Tuesday, September 21, 2021

वारकरी संप्रदायाच्या बदलत्या स्वरूपावर आपण अजून किती दिवस गप्प बसणार आहोत?

वारकरी संप्रदायाच्या ऱ्हासाची जबाबदारी कोण घेणार?

महाराष्टात हजारो वर्षांपासून वारकरी संप्रदाय आहे. संत तुकाराम महाराज यांच्या काळापासून आज पर्यंत वारकरी परंपरा चालत आली आहे. दर वर्षी लाखो लोक पंढरपूर च्या विठोबाचं दर्शन घेण्यासाठी विठ्ठल नामाचा गजर करत पायी चालत जातात. वर्षातून दोन वेळा पंढरपूर वारी करतात अतिशय भक्ती भावाने या वारीचा आनंद वारकरी घेतात.
महाराष्ट्राच्या सामुदायिक ओळखीचा कणा वारी आणि वारकरी आहेत, पण काही चुकीच्या पद्धतीमुळे आज वारकरी संप्रदाय बदनाम होत आहे, नकारात्मकता पसरत आहे त्यावर जाहीररीत्या कोणीच बोलायला तयार नाही ,त्याला आपण आदरयुक्त भीतीही म्हणू शकतो हवं तर.पण येत्या काही वर्षात काही बदल आणि फरक नाही पडला तर नव्या आणि येणाऱ्या पिढीला वाटेल की हाच मूळ वारकरी संप्रदाय आहे.बीग बॉस या शोमध्ये आपल्या राज्यातील एक नामांकित कीर्तनकार गेल्या,जाण्याबद्दल काही नाही सगळ्यांना हक्क आहे पण आपण आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून इतक्या दिवस ज्या tv वाल्यांना शिव्या घालत आलोत आज संदर्भासह स्पष्टीकरण देऊन show मध्ये प्रवेश करतो.अस का? किर्तनकाराच्या पायाखाली एक आसन असतं ते तुम्हाला सर्वोच्च अधिकार देत असत,पण त्याच बरोबर मर्यादा ही घालून देत असत,तुकाराम महाराज म्हणतात की कीर्तनकाराने यजमानाच्या घरी जेवलेही नाही पाहिजे, तुम्ही एवढे कटाक्षाने नियम पाळावे अशी आमची अपेक्षा ही नाहीये पण जर संप्रदायामध्ये अधिकाराच्या गोष्टी होत असतील आणि मर्यादा ओलांडल्या जात असतील तर कीर्तन हे फक्त मनोरंजनाचे साधन होईल,, आज प्रत्येक महाराज आणि संस्था आपल्या वारकरी संप्रदायाच्या साच्यात न बसणाऱ्या गोष्टीचं स्पष्टीकरण देताना दिसतात, आपल्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न करतात, मग जर अस असेल तर माऊलींची आणि तुकोबांची गरज ती काय? कित्तेक लोकांच्या जगण्याचा अनिवार्य भाग आज संप्रदाय आहे, ते निस्सीम अनुयायी आहेत खरा वारकरी संप्रदाय त्यांच्या वागण्यातून आणि बोलण्यातून जिवंत राहतो,, मग त्यांच्या भावनांचा हे सर्व ह. भ. प करत नसतील का?

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...