देशात लोकसभेच्या निवडणूकीचा वेगळा ट्रेंड सुरु होता, आणि दक्षिण भारतात खास करून आंध्र प्रदेशात वेगळा ट्रेंड सुरु होता.. एका टी-ट्वेंटी मॅचसारखे वातावरण तेथे निर्माण झाले होते.. चंद्रबाबू नायडू, पवन कल्याण, bjp विरुद्ध जगन मोहन रेड्डी असा खेळ आंध्रत सुरु होता.. पवन कल्याण हा फक्त भाजपसाठी तात्कालिक किंवा निवडणूकीपुरता मोहरा नाहीये.. 2024 च्या लोकसभेत नायडू यांना पवनच्या मध्यस्तीनेच आणण्यात आले.. व विधानसभा, लोकसभा निवडणुका लढवण्यात आल्या.. आक्रमक बॉडी लँगवेज, देहबोली, कृतीतून लोकांत पडणारी छाप या गोष्टी भाजप पर्यायाने हिंदुत्वाचे विचार दक्षिणेतील लोकांपर्यंत नेण्यात प्रभावी ठरू शकतात.. याआधी भाजपने रजनीकांत यांना यासाठी सोबत घेण्याचा प्रयत्न केला पण ते जमले नाही.. स्ट्रॉंग मेसेज ला पोहचवन्यासाठी नेताही तेवढाच प्रभावी आणि रिलेवंट असावा लागतो.. फक्त सुपरस्टार किंवा पॉप्युलर असून चालत नाही.. पवनला स्टार म्हणून मानणार गट आणि नेता म्हणून मानणारा गट एक जरी असला तरी जनता एक गंभीर आणि लॉंग टर्म राजकारणी म्हणून पवन कडे बघू लागली आहे.. भरपूर पैसा, प्रसिद्धी आणि केंद्रातील सरकारच्या मदतीने भाजपच्या दक्षिण दिगविजय मोहिमेचा एक प्रमुख सारथी म्हणून पवन कडे आपण बघू शकतो.. केरळ आणि तामिळनाडूमध्ये सुद्धा भाजप आणि समविचारी पक्षांच्या मताची टक्केवारी वाढली आहे.. म्हणजेच डांबर रस्त्याचे डांबर बाजूला पडून आतला मुरूम बाहेर यायला सुरुवात झाली आहे.. फक्त मुरूम ओढणारे प्रभावी आणि मास अपील असलेले लोक भाजपला हवे आहेत.. त्यापैकी एक पवन आहे.. मुख्यमंत्रीपद सोडून इतर पदात पवनला रस नसावा त्यामुळे स्थानिक सरकार आणि प्रशासन चालवण्यासाठी नायडू सक्षम आहे.. नेमका याचाच उपयोग पवन स्वतःच्या पक्षाचा आणि स्व प्रतिमेचा विस्तार करण्यासाठी करू शकतो.. उत्तरेत मोठा वैचारिक तक्तापालट होण्याच्या मार्गावर आहे.. एखादी मोठी दंगल, सामाजिक विद्वेष, धार्मिक ध्रुवीकरणाला वाव देणाऱ्या घटणा जर उत्तरेत घडल्या नाही तर उत्तरेतील जनता अत्यंत व्यावहारिक आणि सलोख्याच्या राजकारणाचा मार्ग अवलंबू शकते.. त्यामुळे उत्तरेत काँग्रेसला पर्यायाने काही स्थानिक पक्षांना ग्रो होण्याला वाव आहे.. याउलट आपल्या धार्मिक भावना, सांस्कृतिक इतिहास आणि अस्तित्व याची जाणीव दक्षिणेतील बहुतांश हिंदू, आदिवासी-दलित हिंदू यांना होऊ शकते त्यामुळे भाजप आणि सेंट्रल-राइट असलेल्या प्रभावी वक्तृत्व, जनसमर्थन, जमिनीशी जोडलेल्या असलेल्या नेत्यांना दक्षिणेत मोठा वाव आहे.. पवन कल्याणने आपला राजकीय परीघ फक्त मुख्यमंत्रीपद आणि आंध्रपुरताच जर सीमित ठेवला तर त्यात भाजप आणि दक्षिणेतील हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांसाठी, पक्षांसाठी हा न झालेला फायदा ठरू शकतो..
नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे, सर्वप्रथम तुम्ही माझ मत जाणून घेण्यासाठी इथपर्यन्त आलात त्याबद्दल तुमचे आभार! या ब्लॉगस्पॉटमार्फत मी देशातील राजकीय गोष्टीवरील माझे निरीक्षण आणि त्याच झालेलं माझं आकलन मी याठिकाणी लिहीत असतो. "व्यक्ति तितक्या प्रवृत्ती" या गुणधर्मानुसार, इथे लिहिलेली मते ही सर्वस्वी माझी मते असल्याने ती सर्वाना पटतील असं नाही. पण याठिकाणी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन की येथील मते ही निपक्षपाती आणि सर्वसामान्य लोकांना आकलनात येतील अशी असतील.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)
Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...
-
देशात लोकसभेच्या निवडणूकीचा वेगळा ट्रेंड सुरु होता, आणि दक्षिण भारतात खास करून आंध्र प्रदेशात वेगळा ट्रेंड सुरु होता.. एका टी-ट्...
-
विजय तामिळनाडू मधील जगप्रसिध्द असलेला एक कलाकार हव तर हिरो म्हणा.. राज्याच्या राजकारणात सक्रिय होत आहे.. सूर्याची जशी दुरून आपण वर्णने करतो,...
-
2024 विधानसभा निवडणुका या राज्यातील प्रादेशिक तसेच महत्वाच्या दोन्हीही राष्ट्रीय पक्षांसाठी एक निर्णायक संदेश देणार्या होत्या. निवडणुकीपूर...
No comments:
Post a Comment