आज भारतीय संसदेमध्ये काही तरुणांनी घुसण्याचा प्रयत्न केला, काही घुसले आणि काही वेळासाठी का होईना वातावरणनिर्मिती केली. कदाचित हा योगायोगच असावा, देशात सध्याचे राजकारण हे कोणत्या दिशेने चालले आहे, आणि 2024 च्या निवडणुकीत काय वाढून ठेवले आहे, याचा बेसिक अंदाज यापूर्वीच्या दोन लेखातून मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला..
https://dayaneshwar.blogspot.com/2023/09/2.html
https://dayaneshwar.blogspot.com/2023/10/2024-3-shahrukh-khan-narendra-modi.हतमल
क्रिकेट खेळताना बॅट, बॉल या बदलत असतात, त्याचा खेळावर पण चांगला परिणाम होतो, पण जर खेळाची स्पीचच जर बदलली असेल तर मात्र इतर गोष्टी अपवाद ठरतात. भाजप हा देशातील सर्वात ताकदवान आणि मेहनती पक्ष आहे यात वादच नाही, हे कदाचित काँग्रेसमधील काही लोकं सुद्धा मान्य करतील. पण काँग्रेससारखा चिरकाल सत्तेत राहण्याचा मंत्र मात्र आजही भाजपकडे दिसत नाही, 5-10 वर्ष ही आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसासाठी एक पिढी असते पण नेत्यांसाठी तेच वर्ष म्हणजे फक्त एक ट्रेंड असतो.. बाकी काही नाही.. सरकार आणि व्यवस्था यांच्यासोबत चालणारी एक खास व्यवस्था भाजप तयार करू पाहत आहे पण काँग्रेस पक्षाच्या खोलवर रुतलेल्या नेटवर्कला, अमिबा सारखा कोणताच ठराविक विचार नसताना, फक्त गरीब कल्याण योजना राबवल्यामुळे तयार झालेला मतदार आजही काँग्रेसला सोडायला तयार नाहीये.. त्यातली त्यात डिजिटल माध्यमे, काही विकत घेतलेले विचारवंत, पगारी पत्रकार, आणि राहुल गांधींचा मनमिळाऊ स्वभाव या सूत्राने काँग्रेसने बऱ्यापैकी तरुणांचे विचारविश्व व्यापलेले आहे.. भाजप विरोधात सध्या जरी कठोर नाराजीचा स्वर नसला तरी पक्षातील मोठ्या नेत्यांना देशातील राजकारणाची बदललेली पीच नक्कीच ध्यानात आली असेल.. देशात कधी नव्हेते (निदान माझ्या बघण्यात तरी ) एवढा सत्तेच्या विरोधात रोष आणि सत्ताधाऱ्यांवार विश्वास हा एकाच वेळी दिसत आहे.. लोक मतदान सत्तेवर आणण्यासाठी करत आहेत किंवा सत्तेतून खाली खेचण्यासाठी.. त्यामुळे ही बाब भाजपच्या दृष्टीने लॉन्ग टर्म राजकारणासाठी फायद्याची नाही.. तुमच्या पक्षाचा usp जर धर्म, संस्कृती, ध्रुविकरण असेल पण एखादा चेहरा किंवा संघटना जर तुमचा अजेंडा सोडून मोठी होत असेल तर त्याचा फक्त तुम्हाला 10-15 वर्षासाठी फायदा होऊ शकतो.. काँग्रेसच्या बाबतीतही तेच झालं, 1995 नंतर पक्षात मूलभूत बदल करायची गरज होती पण ते पक्षाने केले नाही.. 2014, किंवा 1999 साली मोदींचा, अटलजींचा चेहरा होता, धर्म हा मुद्दा होता पण त्याबरोबरच काँग्रेसवरचा रोष हा त्या विजायातील सगळ्यात महत्वाचा फॅक्टर होता, UPA 1-2 यांच्या काळातील काही योजणांचा लाभ आजही घेतात, पण सत्तेतील लोकांचा हुकूम, एका ठिकाणी केंद्रित झालेली ताकद या गोष्टीने काँग्रेसला खाली खेचलं. याचा अर्थ कल्याणकारी योजना, थेट खात्यात पैसे पोहचवणे, या गोष्टी झाल्या म्हणजे लोकं आपल्या बाजूने राहतीलच असं नाही.. जनतेच्या रोशाला एखादा आधार भेटला की लोकं त्याला डोक्यावर घेतात, मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि राहुल गांधी त्याचं उत्तम उदाहरण आहे..