Friday, February 2, 2024

तामिळनाडूच्या राजकारणाचा 'विजय' #थलापथी विजय# तामिळनाडू राजकारण #vijay in politics

विजय तामिळनाडू मधील जगप्रसिध्द असलेला एक कलाकार हव तर हिरो म्हणा.. राज्याच्या राजकारणात सक्रिय होत आहे.. सूर्याची जशी दुरून आपण वर्णने करतो, अगदी तसच काहीतरी मी या लेखात तुमच्यासमोर मांडणार आहे.. जे की फक्त माझ निरीक्षणच असेल..


मुळात माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण होऊन माणूस इतर न काही करता स्वस्थ बसत असेल तो प्राणी असावा किंवा साधू तरी असावा.. दक्षिण भारतातील अनेक मोठे स्टार्स आपल्या अन्नाची तसेच स्टारडमची भूक भागवून काहीतरी समाजकार्य किंवा आवड म्हणून राजकारणाची वाट निवडतात.. त्यापैकी एक म्हणजे विजय.. 

इतर कलाकार आणि विजयमध्ये मूलभूत एकच फरक आहे आणि तो म्हणजे भूमिका घेऊन ती भूमिका आपल्या कृतीतून रेटने, ना की फक्त शब्दाच्या मार्फत जनतेसोबत संवाद करणे.. राहुल गांधी, काँग्रेस यांच्या बाजूने केलेली विधाने, gst, आयुष्मान भारत योजनेवर आपल्या चित्रपटातून केलेले भाष्य या गोष्टी विजयला रिस्क टेकर बनवतात.. ज्या लोकांना फक्त भावानिक दृष्ट्या आकर्षित करत नाहीत तर विचार करायला लावतात.. एकच गोष्ट जर दोन व्यक्ती समजावून सांगत असतील, तर जो अधिक प्रभावी तसेच पोटतिडकीने मांडेल त्याची गोष्ट समोरच्याला लवकर समजेल..  अनेक कलाकारांनी राजकारणात एन्ट्री घेतली, स्वतःला नेता म्हणून जनतेसमोर ठेवले, किंवा ठेवण्याचा प्रयत्न केला पण ते जमले नाही.. कारण जनतेला ते तेव्हापन एक कलाकारच वाटायचे..
विजय ने केलेले मागील काही वर्षातील चित्रपट, घेतलेल्या भूमिका, प्रत्येक कार्यक्रमात जनहितासाठी दाखवलेली धडपड, आणि विजयचा नम्र आक्रमकपणा त्याला इतर अयशस्वी राजकारणी कलाकारांपेक्षा वेगळा बनवतो.. जनता आपल्या नेत्यात एकतर त्याचा भिडणारा साधेपणा बघत असते नाहीतर नडणारा आक्रमकपणा बघत असते, तेव्हाच कुठेतरी एखादा जननेता (mass leader )भेटतो, इतरवेळी सगळे फक्त नेते बनूनच राहतात.. आवाज न करता उपदेश देणे तसेच कामातून स्वभाव दिसणे या गोष्टी विजय बद्दल खास आहेत, चांगला pr असेल तर नेता चांगलाच असेल असा गैरसमज आता जनतेचा दूर झाला आहे.. शेळीला वाघ फक्त 3-4 महिने करता येत, नंतर अंगावरचा कलर जनतेला दिसायला लागतो.. pr तसेच सल्लागार हे फक्त साथ देण्याच काम करू शकतात, विरोधकांवर मात करायच काम नाही..

वडील जेव्हा विजयच्या नावाचा राजकारणासाठी चुकीचा वापर करू लागले तेव्हा त्याने त्याच्या वडलांवर केस टाकून मोठा रोष वाढवून घेतला, ट्रोल झाला पण कालांतराने सहजच त्याची एक कठोर तत्वाचं पालन करणारा सुपरस्टार अशी ओळख झाली.. यामध्ये त्याने त्याची अधिकृत बाजू मांडली नाही पण काही वेळ गेल्यानंतर त्याने जे केलं ते चूक नव्हतं हे जेव्हा लोकांना समजलं ते अस्सल आणि मनाला लागणार होत.. एका बाजूला जनतेला सर्वस्व मानणारा हिरो आणि दुसऱ्या बाजूला बापावर केस करून बापाची कमी बदनामी व्हावी म्हणून शांत बसलेला पोरगा.. ही धारणा लोकांच्या मनात आपसूक तयार झालेली होती.. जी की संवेदनशील आणि टिकाऊ होती.. विजयची राजकारण करण्याची पद्धत समजून सांगण्यासाठी हे फक्त एक उदाहरण होत.. प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया न देण ही सुद्धा एक प्रतिक्रियाच असते फक्त योग्य दर्जाचा आणि चांगल्या वृत्तीचा माणूस समोर असावा लागतो.. विजय गेल्या अनेक वर्षापासून तेच करतोय.. हा माणूस चांगला तर आहे पण याची चांगली कामे नेमकी काय आहेत? हे लोकांना माहित नसत.. अगदी तसच विजय हा चांगला माणूस आहे.. हेच लोक म्हणतात.. पण विजयच काहीतरी चुकत असेल किंवा, किंवा एखाधीतरी त्याच्या व्यक्तिमत्वात चुकी नक्कीच असेल असाही लोक विचार करतात.. म्हणजे काय, तर जोपर्यंत विजय वाईट नाहीये तोपर्यंतच तो चांगला आहे.. आणि नेमका हाच रहस्यमयी चांगुलपणा विजयला एक संवेदनशील माणूस, संयमी आणि धूर्त राजकारणी बनवतो.. आणि विजयाच्या व्यक्तिमत्वाची दुसरी बाजू समोर येईपर्यंत कदाचित तो राज्याच्या मुख्यमंत्री झालेला असेल किंवा लोकांच्या गळ्यातला ताईत तरी.. तुम्ही नेमके किती चांगले, किती वाईट आहात याचा अंदाज लोकांना न लागणे हा उत्तम राजकारणी आणि सामाजिक बांधिलकी असलेल्या लोकांना भेटलेला महत्वाचा गुण आहे.. 

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...