Tuesday, January 19, 2021

पाटोदा आदर्श गाव ग्रामपंचायत निकाल.

हा सूर्य आणि हे भास्करराव पेरे पाटील.
माझ्या मुलीचा पराभव माझ्या जिव्हारी का लागायला हवा ?पेरे पाटील

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल 18 तारखेला लागले,आणि सगळीकडे जल्लोष सुरु झाला वेगवेगळे पक्ष आणि त्यांचे नेते,आमदार उत्साहात दिसत होते आणि मोठमोठे दावे सुद्धा करत होते.
पण या सर्वांपेक्षा एका माजी सरपंचाने आणि अक्ख्या महाराष्ट्रात विकासपुरुष अशी ख्याती असलेले भास्करराव पेरे पाटील यांनी केलेले मतप्रदर्शन आणि त्यांच्या गावचा लागलेला निकाल हा चर्चेचा विषय बनला आहे.
भास्कर पेरे पाटील यांनी या निवडणुकीतून आणि प्रचारातून जाहीरपणे माघार घेतली होती”मी माझ्या कामात व्यस्त आहे,मला तारखा आहेत”पेरे पाटील यांचे हे शब्द,निवडणुकीत न उतरणे हा माझा वयक्तिक निर्णय होता आणि वयाच्या एका टप्पयावर आल्यावर माणसाने थांबावं आणि तरुणांना संधी द्यावी आणि तेच मी केल जेणेकरून एक वेगळा पायंडा महाराष्ट्रात पडेल.
गावात 8 उमेदवार हे आधीच बिनविरोध निवडून आले होते पाटोद्यात फक्त तीन जागांसाठीच निवडणूक झाली होती,त्याच तीनमधील एका जागेसाठी पेरे पाटील यांच्या कन्या उभ्या होत्या,त्यांचा अल्पश्या मतांनी पराभव झाला
आणि सगळीकडे चर्चा सुरु झाली,की हे कसेकाय घडले?
जेव्हा मी (आम्ही)निवडणुकीच्या आधी गावात गेलो असता लोकांना बोलायचा प्रयत्न केला,बोलत करायचा प्रयत्न केला आणि गावचा विकास व त्याला असलेले कांगोरे तपासण्याचा प्रयत्न केला,एवढा वलयांकित माणूस आणि त्यांची प्रतिमा नेमकी गावात कशी आहे हे जाणण्याचा आमचा अट्टहास होता.L.
सरळ,स्पष्ट या गावात कोणीच बोलत नाही पेरे पाटील वगळता, आता ते का बोलत नाहीत ते ठाऊक नाही पण एका प्रकारची भीती आणि आदरयुक्त भीती तेथील लोकांमध्ये दिसते.
आम्ही लहान मुलांपासून ते अगदी 70-80 वर्षाच्या आजीपर्यंत संवाद साधला आणि काही ठळक गोष्टी समोर आल्या.
पहिली आणि महत्वाची गावात सत्तांतर करण्याच्या तयारीत पाटोद्याचे लोक होते(पेरे पाटील ते स्वतःहून मान्य करतात)
दुसरी म्हणजे पाटलांचे गावात कमी राहणे आणि सतत फिरते राहणे व कधी कधी गावकऱ्यांना भाषणातून टोमणे मारणे(वयाच्या मध्यात असलेले जास्त लोक या मध्ये आहेत).

आम्ही गरजेपेक्षा जास्त टॅक्स भरतो आणि आमचे उत्पन्न जेमतेम आहे त्यामुळे आम्ही एवढा टॅक्स कसा आणि कुठून भरणार?बाकीकडे पण बऱ्याचश्या सुविधा मिळतात आणि त्या पण मोफत मग आम्ही का म्हणून एवढे पैसे भरायचे?

तिसरी गोष्ट म्हणजे पाटलांचे बेधडक बोलणे आणि पाटील म्हणतील ती पूर्वदिशा,या प्रकाराला काही लोक एकाधिकारशाही किंवा हुकूमशाही सुद्धा म्हणतात.
या सर्व गोष्टी किंवा कारणे कदाचित पाटोद्यामधील सत्तांतराला कारणीभूत ठरली असतील.
25 वर्ष गावाची सेवा करून आपल्या गावाला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यात पेरे पाटलांचा सिंहाचा वाटा आहे
पेरे पाटील यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेऊन एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर उभा केला आहे.
त्यांच्यावर असलेले काही आक्षेप ते सुद्धा मान्य करतात कदाचित त्यातच त्यांचं मोठेपण असावं

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...