आमचा जाणता राजा आमचे छत्रपती आमच्यासाठी जीव आहेत, मनाच्या आणि बुद्धीच्या कोपऱ्यात ते आजही वावरतात निदान त्यांच्यासाठी तरी आजच्या छत्रपतींनी स्वाभिमान जपणे गरजेचे आहे, महाराष्ट्र हा नेता निवडण्याच्या बाबतीत खूप चिकट आणि धूर्त आहे, नेत्याचा संयम आणि वैचारिक प्रामाणिकपणा व कष्ट करण्याची वृत्ती ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र आधी चाचपडून पाहतो मग त्या नेत्याच्या आणि त्या पक्षाच्या झोळीत भरभरून यश टाकतो.
नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे, सर्वप्रथम तुम्ही माझ मत जाणून घेण्यासाठी इथपर्यन्त आलात त्याबद्दल तुमचे आभार! या ब्लॉगस्पॉटमार्फत मी देशातील राजकीय गोष्टीवरील माझे निरीक्षण आणि त्याच झालेलं माझं आकलन मी याठिकाणी लिहीत असतो. "व्यक्ति तितक्या प्रवृत्ती" या गुणधर्मानुसार, इथे लिहिलेली मते ही सर्वस्वी माझी मते असल्याने ती सर्वाना पटतील असं नाही. पण याठिकाणी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन की येथील मते ही निपक्षपाती आणि सर्वसामान्य लोकांना आकलनात येतील अशी असतील.
Tuesday, May 31, 2022
अपमान गादीचा की महाराजांचा?
खरंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य बिनदिक्कत उभं केलं असं म्हणतात येणार नाही.. असंख्य अडचणींचा सामना त्यांनी केला, त्यात परकीय लोकांसोबत आपल्या लोकांचा सुद्धा बंदोबस्त त्यांनी केला. त्यामध्ये सर्व जातींचे लोक होते, ब्राम्हण, मराठा आणि इतरसुद्धा, त्याच्यापुढे जाऊन सांगायचे झाले तर मोहिते, जाधव, निंबाळकर जे महाराजांच्या नात्यात होते, त्यांचा बंदोबस्त सुद्धा छत्रपतींनी केला. कारण त्यांचं ध्येय निश्चित होत ते म्हणजे आपल्या लोकांचं राज्य, ज्या राज्यामध्ये आपल्या परंपरा जपल्या जातील, आणि स्वतंत्र कारभार हाकता येईल, हा त्यामागचा शुद्ध हेतू होता. त्यामुळे महाराजांच्या सोबत महाराष्ट्रातील सगळा समाज उभा ठाकला आणि सामाजिक कार्य म्हणून स्वराज्य निर्मितीत सहभाग घेतला. जनतेने महाराज छत्रपती झाले म्हणून त्यांचा सन्मान मुळीच केला नाही, तर एक प्रजासक्त आणि दूरदृष्टी असलेला व्यक्ती छत्रपती होतोय याचा आनंद आणि अभिमान लोकांना होता. छत्रपतींच्या गादीचा आजही आपण सगळे सन्मानच करतो, आणि तो आपण ऋण म्हणून करायलाही पाहिजे. पण एकंदरीतच मराठा साम्राज्य आणि महाराष्ट्र धर्माचा जर विचार केला तर शिवाजी महाराजचं छत्रपती या शब्दाची ताकत परिधान करतात, कारण त्यामागे जनभावना होती. आपण जर महाराजांच्या नंतरचा मराठ्यांचा इतिहास तपासला तर त्याची जाणीव आपल्याला होते, मनाच्या कोपऱ्यातून छत्रपती हा आवाज येतो तो फक्त शिवाजी महाराजांसाठीच..आणि तो तिथपर्यंतच जर सीमित राहिला तर ते आपल्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी सुद्धा चांगले आहे.. कारण अनेक राजकीय आणि सामाजिक संघटनांनी नेहमीच आपल्या नेत्यांची तुलना महाराजांशी करून त्यांना ठेंगण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, जे की महाराजांना सरासरी बनवत असते.. त्यामुळे लोकांची निष्ठा छत्रपती या शब्दावर तेव्हाही होती आणि आत्ताही आहे.. गरज आहे ती त्या भूमिकेत शिरणार्या व्यक्तीची..
Tuesday, May 24, 2022
राजे तुम्ही चुकताय..
लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलायचं धारिष्ट्य करतोय.. यात मी फक्त माझ्या वयक्तिक भावना मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.. यात मी कोणतेही तर्क किंवा समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न केलेला नाही.. राजे तुमचं वजन किंवा उपद्रव्यमूल्य हे निवडणुकीत नाहींचये.. तुम्ही याआधीही प्रयत्न केलात तेथेही फसलात हरकत नाही.. मराठा मोर्चात प्रयत्न केला तेथेही फसलात हरकत नाही.. पण आता चक्क तुम्ही पदाची मागणी करताय? तुम्ही कोण
आहात? तुमच्या नावाच्या आधी राजे लागतं ही राज्यसभेपेक्षा मोठी पत आहे, आणि ती जर एकदा गमावली तर सर्वस्व गमावून बसाल.. सर्व राजकीय पक्ष आणि लोक आता चतुर झाले आहेत, जातीय आणि सामुदायिक एकता फोफायतीये आणि त्यातून वंशज या प्रजातीचे महत्व संपत आहे.. लोक ना आंबेडकरांच्या वंशजाला गाह्य धरतात ना शाहूंच्या वंशाजाला गाह्य धरतात.. आज कित्येक इतिहासातील मोठ्या लोकांचे वंशज नोकरी करून पोट पोसतात.. हे सत्य आहे राजे.. भावनिक दिलासा आणि मतरुपी दिलासा यात फरक आहे.. शिवसेना असो की धूर्त भाजप कावेबाज राष्ट्रवादी आणि दलबदलु मनसे हे गिधाड आहेत, यांच भक्ष होऊ नका राजे.. जिथे फायदा तिथे वायदा याच तत्वावर या लोकांनी राज्यसभेवर उमेदवार पाठवले आहेत, त्यामुळे ते तुम्हाला का पाठवतील? आम्हाला तुमच्याशी किंवा तुमच्या इतर वंशजांशी कर्तव्य नाही, पण आमचा जाणता राजा आमचे छत्रपती आमच्यासाठी जीव आहेत, मनाच्या आणि बुद्धीच्या कोपऱ्यात ते आजही वावरतात निदान त्यांच्यासाठी तरी आपण आपला स्वाभिमान जपावा कारण आपल्या आणि आपल्या इतर भावांच्या वागणुकीतून वेळोवेळी महाराजांना अपमानित व्हावं लागत आहे.. तुम्हाला महाराष्ट्र नक्कीच स्वीकारेल राजे.. आजमावून तर पहा.. सवंगडी तर गोळा करा, आधी महाराष्ट्र हिंडा तरी.. काही वर्ष सक्रिय राजकारणात द्या राजे.. प्रकाश आंबेडकरांनी केलेली चूक करू नका राजे..
Wednesday, May 11, 2022
अवतारच्या निमित्ताने..अवतार philosophy..
अवतार म्हंटल की बऱ्याच जणांना लगेच आपल्या हुशारकीची जाणीव होते, आणि दुसऱ्याच्या अंधश्रद्धेची.. असो 2009 साली आलेला अवतार नावाचा सिनेमा खूप गाजला अगदी हजारो कोटींची कमाई चित्रपटाने केली.. आता याच वर्षात त्याचा दुसरा भाग येत आहे.. अवतार 2. सिनेमा तांत्रिक दृष्ट्या तर उत्तम होताच पण चित्रपटाचा आशय आणि विषय हा तंत्रज्ञानाच्या पलीकडे होता, हे मात्र नक्की.. अवतार ही संकल्पना आपल्याकडे इतकी धार्मिक आणि कुचंबीत करून टाकली की त्याला कर्मकांड आणि अंधश्रद्धेचं रूप देऊन टाकलं.. मला समजत नाही मारवल आणि डीसी यांचे चित्रपट पाहणारे लोक कल्पनाविश्वात रमतात, अगदी तत्वज्ञान आणि इतर वैचारिक चर्चा त्यावर करतात, पण मग अवतार सिनेमा च्या तत्वज्ञानावर कोणी बोलत नाही.. कारण भारतीय संस्कृतीची पार्श्वभूमी ज्या गोष्टीला असते ती आपल्यासाठी संकुचित आणि कालबाह्य ठरत असते.. चित्रपटाचे नावच हे नवनिर्मितीचा संदेश देते, अवतार म्हणजे तारणहार समाजाला वाचवणारा हिरो असा त्याचा आजच्या काळात अर्थ घेतला तरी चालेल..गीतेच्या ओळींमध्ये अवतार या शब्दाचा उल्लेख सापडतो धर्मस्थापणेच्या निमित्ताने मी पुन्हा पुन्हा अवतार घेईल आणि धर्माची स्थापना करेल.. अवतार सिनेमाचे कथानकही त्याच अंगाने पुढे सरकते..माणसाच्या महत्वाकांक्षा या अतिशय राक्षसी आणि क्रूर बनत चालल्या आहेत, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, हत्या करणे आणि ताकतिच्या जोरावर साधनसमत्तीची लूट करणे हे भयानक आणि क्रूर वास्तव आपल्याला अवतार मध्ये दिसते.. दुसऱ्या बाजूला एक असं जग आहे जेथे मानवी संवेदना या शुद्ध आहेत, हिंसेचा विचारही त्या लोकांच्या मनाला शिवत नाही.. पण दुसऱ्या जगात वावरणारी माणूस नावाची जमात आपल्या फायद्यासाठी त्यांचं जग उद्धवस्त करू पाहत आहे.. हे जरी दोन वेगळे जग दाखवले असले तरी यातून समाजाचे दोन भाग, तसेच माणसाचे दोन पद्धतीचे विचार नैतिकता आणि क्रूरता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो.. आणि आपल्यासमोर एक प्रश्न ठेऊन जातो की नेमकी विकासाची व्याख्या काय आहे? आज आपण चंद्रावर आणि मंगळावर घर शोधत आहोत, ठीक आहे आपण आपले कल्पना विस्तार करत आहोत पण हे निसर्गाच्या नियमाला धरून आहे का? महत्वकांक्षा आणि लालूच या दोन गोष्टीत फरक आहे.. आणि नेमकं तेच अवतारमध्ये आपल्याला दिसत.. सिनेमा अप्रत्यक्षपणे राजकीय आणि
सामाजिक भाष्य करतो आणि त्यासाठी निसर्गाचा आणि अध्यात्माचा उपयोग करतो..कृष्णाचा मूळ कलर हा धर्मग्रंथात निळा दाखवलेला आहे आणि यातील दुसऱ्या जगात राहणारे लोकसुद्धा (pandora) निळे असतात.. म्हणजे त्याच्यामागे कदाचित तेथे राहणारे लोक हे देववृत्तीचे आहेत असा प्रयत्न कदाचित दिग्दर्शक करत असावेत.. अवतार सिनेमा हा फक्त आपण तांत्रिक दृष्ट्या किती पुढं गेलो आहोत एवढंच सांगण्यासाठी मुळीच नाहीये, तर आपण पुढे जाण्याच्या नादात उद्याच्या पिढीसाठी काय
Tuesday, May 3, 2022
फक्त 'राज'कारण..
एखाद्या भुकेजलेल्या व्यक्तीला जर अन्न दिले तर तो मांसाहार आहे की शाकाहार हा विचार करत नाही. अगदी राज यांच तसंच झालेलं आहे, मराठीचा मुद्दा सोडून हिंदुत्व धरल्यानंतर राज यांच्यात अनेक बदल झाले आहेत.पण जर तुम्ही राज ठाकरे यांना गेल्याकाही वर्षांपासून जर फोल्लो करत असाल तर ते बदल तुमच्या लक्षात येतील.. पक्ष जिवंत ठेवणे आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या अध्यायाल राज सुरू करू पाहत आहेत.. उदार आणि स्पष्ट भूमीकेसाठी ओळखले जाणारे राज, आपल्या पक्षाच्या झेंड्यात
निळा आणि हिरवा रंग घालणारे राज आज कट्टर हिंदुत्त्ववादी का झाले? राज ठाकरे यांनी हा भोंग्याचा मुद्दा आणि एकंदरीतच आक्रमक हिंदुत्व हा मुद्दा स्वइच्छेने घेतला का? तर याच उत्तर मला नाही, असं वाटत आहे.. राज गेल्या दोन वर्षांपासून राज्यात आपली जागा तयार करू पाहत आहेत, गेल्या महिन्यात त्यांना सूर सापडला आणि औरंगाबादच्या सभेत त्यांनी राग छेडला.. पण एक गरज म्हणून त्यांनी ही भूमिका घेतली असं वारंवार जाणवतं, कारण मराठी बाणा आणि कमीत कमी इस्लाम द्वेष करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करताना दिसून येतात.. किंवा मुसलमान विरोध करताना ते थोडे अस्वस्थ वाटतात.. संभाजीनगरची सभा एकदा पुन्हा बघा मग तुम्हाला ते कळेल.. बाळासाहेबांचं राजकारण हिंदुनिष्ठ होतंच, पण ते कुठेतरी मुसलमान शत्रूकेंद्री होत.. आणि राज यांना सुद्धा ते
आता करावंच लागेल.. राज यांनी ही नवी भूमिका तात्पुरती घेतल्यासारखी वाटत नाही.. कारण राज्यात सध्या आक्रमक हिंदुत्त्वाच्या मोठा स्पेस खाली आहे आणि राज ठाकरे तो घेऊ पाहत आहेत.. भाजपच्या मदतीने कदाचित ते घेतीलही.. पण भाजप राज यांना सामावून घेईल का? हा महत्वाचा प्रश आहे. पण सध्याचा विचार केला तर नक्कीच भाजप आणि मनसे यांच्या युतीला चांगलाच स्कोप आहे. या दोन वर्षाच्या कार्यकाळात जर मनसेने फक्त स्वतःला शिवसेनेचा पर्यायी पक्ष म्हणून सिद्ध करण्यात घालवली तर नक्कीच राज्यात त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण होईल, पण जर विषय घेऊन धरसोड आणि भाजप सोबत जर युती झाली आणि मिळालेला वाटा घेऊन मनसे शांत राहिली तर त्यांची अवस्था सुद्धा मनसे सारखीच होईल.. आणि भाजपचा पुरेपूर प्रयत्न असेल की मनसे नावाचे नवहिन्दू फक्त महानगरपालिका पुरतेच मर्यादित राहावे जेणेकरून त्यांच्यावर चुकीचा प्रभाव पडायला नको.. पवार यांच्यावर टीका करून राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस हे
Subscribe to:
Posts (Atom)
Latest post
Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)
Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...
-
देशात लोकसभेच्या निवडणूकीचा वेगळा ट्रेंड सुरु होता, आणि दक्षिण भारतात खास करून आंध्र प्रदेशात वेगळा ट्रेंड सुरु होता.. एका टी-ट्...
-
विजय तामिळनाडू मधील जगप्रसिध्द असलेला एक कलाकार हव तर हिरो म्हणा.. राज्याच्या राजकारणात सक्रिय होत आहे.. सूर्याची जशी दुरून आपण वर्णने करतो,...
-
2024 विधानसभा निवडणुका या राज्यातील प्रादेशिक तसेच महत्वाच्या दोन्हीही राष्ट्रीय पक्षांसाठी एक निर्णायक संदेश देणार्या होत्या. निवडणुकीपूर...