच्या काही तांत्रिक बाजू बघितल्या तर खूप विरोधाभासी चित्र दिसतं.. पोलिसांना चार दिवस आधी माहीत होतं की हल्ला होऊ शकतो तरीसुद्धा बंदोबस्त नाही? जर पोलिसांना याची कल्पना होती की काहीतरी कट शिजत आहे, मग तरीपण पुरेशी तयारी पोलिसांनी का केली नाही? की घटना होऊ दिली, कारण या घटनेतून सहानुभूती नक्कीच मिळणार होती, आणि सदावर्ते व त्यांच्या बायकोला अटकही करता येईल, असा हेतू तर त्यामागे नव्हता ना? सदावर्ते यांनी कट रचला की नाही हे अजून सिद्ध झाले नाही.. पण आपण असं समजून जरी चाललो की त्यांनी कट रचला, पण त्यांनी रचलेल्या कटाचा फायदा घेण्यासाठी, नेते आणि पोलीच काही काळासाठी अडाणी तर नव्हते बनले ना? सदावर्ते यांना अटक केल्यानंतर त्यांच्या जुन्या गुन्यांना काढून त्यांना फिरवला जात आहे.. शेवटी तो गुन्हा आहे, पण संजय राऊत, राज ठाकरे, शरद पवार आणि कधी कधी आपले मुख्यमंत्री सुद्धा ओघात काहीतरी प्रशोभक बोलून जातात, मग त्यांच्यावर केस होत नाहीत किंवा
 त्यांच्यावर असलेल्या केसेस ना वर काढलया जात नाही असं का?सदावर्ते यांच्या बाहेर राहण्याचे नुकसान महाविकास आघाडीलाचं होणार आहे त्यामुळे तर त्यांना अनेक केसखाली आत टाकल्या जात आहे.. उदयनराजे शुद्धीत नसतात असं कित्येक वेळा राष्ट्वादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना संबोधले आहे.. मग त्यांना अटक का होत नाही? केंद्राला सूडभावनेने वागण्याचे आरोप हे राज्यातील नेते करतात मग सदावर्ते यांच्यासोबत सध्या वेगळं काय होतंय?
St चा प्रवास पूर्ण खाजगीकरनाकडं चालू आहे आणि त्यातून कुणाचा फायदा आहे, हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही st च्या थडग्यावर काही दिवसात अनेक नेत्यांची आणि पक्षांची घर भरणारार आहेत.. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.. हा पैलू सुद्धा आपण या केसमध्ये धान्यात ठेवायला हवा.. या प्रकरणातील शेवटची आणि महत्वाची गोष्ट जी कुणाच्याच नजरेत आली नाही ती म्हणजे माध्यमांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला किंवा आंदोलन होणार आहे हे पोलिसांना का कळवलं नाही? हल्ला झाल्याच्या नंतर जवळपास सगळ्या मराठी चॅनेल्स वर एकच हेडलाईन होती, माझ्या समाधानासाठी हा योगायोग होता, असे मी माझ्या मनाला सांगितले पण दोन दिवस तोच मुद्दा आणि सारखा सारखा टीव्हीवर तोच विषय असं का? काही चॅनल्स वर तर ज्या राष्ट्रवादी नेत्यांना कोणी ओळखत नाही, त्यांचं नाव आणि चेहरा सुद्धा लोकांना माहीत नाही अशा काही लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बाईट्स मराठी चॅनेल्स नि दाखवल्या.. आणि हो अगदी पत्रकार सुद्धा नवेच होते बरं का? घटनेच्या दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसापासून परिस्तितीचा फायदा किंवा गरज लक्षात घेऊन सर्व चॅनेल्सनी सदावर्ते यांच्या विरोधात बातम्या लावणं चालू केलं, मी हे माझ्या अनुभवातून सांगतोय, वाटलंच तर तुम्ही दोन तीन दिवस निरीक्षण करा, त्यांच्या वयक्तिक आयुष्याचा आणि या प्रकरणाचा काहीएक संबंध नाही, मग त्यांचं, घर, त्यांच्या गाड्या, किंवा इतर काही गोष्टींची रेपोर्टिंग कशासाठी? महाराष्ट्रात इतक्या नेत्यांवर आरोप झाले कधी त्यांच्या शेजारच्या घरात जाऊन का नाही रेपोर्टिंग केली आपल्या चेंनेल्सनी? असं का? या सर्व गोष्टी वरवर जरी योगायोग वाटत असल्या तरी यात कुणाचातरी स्वार्थ, राग, द्वेष, आणि चिंता लपलेली आहे.. आणि हो सदावर्ते यांच्या बायकोमुळेच अनिल देशमुख आतमध्ये आहेत.. आणि खरं काय आहे ते सदावर्ते बाहेर आल्यावर कळेलच.

Friday, April 15, 2022

विजय सेथुपथीचा आयुष्य जगायला शिकवणारा चित्रपट Kadaisi Vivasayi review marathi

काडीसी विवासायी.. नावाचा एक सुंदर आणि अर्थपूर्ण चित्रपट बघण्यात आला.. एखादी पाण्याची नदी जशी संथ वाहावी कोणतीही अडचण तिच्या आड येऊ नये.. तीने सतत आणि सतत वाहत राहावं.. वाहतच राहावं.. अगदी वाटेत येणाऱ्या ओढ्यांना आणि नाल्यांना सामावून न घेता..कारण आजच्या जगात त्या नितळ नदीच चारित्र्य खराब करण्याची ताकद ते छोटे ओढे आणि नाल्या ठेवतात.. तसाच काहीसा या चित्रपटाचा अर्थ आहे.. शेवटचा शेतकरी असं या चित्रपटाचं मराठीतलं नाव.. आपल्या मराठीत एक म्हण आहे शेती असणं आणि शेती कसंन यात फरक आहे.. अगदी जमीन आणि अस्मानाचा फरक आहे.. शेतीतील आत्मा हा व्यवसायात गेला, शेती सुद्धा एक हक्काचा व्यवसाय झाला म्हणून शुद्ध अंतकरणाने शेती करणारे शेतकरी आज किती आहेत? चित्रपटात सुद्धा गावात एकच  शेतकरी असतो ज्याचा, धर्म शेती, कर्म शेती आणि वर्ण सुद्धा शेतीचं असतो.. वयाची 80 गाठलेली असते पण शेतीची आस आणि कास काही सुटलेली नसते, शेती ही गरज म्हणून चित्रपटातील पात्र करत नाही तर जबाबदारी म्हणून शेती तो व्यक्ती कसत असतो.. निसर्ग हा आपला पोशिंदा आहे पाणी आणि सूर्यप्रकाशाच्या बाबतीत तो भेद करत नाही, शेतीसाठी लागणार सूर्यप्रकाश आणि पाणी तर निसर्ग देतो मग आज आपला

 अट्टहास नेमका चाललाय कुणासाठी? निसर्ग तुमची गरज पूर्ण करू शकतो हाव नाही या वाक्याचा प्रत्यय नेहमी चित्रपट बघताना येत असतो, मुख्य पात्राच्या चेहऱ्यावर कमालीची अध्यात्मिक शांतता असते, जणू काही मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरीमोठं राज्य उभे करून त्याचा राज्यकारभार तो वृद्ध व्यक्ती करत असावा इतके आतून आणि बाहेरून स्थिरभाव त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर असतात.. जर कर्मवादी बनून आयुष्यात स्थिरता आणि समाधान मिळत असेल तर यशस्वी होण्याचे काही मंत्र जाणून घेण्याची गरज आहे का? कदाचित यशस्वी होणे ही झुंडीची मानसिकता झाली आहे की काय असे वाटत आहे, सामाजिक दडपण, बदलते जग, ढासळती नैतिकता माणसाला अधिक वेगवान आणि निष्ठुर करत आहे.. जी लोक ह्या सगळ्यांपासून लांब आहेत ती स्वतःजवळ

 आहेत, आपण आणि आपले अस्तित्व ते बहुदा आपल्यापेक्षा चांगलं जाणत असावेत.. रस्त्यात अपघातात पडलेल्या लोकांना आपण उचलण्याचे कष्ट घेत नाही.. पण चित्रपटातील पात्र मात्र मेलेल्या मोरांचा अंत्यसंस्कार करून चुकीच्या आरोपात जेलमध्ये जाते.. त्याला हे माहीतच नसते की हल्ली प्राण्यांना आणि लोकांना मदत करण्याची पण क्षिशा भेटते.. जेव्हा जज त्या व्यक्तीला विचारतात की तुम्ही मोरांना मारले का? ते म्हणतात ,मोर आमच्या दैवताचे वाहन आहेत(मुरुगण)आम्ही त्यांची पूजा करतो अन त्यांना हानी कशी पोहचवू? हा निर्दोष सुटण्याचा पुरावा जरी नसला, पण माणूस असल्याचा पुरावा नक्कीच आजच्या जगात आहे..विजयने या चित्रपटात एका वेडसर माणसाची भूमिका साकारली आहे.. जो सतत देवाचा दाखला देत असतो.. त्याच्या भूमिकेचे आकलन मला करता आले नाही.. तुम्हाला करता आले तर नक्की करा.. आणि हा चित्रपट नक्की बघा..

Monday, April 11, 2022

भाजप पक्ष नेमक्या निवडणुका जिंकतो कशा?


पूर्वार्ध-भाग 1


How bjp won election

निवडणुका जिंकणे हा एखाद्या राजकीय पक्षाचा मुख्य अजेंडा असतो.. वैचारिक अजेंडा असण्याचा काळ भारतातून संपला आहे, त्यामुळे ती गोष्ट आपण मान्य केली पाहिजे.. जिथे चळवळी संपतात तेथे शुद्ध वैचारिक राजकारण संपलेलं असतं अस मला वाटत.. त्यामुळे नेमकं आणि मुद्द्याचे आपण या लेखात बोलू किंवा चर्चा करू..1984 पासूनच या दोन्हीही पक्षांची स्पर्धा सुरू झाली, काँग्रेस आणि भाजप सुद्धा आणि काही इतर राजकीय पक्ष जे हळूहळू जन्म घेत होते, उदयाला येत होते त्यांचा जन्म सुद्धा याच काळात झाला.. म्हणजे आपण काँग्रेस आणि भाजप ची स्पर्धा1984 पासूनच करायला पाहिजे नाकी 1947 पासून किंवा

 त्याआधीपासून.. काँग्रेस 80 च्या दरम्यान फुटून पुन्हा नव्याने आपला जम बसवत होती.. चांगली think tank हा भाजपचा नेहमीच जमेचा मुद्दा राहिलेला आहे, म्हणजे जेथे तुम्हाला प्रशांत किशोर यांना करोडो रुपये देऊन जण यात्रा किंवा रथ यात्रा काढण्याचे सल्ले मिळतात, ते भाजप मध्ये त्यांचेच नेते देतात आणि ते सफल सुद्धा करून दाखवतात..1989 प्रमोद महाजन यांच्या सांगण्यावरून भाजपने रथ यात्रा काढली आणि पूर्ण भारतामध्ये आपल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार केला..1989 मध्ये त्या यात्रेच तगड नियोजन, पैसा, प्रचार आणि श्रम या एवढ्या गोष्टी भाजपने त्या रथयात्रेत टाकल्या आणि आपला पाया मजबूत करून घेतला आजही पक्षाची वैचारिक बैठक रथयात्रा या मुद्द्याशिवाय पूर्ण होत नाही. तात्पर्य हेच की तुम्हाला पक्षवढीसाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल, पूर्णतः भाडोत्री कार्यकर्त्यांवर अवलंबून राहता येणार नाही.. जर मोठ्यमोठ्या नेत्याकडूनच कार्यकर्त्याला प्रेरणा मिळत नसेल तर तो पक्ष भावनिक दृष्ट्या खिळखिळ व्हायला लागतो.

वैचारिक स्थिरता आणि rss

Rss and other mother organization..
आज हिंदुत्वाची पोकळी पूर्णतः भाजप ने व्यापली आहे.. हिंदू अस्मिता म्हणजेच भाजप असे समीकरण तयार झाले आहे, आम्ही करतो तेच, हिंदुत्व आम्ही जी बाजू मांडतो तीच बाजू हिंदुत्वाची आहे, असे संकेत आपल्या डोक्यात भाजपने घालून दिले आहेत, जस चीनमध्ये, आणि रशियामध्ये एकच पक्ष सत्तेवर येतो.. तसच काहीतरी भारतात भाजप बाबतीत दिसून येत.. अधिक जवळजाऊन समजून सांगायचं झालं तर दैनंदिन जिवनात अगदी छोट्या छोट्या गोष्टी आपण राजकारणासोबत जोडल्
जोडयला लागतो, अगदी नकळतपणे ते आपल्याकडून होऊन जातं.. एका ओळीत सांगायचं झालं तर ,धर्मामुळे हा पक्ष जिवंत नाही, तर ,या पक्षामुळे धर्म जिवंत आहे, ही भावना आपल्या मनात भाजप हा पक्ष बिंबवण्यात यशस्वी ठरला आहे.. त्यात अनेक गोष्टी समांतर पातळीवर काम करतात मग त्या समविचारी संघटना असो, rss असो किंवा हुशार आणि चाणाक्ष ज्यांना बर बोलता, येतं, बोललेलं विकता येतं असे लोक हे काम कळत नकळतपणे पक्षासाठी करत असतात.. पण एक गोष्ट लक्षात ठेवा या सर्व गोष्टी क्षणात झालेल्या नाहीत, त्यासाठी अनेक वर्षे या पक्षाने दिली आहेत.

घराणेशाही आणि अपयशाची जबाबदारी..



Politics is game of perception..राजकारणात देखावा, आणि दिखावा महत्वाचा असतो, आपण ज्याला symbolism म्हणतो, जर देशातील एका प्रमुख पक्षाचा अध्यक्ष गेल्या 20 वर्ष झाले बदलला नाही, तर लोक नक्कीच त्याकडे चौकस नजरेने बघणार.. तुमच्या जिल्हा किंवा तालुका पातळीवर किती तुमच्या

 पक्षात शिस्त किंवा लोकशाही जिवंत आहे, हे बघणार नाहीत.. आणि नेमकं हेच काँग्रेस च्या बाबतीत घडत आहे.. लोकांचा काँग्रेस कडे पाहण्याचा दृष्टिकोन ठराविक होत आहे.. तसा रीतसर प्रचार भाजपकडून केल्या जातो.. या उलट भाजपचे अध्यक्ष दर तीन चार वर्षाला बदलत असतात, ही गोष्ट ती ते प्रकर्षाने मांडतात, आणि त्यातून होत असं की तुमच्या जिल्हा किंवा तालुका पातळीवरील घराणेशाही कोणी बघत नाही.. जर पक्ष निवडणुकीत हरला तर त्याची नैतिक जबाबदारी घेऊन पक्षाध्यक्ष आपल्या पदाचा राजीनामा देत असतो एवढंच नाही तर का हरलो याचा अहवाल पक्षाला द्यावा लागतो.. याच उत्तम उदाहरण म्हणजे नितीन गडकरी, व्यंकय्या नायडू,राजनाथ सिंह आणि इतर नेते.. म्हणजे तुम्हाला कोणीतरी जाब विचारेल ही भावना काँग्रेस मध्ये दिसून येत नाही.. याउलट भाजप मध्ये तुम्हाला हिशोब आणि अहवाल दोन्हीही द्यावे लागतात..

पक्ष संघटना आणि मीडियाचा वापर..

Use of social Media by bjp after 2014..
2004 च्या निवडणुकीत या पक्षाने प्रचाराला डिजिटल बोर्ड वापरले होते, कॉल करून सभासद नोंदणी चालू केली होती, डिजिटल जाहीरनामा तयार केला होता.. मग विचार करा तंत्रज्ञान किती चोख या पक्षाने वापरले आहे..2014 च्या आधी आजचा गोदी मीडिया नोएडा मीडिया म्हणून प्रचलित होता.. ते जे ठरवतील तीच दिशा योग्य.. पण भाजपने प्रचंड पैसा ओतून जवळपास 100 कोटी डिजिटल प्रचारात ओतले अनेक खाजगी कंपन्या प्रचारात जुंपून घेतल्या आणि नोएडा मीडियाचे अस्तित्वच खिळखीळ करून टाकले, क्षीण आणि लाचार दिल्लीचे पत्रकार झाले होते..आधी मोदींना देशाचा दुभाजक म्हणणारे आज मोदींना देशाचा तारणहार म्हणत आहेत.. मग विचार करा हा बदल कशामुळे झाला असेल तर.. यावर मला अधिक काही सांगायचे नाही कारण माझा पेशा सुद्धा पत्रकार आहे आणि माझ्या पेशातील लोकांना विकाऊ म्हणून मी लिहलं तर ते योग्य ठरणार नाही. नंतर भाजपतर्फे जगातील सगळ्यात मोठी सदस्य नोंदणी मोहीम राबवण्यात आली 2014 साली या पक्षाचे फक्त 5 कोटी सदस्य होते ते 2020 मध्ये जवळपास 20 कोटीच्या घरात गेले आहेत.. आणि भारतात जर निवडणुका जिंकायच्या असतील तर 20 कोटी मतदान पुरेसे आहे.. अनेक मोठे मोठे अभियान आणि कॉल्स मोहीम या पक्षातर्फे राबवण्यात येतात..म्हणजे निवडणुकीच्या 3 महिने हा पक्ष प्रचार करत नाही तर 12 ही महिने election मोड मध्ये राहणारा हा पक्ष आहे..20 कोटी सदस्य नोंदणी असलेला हा जगातील एकमेव पक्ष आहे.. आणि त्याचा परिणाम मतदानावर होत असतो.. 2014 नंतर या पक्षाने समांतर पातळीवर चालणारी चालणारी व्यवस्था निर्माण केली आहे.. खाजगी लोकांना स्थानिक पातळीवर पक्षावर नजर ठेवण्याचे महिन्याला चांगले पैसे दिल्या जातात..(या भागात एवढेच)..

Friday, April 8, 2022

शरद पवार यांच्या घरावर हल्ला.. वर्तुळ पुर्ण- महाराष्ट्राची राजकीय संस्कृती

(Blog ला follow करा)
सूचना-राजधर्म या सदराखाली काही राजकीय आणि ऐतिहासिक लेख तुम्ही वाचू शकता.. त्यातला हा पहिला लेख)
आज शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला दुर्दैवी आहे.. राजकारण ही एक निष्ठुर गोष्ट आहे, हे तुम्ही मान्य करा मी ही करतो, तेव्हा कुठे मला लिहायला आणि तुम्हाला वाचायला काही आत्मीय दुःख किंवा आनंद होणार नाही.


मुळात जे काही आपण महाराष्ट्र अस्मिता आणि आमची संस्कृती या नावाच्या खाली जे खपवतो आधी ते आपण बंद केलं पाहिजे. प्रत्येक नेता आणि पक्ष आपापल्या परीने महाराष्ट्र धर्म सांगत असतो. अश्लील बोलायचं, शिव्या द्यायच्या आणि महाराष्ट्रधर्म शिकवायचा, हे म्हणजे खुंटीला माळ टाकून रस्सा ओरपण्यासारखं आहे की o..सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून एका सामान्य माणसाला काही नेते बंगल्यावर नेऊन मारहाण करतात.. तेव्हा त्याच्या अभिव्यक्तीचा आणि तुमच्या महाराष्ट्र धर्माचा विचार बरोबर बासनात पडतो हवं तर बाजूला पडतो म्हणा.. जसा दर्जा, सामाजिक आणि आर्थिक स्थर तेवढा कायदा तुमच्या जवळ अशी स्थिती आज झाली आहे.. जेव्हा फडणवीस यांना फक्त ब्राम्हण

असल्यामुळे पंढरपूरमध्ये पूजा करू दिली नाही, तेव्हा सुद्धा आंदोलनचं चालू होतं,(मराठा आरक्षण मोर्चा)रोज त्यांच्या बायकोचा आणि आईचा उद्धार होत होता, तेव्हा आपली राजकीय संस्कृती कुठे जाते?तो काळ आठवून बघा आणि स्वतःच्या मनाला एकदा विचारा की ते योग्य होत का?तेव्हा आपण विलक्षण आणि विशिष्ट जातीय अस्मितेला बांधल्या गेल्यामुळे ,विवेक, वापरून कामच करत नव्हतो.. जर आपण आपल्या चष्म्यातून एकच बाजू पाहणार असू तर आपल्याला एकच बाजू दिसेल ना? वास्तव आपण बघितलं पाहिजे.. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शिवसेना आणि संजय राऊत हे महाराष्ट्र धर्माची, संस्कृतीची आठवण करून देतात, बऱ्याच काही गोष्टी सांगतात, पण बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सभ्य आणि नितळ राजकीय संस्कृतीत काय भर घातली आहे नेमकी?बाळासाहेबांचे काम आणि त्यांचे महत्व महाराष्ट्र जाणतो पण जर राजकीय संस्कृतीची गोष्ट असेल तर बाळासाहेबांनी आणि शिवसेनेने कायमच उग्र आणि हिंसेचे राजकारण केले आहे, बाळासाहेबांची भाषणातील भाषा, असो की लेख बऱ्याचदा ते शिवराळ भाषेत लिहीत, कदाचित तेच पुढे राऊत चालवत असावेत, पण रौतांनी हे विसरू नये की ते बाळासाहेब होते. पत्रकार निखिल वागळे, आचार्य अत्रे यांच्यासोबत शिवसेनेनं केलेले पराक्रम जगजाहीर आहेत, विरोधात लिहलं म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण अत्रे आणि वागळेंना झालेली आहे.
अत्रे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक मोठं नाव होते, त्या माणसाच्या उपकाराने महाराष्ट्राची निर्मिती झाली असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही, त्या व्यक्तीला शिव्या आणि चपला शिवसेनेनं दिलेल्या आहेत.. शिवसेना या पक्षाची वैचारिक रणनीती आणि नाव हे अत्रे यांनी 1962 ला सांगितले होते, पण ते काम ते करू शकले नाहीत पुढे याचाच आधार घेऊन1966 साली शिवसेना स्थापन

झाली.. म्हणजे अत्रे यांची संकल्पना घेतली, त्यांचं कार्य सुद्धा घेतलं तरी एकाही ठिकाणी त्यांचा फोटो आम्हाला दिसत नाही? ही आहे का महाराष्ट्राची राजकीय संस्कृती? आचार्य अत्रे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर जेव्हा निपुत्रिक म्हणून टीका केली होती तेव्हा लगेच त्यांनी यशवंतराव चव्हाण यांची माफी मागीतली होती.. का कारण वयक्तिक स्वभाव आणि सामंजस्य.. आणि तत्कालीन राजकीय परिस्थिती जेथे खळलं खट्याक अजूनतरी चालू झालेलं नव्हतं.. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती च्या नावाने असंख्य पापे आणि मुखवटे आज प्रत्येक पक्ष आणि काही नेते करतायत,ते अगदी तसच आहे जस एखादे कुटुंब आपल्या कुमारच्या हुष्यरक्या किंवा हुशारी लोकांना सांगण्यात धन्यता मानत असते, मुळात तो कुमार असतो अर्धवट बुद्धीचा आणि मूर्ख, पण आपली प्रतिष्ठा जपल्या जावी म्हणून आपल्या मुलाच्या हुशारक्या सांगत असतात.



राजधर्म या सदराखाली काही राजकीय आणि ऐतिहासिक लेख तुम्ही वाचू शकता.. त्यातला हा पहिला लेख



Wednesday, April 6, 2022

महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ला हलक्यात का घेण्यात येतंय?


(Blog ला follow करा)
सध्या महाराष्ट्राचं राजकारण एका अभूतपूर्व टप्प्यातून जात आहे ,जिथं स्वतःचा बचाव करण्यासाठी दुसऱ्याचे कपडे काढल्या जात आहेत. पूर्वी जर एखाद्या नेत्यावर आरोप लागले तर तो नैतिकता पाळून बाजूला होत असे,आता त्यांचं काही काढता येईल का ,अस विचारल्या जात. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस चे स्थान लहान भावासारखे आहे, बघून दुर्लक्ष करणे, याची जाण महाराष्ट्र काँग्रेस ला पण आहे.(महाराष्ट्र काँग्रेसचा नेमका कोण आहे)एक तात्पुरती गरज म्हणून काँग्रेस कडे सध्या पाहिलं जातं आहे, पण या काँग्रेस च

 महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात जास्त महत्व आहे. विचार करा जर काँग्रेस किंवा काँग्रेस मधील नाराज आमदारांचा गट जर बाहेर पडला तर? उरलेल्या दोन्ही पक्षाची काय स्थिती होईल?काँग्रेस या पक्षात सध्या अनेक गट आपल्याला दिसून येतात, पण अजूनही पक्षशिस्त आणि दिल्लीचे फर्मान काँग्रेस मध्ये पाळल्या जाते, एक तर काँग्रेस चा नेता पक्षच सोडतो नाहीतर दिल्लीच ऐकतो तरी. हा त्या पक्षाचा इतिहास आहे, विलासराव देशमुख असो की अशोकराव चव्हाण यांच्यावर आरोप लागल्याच्या नंतर त्यांनी लगेच राजीनामा दिला होता.. या विद्यमान आघाडीमध्ये मुळात काँग्रेस कडे आदराने आणि आपुलकीने बघितल्याच गेलं नाही, एक गरज आणि तडजोड हे दोनच शब्द या नात्याचे भांडवल आहेत त्यापलीकडे काहीच नाही. काँग्रेस मधील अनेक आमदारांना आज आवाजच उरलेला नाही, मग सत्तेत असून आणि नसून फायदा काय आहे, असा विचार आज काँग्रेस चे आमदार करत आहेत, त्यापुढे जाऊन आपला हक्काचा आणि मूळचा मतदार काही प्रमाणात का होईना काँग्रेस वर नाराजच असेल, कारण आजही वैचारिक दृष्ट्या प्रामाणिक मतदार दिसून येतात मग ते काँग्रेस चे असो की भाजप चे. महाविकास आघाडी स्थापन होतानाच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना हे नको होतं, पण पक्षफुटीच्या भीतीने , आणि शरद पवारांच्या धास्तीने काँग्रेस ने या आघाडीत सहभाग घेतलेला.
पण आता ते योग्य वेळेची वाट पाहत असावेत. या आघाडीचा थोडा फायदाही कदाचित काँग्रेस ला झाला असावा पण म्हणावी तशी

 संघटना त्यांना वाढवता आलेली नाहीये, आणि दुसरीकडे काँग्रेस व राष्ट्रवादी मात्र स्वबळाचा नारा देत आहेत, शरद पवारांचे मोदींना आणि अमित शहा यांना भेटी देणं चालूच आहेत, याच शरद पवारांच्या अस्थिर आणि धूर्त स्वभावामुळे त्यांनी कधीच त्यांना पंतप्रधान होऊ दिले नाही.. आणि पवार हे जाणतात की काँग्रेस 100% विश्वास माझ्यावर कधीच ठेवणार नाही, म्हणून ते कधी मोदी यांच्याकडे तर कधी ठाकरे यांच्याकडे जात असतात.. तिसऱ्या आघाडीचा पर्याय, काँग्रेसला खुले आव्हान हे इतर पक्ष देत आहेत, त्यामध्ये पवार आणि ममता पुढे आहेत, हा तर थेट काँग्रेसच्या अस्तित्वावर घाला आहे, आणि ते काँग्रेस सारख्या पक्षाला परवडणारे नाही.. त्यामुळे या ताणलेल्या आणि अनैतिक नात्याचा शेवट काँग्रेस कधीही करू शकते.. 

Tuesday, April 5, 2022

शिवसेनेच्या बदलत्या भूमिका-2

महाराष्ट्रात आणि देशात उजव्या संघटना  1970 च्या नंतर सक्रिय व्हायला सुरु झाल्या,तेव्हाच शिवसेनेमध्ये बदलाचे वारे वाहू लागले. काँग्रेस साठी हे डोईजड ठरणार होते, दक्षिणेत आणि उत्तरेत लोकांच्या जातीय, धार्मिक आणि प्रादेशिक अस्मिता जोर धरत होत्या. महाराष्ट्रातील आणि देशातील अस्थिरतेचा बंदोबस्त करण्यासाठी "धर्मनिरपेक्ष"हा शब्द भारतीय संविधानाच्या


प्रस्तावनेत घालण्यात आला, या निर्णयाचे अजूनही कोणतेच ठोस कारण इतिहासात सापडत नाही, मग नंतर अल्पसंख्यांक आणि गरिबांचे कल्याण हे विषय भारतीय राजकारणात चर्चिल्या जाऊ लागले..त्यामुळे काही दिवस शिवसेना काँग्रेस च्या छत्रछायेखाली राहिली, दोन विधानपरिषदेच्या, जागा, नगरसेवक आणि बऱ्याच गोष्टी शिवसेनेला वसंतराव नाईकांच्या कृपेने मिळाल्या.  उजव्यांचं ठीक आहे पण डावे कसे शांत आणि निष्प्रभ करायचे?हा प्रश्न काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांना पडला असावा ,आणि याच प्रश्नाचे उत्तर होते ,दस्तुरखुद्द, बाळ ठाकरे म्हणजेच (बाळासाहेब ठाकरे)
काँग्रेस ने सहज केलेला प्रयोग यशस्वी होत होता,आणीबाणी च्या दरम्यान झालेल्या इंदिरा आणी ठाकरे भेटीत कदाचित ही गोष्ट पक्की झाली असेल की "बाळ ठाकरे "तुम्ही राज्यातले डावे सांभाळा मी उजवे (इतर विरोधक)सांभाळते ,कारण आणीबाणी ला पाठिंबा बाळासाहेब का देतील? आणीबाणीला दिलेल्या पाठिंब्याचा त्यांना पुढे फायदा झालेला आहे.

1970 कॉम्रेड कृष्णा देसाई यांच्या हत्येचे आरोप बाळासाहेब ठाकरे यांच्यावर लागले होते, हत्या उघड उघड असताना सरकार काहीच का दखल घेत नाही किंबहुना योग्य तो तपास का करत नाही? असा प्रश्न तेव्हाच्या नेत्यांना पडला होता, ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय हत्या होती, डांगे यांच्या मृत्यूनंतर अनेक तरुण शिवसेनेकडे वळले, अनेक कामगार विशेष करून गिरणी कामगार(तरुण मुले)पर्याय नसल्यामुळे शिवसेनेकडे जात होते. शिवसेनेत अनेक कामगार सेना स्थापन होत होत्या,पण पुढे गिरणी कामगारांच्या संपात शिवसेनेची भूमिका सावत्रपणाची होती, तत्कालीन मुख्यमंत्र्यांशी संबंध जपणे ही शिवसेनेची प्राथमिकता तेव्हा होती.(ar antule)   1980च्या आधी फक्त मराठी माणूस याच विषयावर आपला राजकीय गाडा हाकणारे बाळासाहेब(शिवसेना) ,जेव्हा मराठी गिरणी कामगार उध्वस्त होत होता आणी कामगार चळवळ लुप्त होत होती तेव्हा सुद्धा बाळासाहेब(शिवसेना) गप्प का बर बसले असतील?आपल्या विशेष शैलीत त्यांनी का उत्तर दिल नसेल?अशी बरीच प्रश्न आहेत जे आजही अनुतर्रीत आहेत. 1966 साली स्थापण झालेला पक्ष जेव्हा 15 वर्षे फक्त संघटना म्हणूनच जर काम करत असेल तर नक्कीच त्या पक्षाचा राजकीय मार्ग बिकट आहे असं वाटायला लागत,मराठी माणूस या मुद्द्यावर शिवसेनेचे काही प्रतिनिधी निवडून सुद्धा येऊ लागले आणी एक स्थानिक पक्ष म्हणून शिवसेना चांगलाच जम बसवू लागली आणी लोक सुद्धा स्वीकारू लागले,पण पाहिजे असे यश आणी प्रसिद्धी आजही शिवसेना मिळवू शकत नव्हती .पण डिसेंबर 1992 मध्ये जे झालं त्याने बऱ्याच जणांचं राजकीय नामकरण आणी पुनर्वसन केलं त्यामध्ये ,मराठी माणसाचा पाठीराखा ते हिंदू हृदय सम्राट हा प्रवास बाळासाहेब यांनी फक्त दोन वर्षात केला (1992-1993)बाबरी मस्जिद प्रकरण आणी

 त्यानंतर उसळलेल्या दंगली बाळासाहेब यांना राष्ट्रीय ओळख देऊन गेल्या ,कुठे एक स्थानिक पक्ष जो मराठी माणसाच्या हक्कासाठी लढतो किंवा लढला तो आता हिंदूंसाठी लढणार होता.त्यातली प्रामाणिकता आपण नंतर तपासून पाहू कारण सध्या तो आपला विषय नाहीये पण एक गोष्ट नक्की की ,मराठी माणूस आणी महाराष्ट्र आजही दुय्यम वागणूक पचवत असतो कारण ती सवय त्याला लावली गेलीये.1995 च्या निवडणुकीत शिवसेनेला त्याचा (1993 मुंबई दंगे )फायदा जरी झाला असला तरी तो क्षणिक होता
कारण आजपर्यंत शिवसेना एकदाही एकहाती सत्ता
आणू शकलेली नाहीये ,वय चोपन्न आणी जागा छप्पन"असं मानलं तरी चालेल.
पण एक बिनधास्त आणी धाडसी हिंदू नेता म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची ओळख पूर्ण देशात झाली.

Monday, April 4, 2022

राज ठाकरे भाजप मध्ये विलीन झाले आहेत का? raj thackeray emerged his political party into bhajap (bjp).


(Blog ला नक्की follow करा)
जर राजकारणाकडे तुम्ही भावनिक नजरेने बघत असाल तर हा blog तुमच्यासाठी नाहीये..राजकारण हा एक पूर्णवेळ व्यवसाय आहे आणि आपण त्याचे भांडवल ही खूणगाठ एकदा पक्की आपल्या मनाशी बांधून घ्या.. आणि मार्गक्रमण करा.. आता मुद्याकडं येऊ.. राज यांनी भूमिका बदलल्याची खंत असण्याचे कारण नाही, महाराष्ट्रातील सगळ्या पक्षांनी भूमिका बदलल्या आहेत, तात्कालिक गरज म्हणून, खुद्द बाळासाहेब आणि पवार यांनी भूमिका बदलल्या आहेत. पाडव्याच्या भाषणात राज हे तडजोड करताय हे स्पष्ट दिसत होतं, त्यात आतून निघालेला आवाज आणि तळमळ नव्हती, तर एक गरज आणि अपरिहार्यता म्हणून केलेला रीतसर तह होता.. म्हणजे डील ओ.. दोन तीन वर्षाआधी त्यांनी ,घड्याळ, घालून आपला वेळ बघितला पण तो बदलला नाही..अगदी मोठ्यामोठ्या मुलाखती झाल्या, सभा झाल्या, मोदींना झाप-झाप झापल तरी सुद्धा घड्याळं काही आपलंसं म्हणायला तयार झालं नाही.. विचारसरणी बदलायची तयारी ही राज ठाकरे यांनी केली होती, पण तो मार्ग विस्कटलाच.
दुसरा मुद्दा म्हणजे राज यांनी संघटना बांधणी आणि इतर गोष्टी सध्या दुय्यम ठेवल्याचं दिसत आहे, मनसे ची ब्रँड किंमत ही स्वतः राज ठाकरे आहेत, आणि त्यांनी आता त्यातच गुंतवणूक करायचे ठरवले आहे.कालच्या भाषणात आपल्याला ते प्रकर्षाने जाणवले असेल, जर काही ठिकाणी सत्तेत वाटा मिळाला किंवा मोठ्या पक्षासोबत जाऊन जनाधार आणि संघटन ही वाढेल, असा विचार राज ठाकरे यांनी केलेला दिसतो. सत्ता आली तर पक्ष जगत असतो, टिकत असतो नाहीतर खंडणी आणि धमक्या देऊन पैसे मागावे लागतात, आणि ते ठाकरे यांना नको आहे. आणि जर नव्याने पक्ष संघटन उभारायचे असेल तर ते वेळखाऊ आणि ठाकरे यांच्या तापट स्वभावला साजेसं नाहीये.. त्यामुळे त्यांनी हा शॉर्टकट मारलेला दिसतो.

दोन ते तीन वर्षांपूर्वी जेव्हा मनसेचे अधिवेशन झाले, तेव्हाच त्यांनी भाजप चा झेंडा हाती घेतला होता, आठवा, भगव्या रंगाचा झेंडा, मोठा इव्हेंट आणि फडणवीस यांच्या झालेल्या सतत भेटी.. म्हणून राज यांनी काल केलेलं भाषण ही काही दोन दिवसात झालेली स्क्रिप्ट नाहीये, तर डायरेक्टर देवेंद्र फडणवीस हे गेल्या अनेक(दोन-तीन)त्या स्क्रिप्टवर काम करताय. भाजप ने ज्या अडचणी राज यांच्यासोबत जाण्यात सांगितल्या होत्या, त्या सगळ्या राज ठाकरे यांनी आपल्या पाडव्याच्या भाषणात स्पष्ट केल्या आहेत, जस की उत्तरप्रदेश च्या मुख्यमंत्र्यांची स्तुती, प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका. जर सेनेचा मुकुटमणी, मुंबई, जर खाली खेचला तर शिवसेना खिळखिळ होईल हे फडणवीस यांना माहीत आहे, आणि या युतीचा तात्कालिक फायदा तोच आहे. जर राज यांचा पूर्ण महाराष्ट्रभर विचार केला तर सध्या तरी ते सेनेची जागा घेण्यास असमर्थ आहेत, हे स्पष्ट आहे. पण भाजप ने जर राज यांच्या रुपात आपला नैसर्गिक पार्टनर जर बघितला तर ती जोडी होण्याला वेळ लागेल.. आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे ग्रामीण भागातील कॅडर चांगले आहे.. त्यामुळे किल्ला खाली करायला वेळ तर नक्कीच लागणार आहे.. आणि फडणवीस यांचा स्वभाव बघितला तर ते कुणालाही डोक्यावर घेत नाहीत, त्यामुळे राज यांनी सुद्धा ते फक्त खांद्यावरच घेतील.


या नव्या प्रयोगात मनसेचा आणि भाजपचा सुद्धा फायदा आहे, मनसेत थोडा जीव येईल,आर्थिक परिस्थिती सुधारेल, चर्चा होईल, आणि जर मुंबईत सत्ता आलीच तर सत्तेत वाटा सुद्धा मिळेल.. पण जर दूरगामी परिणामाचा विचार केला तर सेनेला त्रास देण्यासाठी आणि मत फोडण्यासाठी राज यांचा फायदा भाजप नक्कीच घेईल.. पण किती दिवस सांभाळेल यात मात्र मला शंका आहे.(ब्लॉग ला follow करा.. आवडला तर कंमेंट्स नक्की करा).

Sunday, April 3, 2022

शिवसेनेच्या बदलत्या भूमिका-1

https://youtu.be/EY2m8z8O5Bg (link of my youtube channel..नक्की बघा.. वेगवेगळ्या राजकीय मी घडामोडींवर विडिओ बनवत असतो).

खूप दिवसांनी लिहितोय..तुम्हाला आवडेलच असं काही यावेळेस सुद्धा मी लिहिणार नाही.. डोळ्यासमोर होत असलेल्या गोष्टी जर नाकारायच्या असतील.. तर बोलणे टाळा.. आपोआप सगळ्या गोष्टी सुरळीत होतील.. लेख जसा जसा पुढे जाईल,तसे तसे संदर्भ तुम्ही लावले तर बरं होईल,, काहींना मी लिहलेल पटणार नाही, त्यांचं स्वागत आहे.. कदाचित तुम्हाला प्रसन्न करणारं मी लिहू शकत नसेल..महाराष्ट्रात शिवाजी महाराजांसोबत आपल्याला तुलना नको असते पण ती झालीये.. कदाचित तुमच्या अंतर्मनात ती तुम्ही मान्यही केली असेल.. अनेक दिवसांपासून ते तुमच्या डोक्यात बिंबवण्यात आलं आणि तुम्ही ते मान्य केलं.. बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोन नेत्यांची तुलना त्यांचे कार्यकर्ते आणि स्वतः ते करत असतात..(कधी त्यांनी बजावून सांगितलं आहे का, की आमची तुलना करू नका म्हणून)..पवारांना पत्रकारांकडून उधारीत भेटलेली कुशाग्र बुद्धिमता आणि बाळासाहेबांच केलेल उदात्तीकरण या दोन गोष्टींनी महाराष्ट्राची ओळख बदलून टाकली..
विचारसरणीशी आणि प्रादेशिक अस्मितेशी प्रामाणिक असलेल्या नेत्यांच्या आज एकहाती सत्ता आहेत, राज्यात भाषा आणि विकासाची वृद्धी होत आहे.दुर्दवाने महाराष्ट्र झाल्याच्या 62 वर्षांनंतर आज कुठे मराठी भवन उभं राहतं आहे.(2april)अस का?शिवसेनेची सत्ता तर 1995 ला आली होती,एवढंच नाही तर महानगरपालिकेत तर गेल्या कित्येक दिवसापासून त्यांची सत्ता होती मग तरीही मराठी आणि मराठी माणूस उपेक्षित का?तामिळ अस्मितेचा मुद्दा असो की वेगळ्या तेलंगणाचा आज aidmk aani trs हे राज्यातील सत्ता खेचणारे पक्ष आहेत, का? वैचारिक


io नैतिकता आणि तटस्थता..निदान आपला मूळ वैचारिक गाभा आणि जनतेची तळमळ या नेत्यांनी सोडली नाही(उदाहरण)या नेत्यांनीही देशपातळीवर राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण ,झेंडा भल्या कामाचा सोडला नाही, दक्षिणेतील लोकांना आणि उत्तर भारतातील लोकांना हाकलून देने हा कधीच योग्य आणि दूरगामी पर्याय असू शकत नाही.. आणि बाळासाहेबांनी(शिवसेनेने)तेच केलं, उद्याचा विचार न करता तात्पुरते यश बघितले.. भावनिक लाटेवर स्वार होऊन दूरगामी विचार न करता 1966-70 च्या दरम्यान दक्षिणेतील लोकांविरोधात मोहीम उघडली.. बर मान्य केलं ती तत्कालीन गरज होती म्हणून तस केलं..आज मुंबईत उडप्याचे गाडे कोणाचे आहेत?किती मराठी लोक तिथे धंदा करतात?या प्रश्नांची उत्तरे आज कोण देणार आहे.
जर परिस्थितीच बदलली नाही तर नक्कीच तेव्हा घेतलेल्या भूमिका या तकलादू आणि भावनिक होत्या.. मराठी माणसाचे अज्ञान आणि तत्कालीन गरज म्हणून लोकांनी शिवसेनेची ती भूमिका स्वीकारली..बाळासाहेबांचा उल्लेख वारंवार येतोय कारण 80 पर्यंत

 सेना म्हणजेच बाळासाहेब होते.संघटन कौशल्य असणाऱ्या व्यक्तीच्या कमतरता सहज झाकून जातात, कारण लोक युक्तिवाद करणं टाळतात आणि बाळासाहेब यांचे संघटन कौशल्य तर अफाट होते.. ते सगळ्या नेत्यांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे. मराठी माणसाचा मुद्दा उचलून शिवसेनेने भावनिक आणि संवेदनशील मुद्याला हात घातला होता, अडगळीत पडलेला आणि हिनावलेला मुद्दा शिवसेनेने किंबहुना बाळासाहेबांनी जनतेसमोर आणून एका नव्या राजकीय अध्यायाला सुरुवात केली होती.. मुळात तो मुद्दा चर्चेला आणण गरजेच होत आणि सेनेन केल याबद्दल एक मराठी माणूस म्हणून कायमच ऋणी राहील.पण नंतर शिवसेनेला आपला राजकीय कंगोरा अंग सापडत नव्हते म्हणजे डावे, उजवे की काँग्रेस अश्या पेचात शिवसेना अडकली होती..आपल्या राजकीय तडजोडीला वैचारिक त्याग किंवा गरज संबोधने म्हणजे ,भिकाऱ्याने उद्योगासाठी कर्ज काढण्यासारखे आहे, आणि हे आपल्याकडे नेहमीच होत आले आहे..आज जे लोक म्हणतात की शिवसेना काँग्रेस सोबत गेली नसती वैगेरे-वैगेरे (जर बाळासाहेब असते तर)पण तीच शिवसेना सुरुवातीला काँग्रेस च्या मदतीला धावली होती.. शिवसेनेला सुरुवातीच्या दिवसात  'वसंत' सेना ही म्हंटल्या जात असे.

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...