2019 ला आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणात जो नवा अध्याय राज्यातील नेत्यांनी सुरु केला होता, त्या अध्यायाचे जनक फक्त उद्धव ठाकरे, फडणवीस, अजित पवार एवढीच लोकं नव्हते त्यामध्ये अजून एक नाव होत जे दुर्लक्षित राहिल होत ते नाव म्हणजे सध्याचे काँग्रेस अध्यक्ष खर्गे.. 2019 ला महाविकास आघाडीचा जो उदय झाला होता त्याच्यामध्ये महत्वाचा हात खरगेंचा होता.. महाराष्ट्राचे त्यावेळचे प्रभारी (incharge )ते होते.. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी अत्यंत तोलामोलाची बोलणी करून खरगेंनी राज्याच्या सत्तेत काँग्रेसला वाटा मिळवून दिला होता.. खरगेंच्या अवास्तव मागण्यांचे कारण देऊनच अजित पवारांनी भाजपचा हात पकडला अशी माहिती काही पुस्तकात सुद्धा छापून आलेली आहे.. लोकसभेला थेट मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना ही सध्यातरी बरोबरीची नाही, ती जवळ येणारी असली तरी बरोबरीची मात्र नाही.. त्यामुळे भाजप सारखं संपूर्ण देशात एकाच प्रचार प्लांनिंग वर काँग्रेसला निवडणुका लढवता येणार नाहीत..
आपल्या राज्याच्या बाबतीत विचार केला तर हिंदुत्व, धर्म, जातीय अस्मिता या सध्या वरचढ दिसतात, अगदी वापरायला सहज असल्यामुळे त्या कशाही पद्धतीने वापरता येतात पण राज ठाकरेंच्या भोंगा आंदोलनाला मिळालेला अल्प प्रतिसाद, पठाण, जवान यांसारख्या सिनेमांचा महाराष्ट्रात झालेला बोलबाला, राज्यात पुन्हा जागृत झालेल्या जनतेच्या जातीय अस्मिता, राज्यात झालेली उत्स्फूर्त आंदोलणे ही काहीतरी सुचवून जाणारी आहेत.. धार्मिक अस्मिता जश्या महत्वाच्या आहेत, तसाचा रोजच्या जीवनातला सहजपणा आणि सामाजिक सलोखा महत्वाचा आहे.. असा त्याचा अर्थ निघू शकतो..
महाराष्ट्राची मराठी, प्रादेशिक अस्मिता ही बोथट जरी असली तरी जिवंत मात्र आहे.. जेव्हा तिला योग्य दिशा आणि जनाधार मिळेल तेव्हा महाराष्ट्र हे राज्य सुद्धा आपला विकास साधून अस्मिता जपणार राज्य होऊ शकत.. दक्षिणेतील राज्यासारखा.. यावेळच्या लोकसभा निवडणुका सुद्धा काँग्रेस आणि विरोधी पक्षाकडून भाजपच्या हिंदुत्व आणि विकासकामांना प्रतिउउत्तर म्हणून महाराष्ट्राची अस्मिता, मुंबई, इतर राज्यात (खास करून गुजरात ) गेलेले उद्योग या मुद्द्यानवर लढवू पाहत आहे.. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही जर आपण नीट लक्षात घेतली तर आपल्याला कळेल की या यात्रेचा हेतू भारत जोडणे हा नव्हता तर प्रत्येक राज्यातील जनतेच्या, समाजाच्या, संबंधित भाषेच्या अस्मिता जागवणे हा होता.. मी या आधी कोणत्याच राष्ट्रीय स्थरावरील नेत्याला तुम्ही माझ्याशी मराठीत बोला, किंवा पत्रकारांना मराठीत प्रश्न विचारण्याची विनंती करताना पाहिल नाही.. जे की मी भारत जोडो यात्रेत पाहिल होत.. याचा अर्थ भाजपचे हिंदुत्व आणि संघटना यांचा तोड काढण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न केले पण ते त्यांना जमले नाही.. कदाचित काँग्रेसची सक्रिय नसलेली संघटना, अंतर्गत वाद आणि संघर्ष, या गोष्टी भारत जोडोचा राजकीय फायदा न होण्यासाठी कारणीभूत ठरल्या असतील किंवा ठरत असतील..
पण महाराष्ट्राच्या बाबतीत यावेळेस काँग्रेस आणि भाजप हे दोन्हीही पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरण्याची शक्यता आहे.. मोदींचा जादूगर सारखा प्रभाव, संवादशैली, रिलच्या जमान्यात रिलेवंट राहण्याची कला या गोष्टींना सध्यातरी म्हणावा तसा तोड काँग्रेसकडे नसला तरी खरगेंना येणारी अस्सल ग्रामीण मराठी, गुजरातला गेलेले उद्योग, जातीत विभागलेला महाराष्ट्र, महाराष्ट्राच्या समाजरचणेत आणि इतिहासात असलेला पुरोगामीपणा, वेगवेगळ्या संघटना यांची झालेली आंदोलने ही महाराष्ट्राच्या 2024 च्या लोकसभा निवडणूकीला फक्त हिंदुत्व आणि राम केंद्री निवडणूक बनवत नाही...