Tuesday, August 1, 2023

भाजप 2024 ची निवडणूक हारू शकतं का?

 2024 ची निवडणूक ही भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांसाठी अत्यंत महत्वाची आहे. भारतीय राजकारण आणि निवडणूकांमध्ये आकडेवारी जरी महत्वाची असली तरी लोकभावना किंवा एखादी लोक चळवळ जी पूर्ण निवडणूकीचे चित्रच बदलून टाकेल ती अत्यंत महत्वाची अस


ते. विरोधकांनी i.N. D. i. A या आघाडीची स्थापना करण्याचे मूळ कारण आहे ते म्हणजे मोदी यांच्याविरोधातील लढाई ही व्यक्तीकेंद्री न होता वैचारिक स्थरावर लढल्या जावी. त्यात बऱ्यापैकी विरोधकांना यश येतही आहे पण त्यांची एकता आणि विचार किती दिवस एकत्र टिकतील यावर i. N. D. I. A चे भविष्य अवलंबून आहे.



मोदी यांच्या लोकप्रियतेत थोडी घट झाली असली तरी भाजपचा पाठीराखा मतदार, उत्साही उजव्या विचारांचे तरुण आणि काही प्रमाणात महिला, यांनी आजही मोदींची साथ सोडली नाही. जनतेला स्थिर सरकार आणि परवडणारा चेहरा म्हणून आजही मोदी महत्वाचे वाटतात.पण राजकीय हव्यास आणि सामान्य लोकांना भेडसावणारे प्रश्न हा भाजप समोरील येणाऱ्या निवडणूकीतील महत्वाचा भाग असणार आहे. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक, गोवा, अशा राज्यांमध्ये सगळी राजकीय नैतिकता बाजूला ठेऊन भाजपने पक्ष फोडण्याचा जाहीर कार्यक्रम राबवला, यामुळे भाजपचा या राज्यात नैतिक ऱ्हास सुरु झाला आहे. समाज माध्यमाचा योग्य वापर करून विरोधी पक्षांनी भाजप हा सत्तेची वासना असलेला पक्ष आहे हे दाखवून दिले आहे. बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक अशा 2024 च्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या राज्यांमध्ये भाजपची राजकीय वासना आणि स्थानिक अस्मिता हे महत्वाचे मुद्दे असण्याची शक्यता आहे. 2024 ला बिहार, महाराष्ट्र, बंगाल, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये भाजपला जास्तीत जास्त धोका पोहचवण्यासाठी विरोधी पक्ष प्रयत्न करत आहेत.


 महागाई आणि सामाजिक सुरक्षा किंवा सार्वजनिक शांतता हा 2024 चा मुख्य मुद्दा काँग्रेस बनवू पाहत आहे, त्यात त्यांना बऱ्यापैकी यश सुद्धा आलेलं आहे, राहुल गांधींची भारत जोडो यात्रा हा देशातील राजकीय लढाई वैचारिक स्थरावर नेण्यासाठी केलेला एक प्रायोजित आणि प्रामाणिक प्रयत्न होता, ज्यात काँग्रेसणे हजारो कोटी रुपये खर्च केले तेव्हा कुठे राहुल गांधींची धूसर झालेली प्रतिमा उजाळली.


काँग्रेस मध्ये भारत जोडो यात्रेनंतर थोडा जोश जरी आला असला तरी ठोस प्रयत्न, आणि पक्षांतर्गत एकता हा त्यांच्यासमोराचा महत्वाचा प्रश्न आहे. 2024 निवडणूक काँग्रेस किंवा विरोधी पक्ष जिंकण्यासाठी जरी लढत असले तरी काँग्रेस या पक्षाचा हेतू मात्र वेगळा असण्याची शक्यता आहे. I. N. D. I. A च्या मदतीने काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढेल, जिथे पक्ष मजबूत आहे तिथे जागा निवडून येतील आणि निवडणुकीआधी जर एखादी मोदी विरोधी लाट आली तर कदाचित i. N. D. I. A जिंकण्याची शक्यता आहे. पण जर तसे झाले नाही तर देशातील मुख्य विरोधी पक्ष, तसेच लोकसभेच्या 100 जागापेक्षा अधिक जागा निवडून आणणे आणि भाजपला फक्त 250 लोकसभा जागा मिळवू देणे हा काँग्रेसचा मुख्य प्रयत्न असण्याची शक्यता आहे.

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...