Sunday, November 8, 2020

महाराष्ट्रची अस्था कडे वाटचाल.(प्रस्थापना)

1-दुसऱ्याच्या मताची किंमत न करणे म्हणजे अभिव्यक्ती नाही.
2-ब्राम्हण द्वेष म्हणजे पुरोगामीत्व नाही.
3-वास्तव नाकारणे म्हणजे निराशावादी असणे असे नाही.
4-आपल्या हक्काच्या आणि आदर्श,इतिहास,साहित्य संस्कृती अशा अनेक गोष्टींची हेटाळणी करणे म्हणजे आधुनिकता नाही.
5-मराठी वर प्रेम,आदर म्हणजे बाकींच्या भाषेचा द्वेष नाही.

अति सहिष्णू(सहनशीलता) असणे हे कधी कधी भारतासारख्या देशाला हजारो वर्ष गुलाम ठेवू शकते
थोडक्यात काय तर टोकाची उदारता आणि संकुचितता दोन्हीही माणसाच्या आणि समाजाच्या अस्तित्वाला हानिकारक आहेत.
सामाजिक आणि भोगौलिक रचनेचा विचार केला तर लोकांचे विभाजन,जमिनीचे विभाजन,आचार विचारांचे विभाजन हे काही प्रमाणात गरजेचे आहेत,अन्यथा हुकूमशाहीचा धोका संभवतो.
माहिती आणि समज म्हणून जगाच्या राजकारणात रस दाखवणे हे योग्यच पण थेट तुलना आणि अनुकरण करण्याचा विचार म्हणजे आत्मघातच आहे.
आता आपल्या महाराष्ट्राकडे येऊयात,सामाजिक ,आर्थिक,सांस्कृतिक,शिक्षण,आणि राजकीय क्षेत्रात आज "महाराष्ट्र" कुठे आहे?
आज आपण आपल्या राज्याला स्वयंभू म्हणतो मग आम्हाला अगदी आमच्या भाषेपासून ते कामासाठी लागणाऱ्या  लोकांपर्यंत दुसऱ्यावर का अवलंबून रहावे लागत आहे?
मराठी भाषेबद्दल स्थानिक प्रशनांबद्दल आपण आणि आपले राजकारणी एव्हढे उदासीन का?
जसा जसा काळ पुढे सरकतोय तसा तसा आपला स्वाभिमान बोथट आणि मरगळतोय आणि परावलंबित्व हे झपाट्याने वाढतय.
आपण मान्यच करत नाही आहोत की आम्ही बिमार आहोत,इलाजाची गरज आहे हे आपण मान्यच करत नाही आहोत.एक काळी पट्टी महाराष्ट्रीय जनतेने आपल्या डोळ्यावर बांधली आहे,ती जर त्याने काढली तर त्याला सगळ दिसेलही कदाचित,पण ती पट्टी आता त्याला काढायची नाहीये.जातीची,पंथाची,धर्माची,आधुनकीतेची अश्या अनेक पट्ट्या अनेक लोक लावून फिरताय आणि त्यालाच दिव्यदर्शन समजत आहेत.
स्वाभिमान ,निष्ठा आणि कृतज्ञता या विषयांचा विचार केला तर आमची तुलना एक भटका कुत्रा आणि एक गरजू वेश्या या दोघांसोबतही होऊ शकत नाही,कारण त्या दोन्हींनीही त्यांची किंमत ठरवून स्वतःला विकलेले असते आणि तेही योग्य दरात आणि दारात (घरात नाही).
आम्ही जेवढे भारतीय झालो,राष्ट्रवादी,झालो धर्मनिरपेक्ष झालो अगदी जाती साठी माती खाल्ली आपापल्या समाजाचे भले केले आणि बरच काही,पण त्याच्या पन्नास टक्के जरी मराठी आणि महाराष्ट्रासाठी केल असत,सार्वजनिक हिताचा विचार केला असता तर मराठी भाषेबरोबर मराठी माणूस म्हणून या महाराष्ट्रातील प्रत्येक विभागलेल्या माणसाला लाचार आणि निगरगठ्ठ व्हाव लागल नसत.
अनेक वेब series बघून नितांत चर्चा करतो जागतिक आणि राष्ट्रीय चळवळीचे दाखले देतो,अगदी अमेरिकन क्रांतीपासून ते चिपको आंदोलनापर्यंत सर्व काही मुखपाठ आहे आमच्या.पण विषय जेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा येतो तेव्हा मात्र काही अपवाद वगळता सगळे मौन व्रत धारण करतात,काहींना माहिती नाहीये तर काहींना माहित असूनही बोलायचं नाहीये ,का कारण ते लोकल आहे त्यात काही विशेष नाहीये अस म्हणणाऱ्या पिढ्या आता तयार होत आहेत पुढे तर अवघड आहे.वाचन संस्कृतीचे दाखले देणारा महाराष्ट्र,आपलाच इतिहास लोकांपर्यंत पोहचवू शकत नाहीये,आणि मला कस मराठी बोलता येत नाही,मी कस या सर्व लोकल गोष्टींकडे लक्ष देत नाही,मी मराठी पेपर पुस्तके,कविता किंवा चित्रपट बघत नाही हे आज महाराष्ट्रात सरासरी आहे किंबहुना तो कूलपणा समजला जातो,मग तेव्हा विचाराव लागत"कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ".
पोटाच आणि परिस्तिथीच दारिद्र्य हे काही काळ असू शकत किंवा त्यावर मात करताही येते,पण वैचारिक आणि तात्विक दारिद्र्य हे तुमच आयुष्य ध्येयहीन किंवा निरर्थक बनवत असते.

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...