Saturday, May 29, 2021

टोकाचा ब्राम्हण विरोध एक मानसिक आजार...!




(मिटकरींच्या भाषणाचा संदर्भ) जे दिसत ते मांडायला खूप मोठं धाडस लागत असत.. पत्रकाराने वस्तुनिष्ठ राहावं जात किंवा धर्माच्या आड येऊन सत्य लपवू नये.. हा लिहण्यामागे तेच कारण आहे, ब्राम्हणांचा द्वेष किंवा राग हा सामाजिक कारणासाठी एकवेळ मान्य करू, कारण इतिहास आपली पाठ कधीच सोडत नाही, आणि भविष्याची चिंताही.. पण बदललेल्या राजकीय वातावरणातून माझ्या डोक्यात सतत एकच गोष्ट पुन्हा पुन्हा पडत आलीये, ती म्हणजे ब्राम्हणांचा धुर्तपणा आणि कर्मठपणा.. श्रेष्ठत्वाची हाव कोणत्याच बामनाची सुटत नाही.. असे लेख, भाषणं मी नेहमी ऐकत आलोय. यामुळे होत असं की संपूर्ण जातीबद्दलचं विचार संकुचित व्हायला लागतात..  प्रत्येकाला काहीना काहीतरी मानसिक आजार असतोच, कधी समाजाच्या धास्तीने  तर कधी अपराधीपणाच्या भीतीने व्यक्तीचे मानसिक आजार आत तसेच दडून राहतात..आणि माणूस त्यासोबत जगायला शिकतो.
एखाद्या व्यक्तीच्या आधारे संपूर्ण समाजाचे मूल्यांकन करणे हे अतार्किक आणि अनैतिक आहे, आज मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न चिघळला असताना, फक्त 10 ते 20 टक्के मराठा समाज हा श्रीमंत आहे बाकीचा मिश्र किंवा गरीब आहे असा युक्तिवाद चालु आहे, म्हणजे आरक्षणाचा विचार करताना समाजाचे सरासरीकरण होत नाही मग चारित्र्य ठरवताना सगळ्यांचे सरासरीकरण कसे होते?
आज पारधी स्वतःवर लागलेला गुन्हेगारीचा शिक्का मोडावा यासाठी लढतायेत, प्रत्येक मुस्लिम हा दहशदवादी आणि देशविरोधी नसतो ही सगळ्यांच्या मनातली भावना आहे, दलित हा शब्द उच्चारू नये यासाठी सुद्धा प्रयत्न चालु आहे, हे सर्व प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष चालु आहे समूह म्हणून आपल्यावर लागलेल्या डागांची मोहीम चालु आहे, आणि जेव्हा ब्राम्हण समाज याचा प्रयत्न करतो तेव्हा तो कावा होतो, डाव होतो..!

मुळात दिवसेंदिवस समाज या संकल्पनेची व्याख्या बदलत असताना आपले हे क्रांतिकारी "संकुचित "विचार फक्त व्यक्तीची च नाही तर समाजाची पण प्रगती खुंटवत असतात.
जागतिकीकरण आणि स्मार्टफोनच्या जगात माणसाच्या फक्त जाणिवाच नाही तर समूहहीत साधण्याची वृत्ती आणि स्वार्थ साधण्याची कला ही बदलली आहे ती जागा आता "हावरटपणाने "घेतली आहे माणूस हा दिवसेंदिवस आत्मकेंद्री आणि कुटुंबकेंद्री बनत आहे.

धार्मिक आणि जातीय अस्मिता (प्रादेशिक ) संपूर्ण जगात टोकदार बनत आहेत, झुंडबळी जाण ही जणू काही प्रथाच झाली आहे. एखादा व्यक्ती खुलेपणाने आपले विचार मांडायला थबकतो टोकाचं असेल तर तो बोलणं टाळतो याच कारण फक्त केंद्र सरकार आहे का ? नाही संबंधित समाजाच्या झुंडी माझ्यावर कधीही हल्ला करू शकतात त्या जातीला वारसाहक्काने मिळालेल्या महापुरुषाबद्दल काही चुकीचे बोलल्यास जीवाची खैर नाही, अश्या असंख्य गोष्टी मनात उभ्या राहतात. ब्राम्हण समाजाबद्दलचा तिरस्कार नेहमी पोटातला ओठावर येतो, जाहीर सभेत ब्राम्हण समाजाचे अवडंबर होते, मुख्यमंत्री ब्राम्हण आहे म्हणून पांडुरंगाची पूजा करू दिल्या जात नाही,  त्या व्यक्तीच्या प्रत्येक कामाकडे जातीय नजरेतून पाहणे कितपत योग्य आहे? हे सर्व होत, पण हिंस्र झुंडी का तयार होत नाहीत? ब्राम्हण हा कपटी आणि दगलबाजचं असतो हे सत्य आहे की स्वतःला दिलेला दिलासा ? आपली कुशलता आणि संघर्ष करण्याची वृत्ती ही फक्त इथपर्यंत च?फक्त इतिहासाचा आधार घेऊन आणि ऐकलेल्या थोतांडाच्या नुसार तुम्ही एखाद्या समाजाचे मूल्यांकन करून मत बनवत असाल तर "या भारतात "बंधुभाव नित्य वसू दे हे म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये.
ब्राम्हण फक्त ब्राम्हणांना पोसतो आणि धूर्तपणे बाकीच्याना नाकारतो, कदाचित असेलही पण यापासून आज कोणता समाज वंचित राहिला आहे ? आपलं अस्तिव आणि कर्तृत्व सिद्ध करण्याच्या ऐवजी इथे लॉबिंग चालते म्हणून पळ काढणे कितपत योग्य आहे ?
ब्राम्हण विरोध हा तिरस्काराचा रूपात हल्ली समोर येत आहे, याचा आधार आणि संदर्भ फक्त आणि फक्त वेगवेगळ्या माध्यमातून केला गेलेला अपप्रचारच आहे..
वैचारिक दहशदवादी, समाजविघातक असे द्योतक लावणे आणि ते ही सरसकट अख्या समाजाला ही एका प्रकारची आधुनिक "अस्पृश्यताच "आहे.




Tuesday, May 11, 2021

जो काँग्रेस चा भूतकाळ तोच भविष्यकाळ (निवडणूक निकाल भाग दोन )

(हा स्पेसिअल विषय घेऊन पुन्हा एकदा लिहिणार आहे )
जशी तुम्ही कुटुंबव्यवस्था नाकारू शकत नाही तसच काहीतरी काँग्रेस या पक्षाचं सुद्धा आहे. काँग्रेस हा पक्ष होता तो 1947 च्या आधी त्यानंतर ती एक व्यवस्था झाली. सर्व लाभार्थ्यांची एक हक्काची जागा झाली, नंतर एक एक क्षेत्र काँग्रेसमय होत गेलं, भारतातील लोकांना फक्त कुणीतरी शासन करणारा हवा असतो राज्यकारभार हाकणारा कुणीतरी हवा असतो "सक्रिय गुलामगिरीची "जाणीव होऊ नये यासाठी. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा हेतू जरी व्यापक असला तरी भारतीयांची गुलामगिरीची सवय त्यापेक्षाही "मूलगामी "होती. उगाच एखादा पक्ष देशावर 70 वर्ष अभाधित राज्य करत नाही त्यामागे इतिहास आणि इतिहासातील लोकांच्या मानसिकतेची जडणघडण महत्वाची असते.

काँग्रेस ची स्तिथी या निवडणुकीच्या निकालात जरी जैसे थे अशी असली तरी काँग्रेस संपली अस म्हणणाऱ्यांनी एकदा एखांदी स्पर्धा परीक्षा बिना नेहरू आणि गांधींचा अभ्यास न करता पास करून दाखवावी ?भारताचा 5 हजार वर्षाचा हिंदू धर्माचा इतिहास अधिकृतपणे पाठयपुस्तकात शिकवला गेला तेव्हा आपण म्हणू शकतो काँग्रेस डळमळलीये.
काँग्रेस ची विचारधारा ही ते भांडवल आहे जे स्वस्तात आणि सहज उपलब्ध आहे, तो पर्यायी प्रश्नांमधील सगळ्यांना पास करेल असा प्रश्न म्हणजे काँग्रेस ची विचारधारा आहे. कोणत्याही कार्यशाळा न भरवता विचारधारेचे bumbarding न करता काँग्रेस पक्ष तग धरू कसा शकतो ? काँग्रेस ची विचारधारा ही गरिबी,दारिद्री आणि कामिशिक्षीत लोकांच्या विचारांशी मिळती जुळती आहे, ज्यांच्यासाठी अन्न आणि कुटुंब महत्वाच आहे देश हा दुय्यम आहे आणि देशप्रेम तेच आहे जे पाठयपुस्तकातून शिकवल्या जात.
आज जरी देशप्रेमाची व्याख्या बदलली असली तरी वरील कुटुंबांना देशप्रेमाची व्याख्या काँग्रेस नेच घालून दिलेली आहे ती एका अधिकृत सरकार च्या रूपात.
कधी विचार केलाय का की 565(69)छोटे देशासारखे संस्थान कशाच्या आधारे भारतात आणल्या गेले?आणि मुख्य म्हणजे एकत्रित टिकले कसे ? त्याच मुख्य कारण आहे काँग्रेस पक्षाची आणि तत्कालीन सरकारची एक विचारसरणी असणं.

सांस्कृतिक विचारसरणीवर चालणाऱ्या पक्षांच्या काही मर्यादा असतात अगदी पेट्रोल आणि डिझेल वर चालणाऱ्या  गाड्यांसारख्या त्यांचं आयुष्य हे पैसे आणि इंधनावर असत या उलट सायकल जर बुरशी येऊन जरी पडलेली असेल तरी तिला नीट करायला पैसा कमी लागतो आणि इंधनाचीही गरज पडत नाही.

कदाचित हीच काँग्रेस ची स्ट्रेंथ असावी ज्यामुळे काँग्रेस मुळापासून संपवता येत नाही.(यावर पुन्हा सविस्तर लिहणार आहे )



Monday, May 3, 2021

भाजप चा बंगाल मधील पहिला डाव यशस्वी.(निवडणूक निकाल भाग 1-पश्चिम बंगाल )

व्यंधत्व असलेल्या जोडप्यांना  दुसऱ्यांची लेकरं चांगली वाटतात किंवा त्यातच समाधान मानावे लागते,दुसऱ्याच्या लग्नात नाचणे असे बरेच शब्दप्रयोग काल कानावर पडले.
त्यात काही प्रमाणात तथ्य होत पण उदाहरण योग्य नव्हती, एका बाजूला तुमचं अस्तित्व संपत आहे पण तुम्ही फक्त आकसापोटी जर तुमच्या शत्रूच्या  पराजयात देशाचे भवितव्य शोधत असाल तर नक्कीच तुम्हाला "नागपूरच्या "खुराकाची गरज आहे.
बंगाल ची निवडणूक जर एखाद्या ठोक अश्या सामाजिक किंवा विकासाच्या मुद्दयांवर झाली असती तर बंगालच्या long term राजकारणावर तिचा फरक पडला नसता, कारण निवडणुकीचा संदर्भ आणि निकाल दोन्हीही अल्पकाळासाठी गाह्य धरल्या गेले असते, मग त्यात भाजप जरी जिंकलं असतं तरी त्याचा परिणाम राज्याच्या सामाजिक आणि राजकीय स्तिथीवर झाला नसता, राज्याच्या प्रादेशिक अस्मितेवर झाला नसता.
पण ही निवडणूकच झाली ती धर्म आणि अस्मितेच्या नावावर आणि तिथे भाजप सरशी करताना दिसून येत.
स्पष्ट करून सांगतो, सेनेच्या 1990 च्या आधी खूप कमी जागा होत्या अगदी अल्प पण 1990 च्या नंतर हिंदुत्वाचा मुद्दा हाताशी घेऊन राज्याची प्रादेशिक अस्मिता भाजप सोबत निलाम केली आणि हिंदुत्वाचे राजकारण महाराष्ट्राचा पाया झाला, काँग्रेस चा मतदार दुसऱ्या बाजूला वळाला,महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण चालू झाले, मराठीच्या मुद्दयांवर निवडणुका होणं बंद झालं.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाया बदलला आहे हे कळायला जसे अनेक वर्ष गेले तसेच बंगाल च्या राजकारणाचा सुद्धा "खेळा" झालाय हे कळायला 10 वर्ष नक्कीच लागतील.पण दुर्दव्य हे आहे की विश्लेषक आणि पत्रकारांना हे लोकांना सांगायचं नाहीये, आपली  वैचारिक कट्टरता जोपासण्याच्या नादात निवडणुकीचे सखोल अंदाज आणि पैलू हे टक्केवारीनवर अवलंबून असतात हे पण कदाचित ते विसरले आहेत, असो

एका बाजूला 55 जागा जिंकलेला पक्ष, आपल्या साठी संघर्ष प्रतीक आणि कडवी झुंझ असू शकते (पावसाची सभा ) आणि दुसऱ्याच बाजूला 75-78 जागा जिंकणे ते पण 3 जागांवरून आपल्यासाठी "खेळा "कसा असू शकतो ?
मुळाला छेद देणे कशाला म्हणतात "दलित, आदिवासी आणि बंगाली अस्मितेला धरून नसलेला आणि हिंदुत्वाकडे जाणारा हक्काचा मतदार भाजप चा तयार झालेला आहे.
जे लोक म्हणताय की प्रादेशिक अस्मितेचा विजय झाला आहे, ते साफ खोट आहे कारण जिथे 48% च मतदान ममता यांना पडलं आहे मग बाकीचे 50% बंगाली अस्मितेचा भाग नाहीत का ?अस्मितेचा विजय असता तर ममता यांना 70% तरी मत पडायला हवी होती.

तामिळनाडू मध्ये आपण म्हणू शकतो की अस्मितेवर निवडणुका झाल्या म्हणून कारण तेथे समोरचा पक्ष हा पण प्रादेशिक अस्मितेवर लढणाराच असतो पण बंगाल मध्ये तस म्हणता येणार नाही.
भाजप ने ध्रुवीकरणाचा डाव साधला आहे, बंगाल चे पीच (खेळपट्टी ) ही आता लखनऊ आणि आयोध्ये सारखी बनवली जाईल त्याची सुरुवात लवकरच कोरोना झाल्यावर होईल, आणि बंगाल मधून दर महिन्याला काहीतरी नवीन ऐकायला येइल.

आपल्या जेष्ठ वर्गमित्रांची फक्त सदिच्छा भेट घेण्यातच ममता यांचं राजकीय भवितव्य टिकून आहे, काही नवीन राजकीय जळवाजुळावं किंवा समीकरण जुळवण्याचा प्रयत्न ममता यांनी केला तर बंगालही भाजपकडे अपेक्षेपेक्षा जास्त लवकर जाईल.

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...