ज्ञानेश्वर मोरे.
9623480172
जग वेगाने प्रगती करत होत ,कच्चा माल आणि मजूर आणि त्यापेक्षाही आवश्यक अशी एक बाजारपेठ जेथे आपले उत्पादन विकल्या जाईल यासाठी सर्व विकसनशील देश शोध घेत होते ते मुर्दाड आणि स्वार्थी वृत्ती असलेल्या लोकांचा देश आणि सोबतच भ्रष्ट राजकारणी आणि निकृष्ट प्रशासन,हेच इंग्रज लोकांनी हेरुन सुमारे 150 वर्षे राज्य केले आणि गेले सुद्धा.पण जे भांडवल आणि कच्चा माल स्थानिक जनतेच्या रूपात उपलब्ध होता त्याचा वापर कोणीतरी करायला नको का?मानव (माणूस)हा मुळातच हिंसा आणि हिस्सा प्रिय माणूस आहे हे मानसशास्त्र आणि मानववंशशास्त्र स्पष्ट करते.मुक्त अर्थव्यवस्था आणि जागतिक अर्थव्यवस्था अश्या वेगवेगळ्या संकल्पना आपल्या समोर आणून आपली "गांधारी लूट"चालू आहे.
क्षितिज ही एक कल्पना आहे त्या मागे पळू नका असं सांगून त्याचा पाठलाग करणाऱ्या माणसाला वेड ठरवलं जातं.पण एक गोष्ट नक्की आहे की तो वेडा नसून वेगळा असतो,आपली सामाजिक आणि राजकीय भूमिका आपण एकच चष्मा लावून पाहत असतो,त्यामुळे राजकीय नेते आणि अधिकारी बिनधास्त पणे गुन्हेगारी आणि भ्रस्टाचार करून मोकळे होतात ते फक्त त्यांच्या "गांधारी आणि धूर्त-राष्ट्र समर्थकांमुळेच "(समजून सुद्धा न समजल्यासारखे करणारे).
आता आपण आपल्या मूळ विषयाकडे येऊ, 1960 पासून याची प्रत्यक्ष सुरुवात झाली अफगाणिस्तान येथून आलेल्या काही लोक्कांनी "बॉम्बे"येथे जम बसवला ,मुंबईचे सौन्दर्य आणि भविष्य लक्षात घेऊन सुरुवातीला छोटे छोटे अवैध्य काम करून आपले साम्राज्य पसरवयाला सुरुवात केली आणि मग बघता बघता सारी मुंबईच गिळली.यामध्ये प्रामुख्याने करीम लाला ,हाजी मस्तान,आणि वरदा मुदलियार हे होते.राम मंदिराची मागणी नेमकीच जोर धरू लागली ,1947 नंतर पहिल्यांदाच लोकांच्या अश्या धार्मिक आणि संप्रदाइक मागण्या जोर धरू लागल्या मग त्यामध्ये ,तामिळ लोकांसाठी विशेष राज्य त्यासाठी ltte(प्रभाकरन)कार्यरत होती ,तिकडे पंजाब मध्ये सुद्धा "खलीस्थान चळवळ "जोर धरत होती.प्रचंड अस्थिर आणि तणावपूर्ण वातावरण देश त्याकाळी अनुभवत होता,असा विचारही त्याकाळी कोणी केला नसेल की ह्याच सर्व मागण्या एक दिवस देशाचं राजकारण आणि समाजकारण बदलून टाकतील आणि देशाला नरसंहार ,राजकीय नेत्यांच्या हत्या ,दहशदवाद,आणि civil war,असे काही शब्द परिचित करून देतील,त्यामुळे ह्या तीन घटना भारताच्या आधुनिक राजकारणाचा पाया किंवा भारतीय राजकारणाला कलाटणी देण्यासाठी महत्वाच्या ठरल्या. (2)1977 मध्ये इंदिरा बाईंना जोरदार झटका बसला त्यामुळे त्यांना एक गोष्ट नक्कीच कळली होती की पारंपरिक राजकारण बदलून काहीतरी नवीन आणि मानवी रस असलेले मुद्दे समोर करायला हवेत ,मतदारांची बदलती मानसिकता त्यांनी नेमकी हेरली आणि व्यक्तीकेंद्री राजकारण थोडं बाजूला सारून,राजकारनाचे "व्यावसायिक प्रयोग"त्या करू लागल्या,त्यामध्ये प्रामुख्याने एखाद्या राजकीय आणि भौगोलीक वादाला "राष्ट्रीय अस्मिता"घोषित करणे ,पक्षावर आणि अंतर्गत विरोधक यांच्यावर दबाव आणि वर्चस्व राखने आणि बरेच काही जे आपण आज सुद्धा अनुभवतो.(3)त्याच वेळी तत्कालीन विरोधकांनी सुद्धा आपल्या राजकारण करण्याच्या पद्धतीत बदल केले त्यामध्ये प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीर चा मुद्दा ,राम मंदिर ,धार्मिक ध्रुवीकरण ,बहुसंख्य आणि अल्पसंख्य, आणि राष्ट्रीय अस्मिता हे मुद्दे होते.आता या बदललेल्या राजकारण पद्धती भारतीय मतदार आणि नागरिक यांच्यावर "बाळ -संस्कार" टाकण्याचे काम करत होत्या. (4)
मुंबईच्या आणि महाराष्ट्र राज्याच्या पोलीस खात्यात हस्तक्षेप करण्याची सुरुवात ही 1980 पासून झाली
तत्कालीन काँग्रेस चे नेते शरद पवार "वसंतदादांच्या"पाठीत खंजीर खुपसून आजच्या लुडो सारखा तेव्हा "पुलोद"नावाचा खेळ केला होता,तो खेळ काही काळानंतर फसला.(5)काळा पैसा गोरा करण्यासाठी तेव्हा एवढी साधन नसायची आणि मुंबई मधील गुन्हेगार सुद्धा एवढी नावारूपाला आलेली नव्हती किंवा टोळी युद्ध सुरु झाले नव्हते.आपल्या राजकीय आणि वयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी गुन्हेगारांचा वापर तेव्हाचे राजकारणी करायचे ,मुंबईचे अधोविश्व दोन पवारांशिवाय पूर्ण होत नाही एक म्हणजे supercop y,c पवार जे गुन्हेगाराचे काळ होते आणि दुसरे म्हणजे शरद पवार ज्यांचे दाऊद पासून ते इकबाल मिर्ची पर्यंत समंध होते. (पवार त्याचे खंडन करतात)
हवाला किंग म्हणून प्रसिद्ध असलेले इकबाल मिर्ची ,मुकुलचन्द शहा ,चोक्सी ,जे की फरार आरोपी आणि दहशदवादी दाऊद इब्राहिम याचे जवळचे सहकारी आहेत,यांच्यासोबत कोटींचे व्यवहार शरद पवार ,प्रफुल पटेल आणि भारतातील नामांकित नेते यांचे झालेले आहेत.डिसेंबर 1979 ते ऑक्टोबर 1992 पर्यंत शरद पवारांनी प्रत्यक्ष मुकुलचंद शहा याच्यासोबत जवळपास 80 कोटींचा व्यवहार झालेला आहे.सोनिया गांधी यांचे निकटवर्तिय अहमद पटेल हे सुद्धा या संघटित गुन्हेगारीमध्ये सहभागी होते आणि लतीफ नावाच्या एका कुख्यात गुन्हेगारासोबत त्यांचे संबंध होते.(6)(गुजरात मधील अनेक नेते आहेत)(संदर्भ-vohara committee report)
थोडक्यात काय तर 1978 ते 1980 दरम्यान जेव्हा पवार मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी गुन्हेगारांना मोकळ रान देऊन स्वतःच हीत साधून घेतलं,येणाऱ्या भविष्यात हेच पाळलेले लोक कुख्यात गुन्हेगार आणि दहशतवादी होतील असे पवारांना वाटले नसावे का ?की पवारांना आपला राजकीय आणि खासगी मोह आवरता आला नाही?मुकुलचंद शहा हा कोणी लहान सहान आरोपी नव्हता ,त्यांने मुंबईचा कट रचण्यासाठी टायगर मेमनला (mastermind of mumbai serial blast)2.5 अडीच कोटीची मदत दिली होती,त्याला जेव्हा 1993 च्या स्फोटानंतर पकडले तेव्हा त्यांने सांगितले होते की 1992 च्या ऑक्टोबर पर्यंत पवार माझ्या संर्पकात होते आणि त्यांचा शेवटचा व्यवहार सुद्धा झाला होता जो की तब्बल 7 कोटींचा होता.(संदर्भ -वोहरा समिती अहवाल) (7)पवारांनी बांधलेल्या पायावर इमारत बांधू देण्यासाठी मदत केली
ती तत्कालीन मुख्यमंत्री आणि इंदिरा गांधी यांचे निकटवर्तिय ,आपली पकड पक्ष आणि प्रशासन या दोन्हीवर सुद्धा असावी त्याबरोबरच पक्षांतरगत राजकारण टाळण्यासाठी मराठा नेत्यांना डावलून इंदिरा यांनी अंतुले यांना मुख्यमंत्री पदावर बसवले(1980).गुन्हेगारी क्षेत्रात रान मोकळे सोडलेले पवार बरे होते असं राहून राहून वाटत ,कारण अंतुले यांनी राणाबरोबरच "माळ"रान सुद्धा मोकळे सोडले (मुंबई चा समुद्र )खूप साऱ्या टोळ्या आणि गुंड याच काळात गुन्हेगारी विश्वात पदार्पण करू लागल्या त्यामध्ये बहुतांश जण मुसलमान होते (करीम लाला ,हाजी मस्तान ,वरदराजन )ह्या टोळ्या त्याच काळात मोकाट सुटल्या अनियंत्रित पणे आपले सर्व काळे धंदे राजरोसपणे चालायचे.अंतुलेंनी त्याकडे विशेष लक्ष दिले नाही "ज्याची समुद्रावर पकड त्याची मुंबईवर पकड "अश्या चर्चा त्याकाळी होत होत्या आणि घडलं ही तसंच ,समुद्रमार्गे तस्करी होऊ लागली त्यामध्ये अमली पदार्थ ,अवैध्य दारू आणि हत्यार सुद्धा मुंबईतुन बिनधास्त पणे पाठवू जाऊ लागले आणि येऊही लागले ,त्यामध्ये मध्य पर्वेतून आणि दक्षिण आशिया तुन येणारा हवाल्याचा पैसा सुद्धा येत असे.(8)
जोलीओ रिबेरो आणि yc पवार हे दोन अधिकारी फक्त याला अपवाद होते ,मुंबई मधील गुन्हेगारी संपवायची असेल तर गुन्हेगार आणि त्यांची दहशत संपवावी लागेल ,आक्रमक आणि निडर स्वभावाचे yc पवार कामाला लागले आणि गुन्हेगारांच्या याद्या बनवायला सुरुवात झाली कार्यवाही सुद्धा चालू झाली ,मुंबईच्या किंबहुना देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच पोलिसांनी गोळी ला उत्तर गोळीच ,या नीतीचा अवलंब केला असेल ,पवारांनी थेट वरदराजन मुदलियार यालाच संपवायचं ठरवलं ,पुढे तो मुंबई सोडून चेन्नई ला गेला. पण पवार आज सुद्धा खंत व्यक्त करतात की काही अधिकारी आणि पोलीस हे नेते आणि क्रिमिनलस यांच्या दावणीला बांधलेले आहेत.पुढे काँग्रेस च्या काही स्थानिक आणि चेन्नई मधील खासदार आणि आमदारांनी अंतुले आणि इंदिरा यांच्याकडे मागणी केली की yc pawar आणि rebero यांना हटवा किंवा ते पदासाठी योग्य नाहीत आणि झालंही तसंच दोघांना सुद्धा मुंबई तुन बाहेर जावं लागलं.(9)आपल्याच निर्णय आणि धोरणाच्या बळी इंदिरा गांधी ठरल्या अंतुलेंच्या मागे सिमेंट वाटप आणि त्यातील भ्रस्टाचार प्रकरण भोवले व त्यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं.आता जे मुंबई पुढे अनुभवनार आहे तिचे मूळ आणि शेंडे हे फक्त दिल्ली पर्यंतच नाही तर थेट दुबई ,बँकॉक ,लाहोर ,कराची ,वॉशिंग्टन,newyork पर्यंत जातात,कारण हवाला ,तस्करी ,हत्या ,चोऱ्या ,टोळीयुद्ध या प्रकारची गुन्हेगारी अवगत असलेली मुंबई लवकरच जागतिक दहशदवादाचा क्रूर चेहरा अनुभवनार होती,आणि हे सर्व घडणार होत ते आपल्या राजकीय उदासीनतेमुळे आणि लोकांच्या दुर्लक्ष करण्यात "पुरुषार्थ"समजनाऱ्या वृत्ती तुन ,आता त्यात काही पुढारी आणि अधिकारी बांडगुळ सक्रिय सहभागी होते तो वेगळा विषय आहे ते कसे होते आता हे वेगळं सांगायची गरज नाही.(10)
दोन मराठी नेते आता मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटला वर "खेळ"करणार होते त्या दोघांचेही ध्येयधोरणे ,उद्दिष्टे,आणि काम करण्याची पद्धत वेगळी होती.एक आक्रमक तर दुसरा चिकाटीबाज,एका नेत्याने खूप लवकरच आपली पकड राज्यच्या आणि देशाच्या राजकारणात घट्ट केली होती. साम ,दाम ,दंड ,भेद वापरून का होईना पण "पवार" हे नाव देशातील प्रमुख नेत्यांच्या यादीत येऊन पडले होते.
गरिबी हटाओ ते शहाबानो प्रकरण जर आपण नीट आणि उकल करून बघितलं तर आपल्या धान्यात येईल की काँग्रेस आता आपल्या हक्काचा आणि हमी देणारा मतदार तयार करू पाहत होते. आणि पवारांनी सुद्धा तोच मार्ग निवडला "धर्मनिरपेक्षतेचा"आणि राज्यात पकड मजबूत राहण्यासाठी त्यांनी शेती ,सहकार,क्षिशण हे मार्ग सुद्धा निवडले पुढे ते त्यांच्या फायद्याचे ठरले.पण पवार आजही पूर्ण होऊन सुद्धा अपूर्ण आहेत कारण प्रत्येक वेळेस जेव्हा त्यांचं नाव पंतप्रधान पदासाठी आलं तेव्हा मात्र पवार "एका अस्सल मराठी माणसासारखे"फक्त गृह-हीत धरल्या गेले.(11)उजव्या संघटना 1970 च्या नंतर जेव्हा सक्रिय व्हायला सुरु झाल्या,तेव्हाच त्याचा बंदोबस्त करण्यासाठी "धर्मनिरपेक्ष"हा शब्द भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत घालण्यात आला,आणि अल्पसंख्यांक आणि गरिबांचे कल्याण हे विषय भारतीय राजकारणात चर्चिल्या जाऊ लागले.उजव्यांचं ठीक आहे पण डावे कसे शांत आणि निष्प्रभ करायचे?हा प्रश्न काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांना पडला असावा ,आणि याच प्रश्नाचे उत्तर आहे आपल्या खेळाच्या पटलावरचा दुसरा नेता ,ते म्हणजे बाळ ठाकरे (बाळासाहेब ठाकरे)
काँग्रेस ने सहज केलेला प्रयोग यशस्वी होत होता,आणीबाणी च्या दरम्यान झालेल्या इंदिरा आणी ठाकरे भेटीत कदाचित ही गोष्ट पक्की झाली असेल की "बाळ ठाकरे "तुम्ही राज्यातले डावे सांभाळा मी उजवे (इतर विरोधक)सांभाळते ,कारण आणीबाणी ला पाठिंबा बाळासाहेब का देतील?
कॉम्रेड कृष्णा देसाई यांची हत्या उघड उघड असताना सरकार काहीच का दखल घेत नाही किंबहुना योग्य तो तपास का करत नाही?1993 च्या आधी फक्त मराठी माणूस याच विषयावर आपला राजकीय गाडा हाकणारे बाळासाहेब ,जेव्हा मराठी गिरणी कामगार उध्वस्त होत होता आणी कामगार चळवळ लुप्त होत होती तेव्हा सुद्धा बाळासाहेब गप्प का बर बसले असतील?आपल्या विशेष शैलीत त्यांनी का उत्तर दिल नसेल?अशी बरीच प्रश्न आहेत जे आजही अनुतर्रीत आहेत.(12)1966 साली स्थापण झालेला पक्ष जेव्हा 15 वर्षे फक्त संघटना म्हणूनच जर काम करत असेल तर नक्कीच त्या पक्षाचा राजकीय मार्ग बिकट आहे असं वाटायला लागत,मराठी माणूस या मुद्द्यावर शिवसेनेचे काही प्रतिनिधी निवडून सुद्धा येऊ लागले आणी एक स्थानिक पक्ष म्हणून शिवसेना चांगलाच जम बसवू लागली आणी लोक सुद्धा स्वीकारू लागले,पण पाहिजे असे यश आणी प्रसिद्धी आजही शिवसेना मिळवू शकत नव्हती ,(13)पण डिसेंबर 1992 मध्ये जे झालं त्याने बऱ्याच जणांचं राजकीय नामकरण आणी पुनर्वसन केलं त्यामध्ये ,मराठी माणसाचा पाठीराखा ते हिंदू हृदय सम्राट हा प्रवास बाळासाहेब यांनी फक्त दोन वर्षात केला (1992-1993)बाबरी मस्जिद प्रकरण आणी त्यानंतर उसळलेल्या दंगली बाळासाहेब यांना राष्ट्रीय ओळख देऊन गेल्या ,कुठे एक स्थानिक पक्ष जो मराठी माणसाच्या हक्कासाठी लढतो किंवा लढला तो आता हिंदूंसाठी लढणार होता.त्यातली प्रामाणिकता आपण नंतर तपासून पाहू कारण सध्या तो आपला विषय नाहीये पण एक गोष्ट नक्की की ,मराठी माणूस आणी महाराष्ट्र आजही दुय्यम वागणूक पचवत असतो कारण ती सवय त्याला लावली गेलीये.1995 च्या निवडणुकीत शिवसेनेला त्याचा (1993 मुंबई दंगे )फायदा जरी झाला असला तरी तो क्षणिक होता
कारण आजपर्यंत शिवसेना एकदाही एकहाती सत्ता
आणू शकलेली नाहीये ,वय चोपन्न आणी जागा छप्पन"असं मानलं तरी चालेल.
पण एक बिनधास्त आणी धाडसी हिंदू नेता म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची ओळख पूर्ण देशात झाली.
बाळासाहेब यांच्या बरोबरच अजून एका माणसाचे नामकरण 1993 मध्ये झाले होते,ते नाव म्हणजे दाऊद इब्राहिम कासकर तेच नाव बदलून terrorist and most wanted दाऊद इब्राहिम कासकर असे झाले होते.
Dayanesh more
9623480172.
नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे, सर्वप्रथम तुम्ही माझ मत जाणून घेण्यासाठी इथपर्यन्त आलात त्याबद्दल तुमचे आभार! या ब्लॉगस्पॉटमार्फत मी देशातील राजकीय गोष्टीवरील माझे निरीक्षण आणि त्याच झालेलं माझं आकलन मी याठिकाणी लिहीत असतो. "व्यक्ति तितक्या प्रवृत्ती" या गुणधर्मानुसार, इथे लिहिलेली मते ही सर्वस्वी माझी मते असल्याने ती सर्वाना पटतील असं नाही. पण याठिकाणी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन की येथील मते ही निपक्षपाती आणि सर्वसामान्य लोकांना आकलनात येतील अशी असतील.
Sunday, July 19, 2020
मुंबई आणि महाराष्ट्रातील अधोविश्व -संघटित गुन्हेगारी (पूर्वार्ध -1993 मुंबई साखळी स्फ़ोट आणि बदललेल राजकारण)
Wednesday, July 8, 2020
लॉकडाउन एक व्यापक कट
Dayaneshwar more.
9623480172
लोकशाही , अभिव्यक्ती या गोष्टी फक्त आपल्याला साजेसं असं काही घडत असेल किंवा घडलं असेल असेल तेव्हाच तर गाह्य धरल्या जातात अन्यथा ते सर्व तकलादू आणि थोतांड असत.कायदा फक्त घर दारापर्यंत. जीवावर कायदा उठला की माणूस कायदेशीर कायद्याची बोली लावतो अगदी 50 पासून ते लाखापर्यंत आणि हे सर्व करण्यासाठी गरज असते ती संधीची एका किचकट आणि प्रतिकूल वेळेची एकदा का ती वेळ गाठली की माणसात लपलेला राक्षस किंवा आदिमानव हा पावसातल्या बेडकाप्रमाणे हळूच वर यायला लागतो अगदी कायदा आणि धरमाच्या छाताडावर पाय देऊन अधिकार आणि सत्तेच्या जोरावर आणि लोकांच्या उदासीनतेचा फायदा घेऊन मग रचल्या जातो एक कट.जपान वरती अनुबॉम्ब टाकण्यासाठी झालेल्या चर्चेचा वेळ ,1993 मध्ये बाबरी मस्जिद पाडल्याच्या नंतर मुंबई मध्ये झालेले स्फ़ोट यामध्ये गेलेला वेळ ,2008 साली झालेल्या 26/11 च्या हल्याचा कट रचण्यासाठी लागलेला वेळ ,ही सर्व उदाहरणं जरी विषयाशी निगडित नसली तरी मी मुद्दाम पणे ती तुम्हाला दिली आहेत कारण एखादी चांगली किंवा अनुचित गोष्ट अमलात किंवा जमिनीवर प्रत्यक्ष उतरवण्यास साधारण किती वेळ लागतो ?वरील सर्व घटना या नकारात्मक असल्या तरी त्या 6 महिन्याच्या आत आखून प्रत्यक्ष जमिनीवर कृतीत उतवरवल्या आहेत.
आजची परिस्थिती थोडी वेगळी आहे 78-80 वर्षाचा म्हातारा (म्हातारी )जेव्हा घरात निपचित पडून असते आणि डॉक्टर सांगतात की आता 5 -6 महिने जगतील त्यामुळे सगळे जवळ रहा आता मुद्दा असा आहे की आपला माणूस तर जाणार आहे असं डॉक्टर सांगतायेत त्यामुळे आता शोक किंवा चिंता करून काही अर्थ नाही पण अर्थ नाही याचा अर्थ असा होत नाही की फायदा नाही.प्रसंग आणि प्रासंगिकता याचा अचूक वेध घेऊन कुटुंब सदस्य कामाला लागतात. ज्या व्यक्तीवर अमाप खर्च केला जीव लावला त्याच व्यक्तीच्या मरनाची वाट आता सगळं कुटुंब बघतय.आपले लोक फक्त कायदा किंवा तत्सम गोष्टीच नाही तर वेळ पडल्यावर देव ,धर्म ,पाप पुण्य सुद्धा manage करतात अगदी तसंच ह्या कुटुंबातील लोक्कांनी केलं दोन महिने चांगली काळजी घेतल्या नंतर मात्र सगळयांची बुद्धी "मंथरे "सारखी चालू लागली आणि विकल्प गोळा करू लागली.प्रामाणिक आणि सभ्य कुटुंब सदस्य सुद्धा विचार करू लागले की जाणार्रा तर जाणारच आहे पण आपल्याला काही देऊन गेला तर ?न सांगताच गेला तर ?मला काही मिळेल ना ?या उदाहरणाचा उद्देश असा की lockdown चा कट किंवा षडयंत्र मन्हजे काही prlambit किंवा लांबलेली सरकारी फाईल नाहीये जी नेहमी हतबल किंवा सभ्य लोकांच्या माथी मारली जाते
ही ती फाईल आहे जी मुजोर आणि माजुरडे लोक आणि बेजबाबदार प्रशासन लगेच मंजूर करत किंवा पुढे पाठवत.मी काही घटना आणि प्रश्न तुमच्या समोर मांडणार आहे जे की आपल्यावर "जबाबदारी आणि खबरदारी "च्या नावावर खपवले आहेत.त्यातून तुमच्या सुद्धा द्यानातं येईल की हा कसा एक "उत्स्फूर्त कट आहे ते "
साधारण फेब्रुवारी ची गोष्ट आहे केंद्र आणि राज्य दोन्हीही स्तरावर माहिती आहे की कोरोना नावाची काहीतरी रोगराई विदेशात चालू आहे मुख्यतो चीन अमेरिका ,इटली आणि काही देश. तेव्हा भारतातील रुग्ण होते 0% तेव्हा आम्ही वेगळ्या craze मध्ये होतो social media नावाच्या दलदलित फसून आभाशी जगात व्यर्थ आणि अजाण पनात nrc, caa या तत्सम गोष्टींचे समर्थन आणि विरोध करत होतो.वाढता प्रतीक्रियावाद हा समाजाचं सामाजिक आणि व्यक्तीची मानसिक स्तिथी खीळखीळ करण्याचं काम करत असतो.उठ सुठ फालतू आणि फाझील गोष्टींवर व्यक्त होण्याची सवय लागली तर गंभीर आणि आवश्यक विषय बाजूला पडून फक्त चर्चेचा आणि prime time चा विषय होतात.कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार न करता आकलन ,विश्लेषण या गोष्टी फक्त नावालाच उरल्या आहे का असं वाटायला लागत.आणि तीच या कटाची पार्श्वभूमी आहे 100 दिवसाचा lockdown कोणत्याच देशामध्ये लावण्यात आला नाही कारण तिकडे लोक्काना भावनिक साद घालून खोटी आशा दाखवून वेळकाढूपणा करता येत नाही आणि तेथील नागरिक ,पत्रकार ,activist,आणि क्रांतिकारक हे वेळेवर ठणकावतात आणि विरोध करतात आपल्याकडे झोपेचं सोंग घेऊन वेळ बघून विरोध करतात.
संकटकाळी मिळणाऱ्या सहानुभूतीचा फायदा घेणारे नीच आणि संधीसाधू नेते आणि अधिकारी हे सुद्धा तिकडे नसतात.हा कोरोना विमान मार्गे आला जेथून अजून बरेच रोग आपल्याकडे येतात.सगळं माहिती असताना सुद्धा तुम्ही त्याचा प्रतिबंध का केला नाही तुम्ही दारातील दुखणं घरात कशाला घेतलत ?जर सगळ्या यंत्रणा माणूस मेल्या नंतरच दखल घेत असतील तर विमा कंपन्या आणि शासनामध्ये फरक काय तो?ते ही गोड बोलतात गोल गोल बोलतात आणि हे ही गोड आणि गोल बोलतात.
जसं शुगर किंवा साखर बिमारी असणाऱ्या माणसांना साखर बंद सांगितलेली असते मग ती ती थोडी खाल्ली काय अन जास्त खाल्ली काय हानिकारक तर ती असतेच.मग lockdown च्या बाबतीत असं का नाही झालं मुख्यमंत्री साहेब हे lockdown फक्त सर्वसामान्य लोक्कांनीच का पाळलं ,त्यांनीच बेदम मार का खाल्ला आरोग्य आणि गरजेच्या नावाखाली लोक्कांचा मानसिक आणि शारीरिक छळ का केला ?
Lockdown सुरु झाल्याच्या नंतर सुद्धा नाशिक मधील एक मोठा कारखाना कसा चालू होता?तो आमदार साहेबांचा होता त्यामुळे चालू होता का ?नाशिक मधीलच घटना आहे एका डॉक्टरला mim चे नगरसेवक जाऊन बेदम मारतात 10-12 जण सोबत घेऊन ते पण तेव्हा त्यांना "पोलीसी"खाक्या कोण दाखवणार ग्रहमंत्री साहेब ?का त्यांना कोरोना होत नाही की तुमचेच हात दगडाखाली आहेत?
तुम्ही परप्रांतीय लोक्कांना नेऊन घालण्यासाठी जवळपास st आणि रेल्वेने मिळून 150 कोटी खर्च केले.त्याचा हिशोब विचारणार नाही तो विचारला तर राजकारण होईल नाही का ?पण तुम्ही लॉकडाउन असून सुद्धा तब्बल महिनाभर काम करणाऱ्या ऊसकामगारांची दखल का नाही घेतली?lockdown असून सुद्धा त्यांनी फक्त भीतीच्या पोटी तेथे काम केलं आणि राहिले असं का महोदय आपले आहेत याचा अर्थ असा होत नाही ना की त्यांनी वाऱ्यावर सोडा मन्हून.तुम्ही st अगदी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या थोडं बाहेर पर्यंत चालवली मग राज्यात मजुरांसाठी तुम्ही st का नाही चालवली परब साहेब ?कोरोना फक्त का मराठी माणसालाच होत काय?की st येत्या वर्षात तोट्यात दाखवून भाडेवाढ करून खासगी वाहनांची चांदी तर नाही करायची ना ?आम्ही दारू चालू करणार आहोत कारण ती गरज आहे पण एक सांगा महोदय दारू बंद कधी होती?बंद होती ती फक्त दुकान दारू nahi.कोटींची दारू या lockdown मध्ये बेकायदेशीर पणे विकल्या गेली हे जगजाहीर आहे त्यांना lockdown नव्हता का त्यांनी धंदा कसा केला ?आज चार महिने होत आहेत सर्वसामान्य माणूस तुम्हाला सहकार्य मन्हून सगळं काही बंद ठेवतोय मग दारू कशी विकल्या जाते?दारूचे कारखाने कोणाचे आहेत टक्केवारी कोणाची आहे ?ह्या बेकायदेशीर पणे विकलेल्या दारूचा हिशोब एवढ्या कायदेशीर पणे कसा येतो ?lockdown मधेच सापडलेल्या खोट्या नोटांच्या प्रकरणाचं काय झालं ग्रहमंत्री साहेब आठवत नसेल तर सांगतो पुण्याची घटना आहे ही.त्या बरोबरच आपल्याच राज्यतील एका आमदार पत्नीच्या दारूच्या दुकानाचा परवाना रद्द केला होता महोदय त्याच काय झालं lockdown मध्ये दारू विकल्याचा आरोप त्याच्यावर होता.10 ते 15 टक्के हजेरीचा नियम आपल्या मंत्री व आमदार साहेबांना नव्हता का मा महोदय?मागे झालेल्या सत्तेच्या वस्त्रहरनात सहभाग घेण्यासाठी हे आमदार आणि आजचे मंत्री मिळेल ते वस्त्र घालून वाऱ्याच्या वेगाने मुंबईला पोहचायचे.तेच आमदार आणि मंत्री कामावर का नाहीत महोदय तुम्ही त्यानां विनंती किंवा "वाघ डरकाळी "का नाही फ़ोडलीत महोदय?की सत्ता पडण्याची भीती आहे?
राज्यात मुख्य पदावर मराठी माणूस पाहिजेच पण तस होत नाही असो तो विषय वेगळा आहे.नंतरचा मुद्दा हा आहे की आपले ग्रहसचिव मेहता साहेब हे फरार घोषित असणाऱ्या वाधवाण कुटुंबाला लोणावळा ते महाबळेश्वर माझे कुटुंबीयच आहेत असं मन्हून कस काय पास देऊ शकतात?बाकीचे लोक काय मूर्ख आणि निराधार आहेत काय?दोन दोन दिवस कधी कधी तर 7 दिवस फक्त या जिल्ह्यतून त्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी काढायला लागतात आणि वाधवाण कुटुंबाला स्वःताहुन ग्रहसचिव परवानगी देतात कसकाय ते?ed ने घोषित केलेल्या फरार आरोपीला ग्रहसचिव अशीच परवानगी देतात न सांगता न विचारता?मन्हजे अधिकारी लोक समांतर शासन तर नाही चालवत ना
अधिकारी लोकांची वाढती एकाधिकारशाही हा कशाचा परिणाम की ग्रहमंत्री सुद्धा त्यात सामील आहेत?सत्तावाटप होताना फक्त खात्याचा विचार केला जातो व्यक्तीचा नाही आणि त्यातूनच एक अकार्यक्षम आमदार मंत्री या पदावर विराजमान होत असतो त्याच्या अडाणी आणि मूर्खपणाचा अधिकारीवर्ग सर्रास उपयोग करतात हे वेगळं सांगायची गरज नाही.
आता सोनू सद या अभि"नेत्याने"चांगले काम केले लोक्काना आपापल्या गावी सोडले ज्यातील बहुतांश लोक पुन्हा परत येत आहेत विषय तो नाहीये ती सगळी काम पोलीस हजर असताना होत होती पोलिसांबरोबरंच काही अधिकारी सुद्धा तेथे असायचे हे कसकाय ग्रहमंत्री साहेब?ही काही राजकीय पूर्वतयारी तर नव्हती ना भाजप सोबत संसार थाटायची आणि विद्यमान मुख्यमंत्री यांच्यावर दबाव टाकण्याची कारण असंही फडणवीस एका मुलाखती मध्ये बोलले होते की राष्ट्रवादीची आम्हाला खुल्ली offer होती.असो तो ही आपला विषय नाहीये पण तुमच्या कानावर टाकावंस वाटलं नाही का.एकदा आपले अन्न व औषधी मंत्री शिंगणे साहेब मुंबईतील एका दुकानात जाऊन आढावा घेत होते की bow sanitizer विक्री मध्ये काही घोळ किंवा भाववाढ तर होत नाहीना.मग 50 ची बॉटल 100 ला कशी मिळत होती शिंगणे साहेब?पोलिसांनी टाकलेल्या एका धाडीत हजारो लिटर sanitizer ते पण भेसळयुक्त सापडून सुद्धा तुम्ही त्याला आवर घालण्याचा प्रयत्न का नाही केला.राज्यात दोनच महिन्यात वेगवेगळ्या नावाच्या sanitizer कंपन्या कश्या चालू होतात शिंगणे साहेब?सलमान खानचा being human ब्रँड सुद्धा sanitizer विकतो शिंगणे साहेब या साऱ्या प्रक्रिया एवढ्या जलद कश्या होतात
हे सर्व लोक विचारत नसले तरी मंत्री आणि अधिकारी निर्लज्ज आहेत का ?हे sanitizer सोडा पण मास्कच काय?पाच लाख मास्क माननिय ग्रहमंत्र्याच्या हजेरीमध्ये पकडले गेले ते पण 2 अडीच महिन्याआधी त्या नंतर एवढा वेळ असताना सुद्धा राज्यात चालू असलेला मास्कचा काळा बाजार आपण थांबवलात का ग्रहमंत्री साहेब?
तुम्ही सुशांत सिंग च्या प्रसिद्धीचा फायदा घेण्यासाठी सांगितलं की कसून चौकशी होईल आणि जातीने त्याकडे लक्ष दिल पण आपल्या राज्यात जवळपास 5-7 सामूहिक आत्महत्या झाल्या होत्या त्यापैकी पुण्याची शिंदे परिवाराची तर खूपच हृदयदावक होती तेव्हा ह्या लोकांच्या आत्महत्येचा विचार आणि चौकशी शासन का करीत नाही ग्रहमंत्री साहेब?पालघर आणि नांदेड येथे झालेल्या साधूंच्या हत्येचा तपास कुठंपर्यंत आला आहे महोदय ?lockdown असताना सुद्धा राज्यात खून दरोडे चोऱ्या काळे धंदे सगळं काही चालू होत काल परवाच माझ्या तालुक्यातील एका मुलीला भर चौकात चाकू खूपसून मारलं एकतर्फी प्रेमातून याची जशी हवी तशी दखल आपले माध्यम आणि शासनाने घेतली का ?की ते सुद्धा आम्ही lockdown आहे त्यामुळे विसरून जायचं?
पूर्ण राज्यात कुठेना कुठे थोडयाफार का प्रमाणात होईना घराची बांधकाम चालू होती त्यांना माल आणि वाळू कोण आणि कशी पुरवत होती त्यांची दुकान कशी चालू होती?वाळूचे ठेके तर बंद होतेना पण राज्यातून हजारो ब्रास रेती (वाळू)कशी काय निघते महसूल मंत्री थोरात साहेब?आपले तथाकथित धाडसी अधिकारी तर या मध्ये सहभागी नाहीत ना की स्थानिक आमदारच वाळूच्या ठेक्यात टक्केवारी मध्ये पार्टनर आहेत?मुंबई मध्ये lockdown madhe सुद्धा बेकायदेशीर इमारतीच्या कश्याकाय बांधल्या जातात त्या पण धारावी मध्ये त्यांना परवानगी कशी काय मिळते कोण देतो ती परवानगी?हे "आव्हाड" हे सगळं
यातील काहीतरी आपल्या कानी किंवा पचनी पडतकाय मुख्यमंत्री साहेब की अजून 10-12 फेसबुक live तुम्ही घेणार आहात?80%रुग्ण मुंबई आणि परिसरात होते ते गावाकडे जिल्हाबंदी असताना सुद्धा कसकाय गेले?त्यांनी सीमा कशीकाय ओलांडली?
काही गुप्त मार्ग तर नसेना ना ?हो गुप्त मार्ग च आहे पण त्यासाठी तुमच्या जवळ पाचशे ते 10 हजार रुपये हवेत ते का तुम्ही एकदा सीमेजवळ उभे असणाऱ्या पोलिसाला दिले की तुम्ही तुमच्या गावी आहे का नाही गुप्त मार्ग?सर्वात जास्त भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा जर कुठे झाला असेल तर तो जिल्हाबंदी या तथाकथित उपायावर.हो हे खरं आहे जिल्हाबंदी ही लावली तेव्हाही फोलच होती आणि आजही आहे कारण अगदी मिळेल ते पैसे घेऊन आणि लोकसुद्धा देता येतील तेवढे देऊन मोठा पराक्रम करून जिल्हासीमा पार करायचे?(अपवाद वगळता)या विषयाकडे आपण कानाडोळा का केलात महोदय होत असलेला गोंधळ तुम्हाला दिसत नव्हता का ?की पूर्ण महाराष्ट्र कोरोनाग्रस्त करून अजून lockdown तर वाढत ठेवायचं नव्हतं ना?
राहुल कुलकर्णी हे पहिले पत्रकार असतील ज्यांच्या बातमीची दखल परप्रांतीय सुद्धा घेतात त्याहुन ही चांगलं वाटलं की ते मराठी बातम्या बघतात.बघा ग्रहमंत्री साहेब ते मराठी बातम्या बघतात मग तुम्ही सुद्धा मराठीतच बोलत जा ना नाही वाटायला तरी पाहिजे की महाराष्ट्राचा मंत्री आहे मन्हून.असो पण 10 हजार लोकांची गर्दी होते ती पण वेगवेगळ्या भागातून लोक येतात पोलिसांना कानोकान बातमी नाही?lockdown काय फक्त मराठी माणसासाठी होता काय ?गर्दी होऊ न देण हे तुमचं आद्यकर्तव्य होत जे की तुमच्याकडून झालं नाही.आणि ही गर्दी काय एकदा किंवा दोनदा झाली नाही महोदय फक्त मुंबईमधेच 5 ते 7 वेळेस हजारोच्या संख्येने लोक कसे काय जमतात?फक्त मुंबई मध्येच नाही तर पुणे कोल्हापूर औरंगाबाद नाशिक येथे सुद्धा हजारोंच्या संख्येने लोक जमा होत होते?जर लोक जमा होताच आहेत तर वारी किंवा तत्सम कार्यक्रम रद्द करण्यात काय तो पुरषार्थ मुख्यमंत्री आणि माननीय ग्रहमंत्री साहेब?पवार बोलले होते की tabalikkina काही बोलू नका बर पवार साहेब पण आपण "बांद्रा"येथील गर्दीबद्दल का बोलला नाहीत ग्रहमंत्री आपलेच होते ना ?की पुन्हा काही राजकीय हेतू त्यामागे नव्हता ना?
पूर्वी आपल्याकडे जिवंत माणसाचं अपहरण होत असे पण आपल्याकडे मात्र मृत शरीर सुद्धा या lockdown मध्ये विकल्या गेले किंवा चोरल्या गेले.हे खरं आहे मुंबई आणि बाकीच्या काही ठिकाणावरून चोरीला गेलेले मृतदेह नंतर परत मिळाले का त्यांचं पुढे काय झालं?माननिय आरोग्य मंत्री आणि मुंबई आयुक्त व महापौर
रक्ताचा साठा नेमका lockdown मध्येच कसाकाय संपतो?मुंबई वगळता तेव्हाची रुग्ण संख्या ही काही जास्त प्रमाणात नव्हती.मग संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तूटवडा कसा काय जाणवू लागला?आणि मुंबईमध्ये चालणारी बेकायदेशीर देहविक्री ,अवयव तस्करी ,रक्तविक्री हे सर्व काळे धंदे या अधिकारी आणि नेत्याना अनोळही नाहीयेत.कदाचित मुंबईमध्ये तेच तर घडत नाहीयेना ?
लाख आणि कोटींची हॉस्पिटलस बिल आली तरी सुद्धा आपले मंत्री ,आमदार , भरतील सुद्धा त्यामुळेच तर त्यांना नांदेड,बीड ,मुंब्रा येथून उचलून अलगद मुंबईच्या महागड्या हॉस्पिटल मध्ये ठेवतात.पण सर्वसामान्य माणूस नाही ना भरू शकत एवढं बिल.धुळ्यात एका जेष्ठ नागरीकाचा मृतदेह 7 दिवस संडास मध्ये पडून होता कोणी सुद्धा फिरकल नाही तिकडे अगदी सफाई कर्मचारी सुद्धा नाही.
सध्या 5 लाख लोक रोज शिवभोजन खात आहेत असं मुख्यमंत्री मागे बोलून गेले खरंच 5 लाख लोक एका दिवसात जेवत असतील का ?जेवणारी लोक कोण आहेत की फक्त तो एक आकडा आहे ?आम्ही कधी जमिनीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतच नाही तिथेच नागरिक चुकतात.
राशन वाटपामध्ये घोळ होत आहे त्याच वितरण अनियमित आणि बेकायदेशीर पणे होत आहे गरजून पर्यंत ते कधी पूर्ण पोहचत तर कधी अर्धवट.मागे हा सगळा घोळ कसा होतो हे सगळं एका विडिओ मधून समोर आलं होत आणि काही दुकानदारांवर कार्यवाही सुद्धा झाली होती पण तो सगळा काळाबाजार पूर्णपणे थांबलाय का?lockdown असताना सुद्धा बेकायदेशीर पणे धण्याची ने आन करण्यासाठी ट्रक कुठून येतात आणि कुठे जातात "भुजबळ"साहेब.रॉकेल आणि साखर फक्त नावालाच गोदाम मध्ये आहे का भुजबळ साहेब?
आता शेवटचं या वर्षांमध्ये बियाणं निकृष्ट आणि खराब दर्जाचे आल्यामुळे बहुतांश शेतकरी दुबार पेरणी करून बसले आहेत आता पुढे जे काही होईल ते पण बियाणं बनण्याची जी प्रक्रिया आहे तेव्हा आपली यंत्रणा कुठे होती "भुसे"साहेब बियाणं खराब आहे हे उगवून आल्यावर का कळलं ?त्या आधी त्याची तपासणी ,तपशील आणि प्रात्यक्षिक तुम्ही किंवा तुमच्या अधिकाऱ्यांनी घेतले होते का ?की शेतकरी मेल्यावरच त्याच्या चिंतेत मदत निधी फेकायचा "भुसे साहेब"
घटना ,प्रसंग खूप आहेत पण पूर्ण मांडणी येथे शक्य नाही त्यामुळे मी काही आवश्यक उदाहरणं वर दिली.
त्याचा उद्देश असा की पावसाळ्यात पावसात भिजल्याच्या नंतर मलविसर्जन किंवा मूत्रविसर्जन केल्याच्या नंतर जसं ते त्यात सामावून जातं त्याच प्रकारे शासन आणि प्रशासन आपल्या सगळ्या चुका ,गुन्हे ,भ्रस्टाचार आणि अनैतिक कामे lockdown च्या आड लपवू पाहत आहे आपले धूर्त आणि कपटी राजकारण करू पाहत आहे. या दोन्हीही व्ययस्था आपल्याला "व्यथा"बनू नये मन्हजे झालं.
द्यानेश्वर मोरे.
9623480172
Latest post
Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)
Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...
-
देशात लोकसभेच्या निवडणूकीचा वेगळा ट्रेंड सुरु होता, आणि दक्षिण भारतात खास करून आंध्र प्रदेशात वेगळा ट्रेंड सुरु होता.. एका टी-ट्...
-
विजय तामिळनाडू मधील जगप्रसिध्द असलेला एक कलाकार हव तर हिरो म्हणा.. राज्याच्या राजकारणात सक्रिय होत आहे.. सूर्याची जशी दुरून आपण वर्णने करतो,...
-
2024 विधानसभा निवडणुका या राज्यातील प्रादेशिक तसेच महत्वाच्या दोन्हीही राष्ट्रीय पक्षांसाठी एक निर्णायक संदेश देणार्या होत्या. निवडणुकीपूर...