Sunday, February 27, 2022

काँग्रेस सोडून तिसऱ्या आघाडीचा पर्याय शक्य आहे का?

तिसरी आघाडी हे नाव तुम्ही ऐकलं असेल, काहींना त्याचा अर्थ माहीत असेल, काहींना नसेल, त्यांच्यासाठी हा लेख आहे, तिसऱ्या आघाडीचा पर्याय सध्या शक्य आहे का?
मोरारजी, चरणसिंह, व्ही. पी. सिंह, चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल, वाजपेयी असे सात काँग्रेसेतर पंतप्रधान आघाड्यांच्या प्रयोगातून आजवर मिळाले. यात वाजपेयी वगळता एकालाही कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही..म्हणजे हे काम फार किचकट आहे..काही पक्षांचे मिळून सरकार असेल तर ते अवघड जाते,बिगर भाजप व बिगर काँग्रेस’ शक्तींची युती पुन्हा चर्चेत आली आहे. अशी संयुक्त आघाडी याअगोदरच १९९६ साली सत्तेत आली होती. त्याआधी हा प्रयोग झाला होता पण त्याला तिसरी आघाडी म्हणता येऊ शकत का नाही हे सांगता येत नाही, कारण आजचा भाजप सुद्धा त्यात होता पण नाव वेगळं होत,इंदिरा गांधींच्या विरोधात जनसंघ सुद्धा त्यावेळी होता, त्यानंतर सत्तेत आलेली 1996 ची संयुक्त आघाडी दोनच वर्षे सत्तेत होती आणि या दोन वर्षांत या आघाडीला दोन पंतप्रधान द्यावे लागले..यावर लाडाने किंवा थट्टेने तेव्हा अस म्हंटल जायचं की चड्डी बद्दलल्यासारखे पंतप्रधान बदलत आहेत, शिवाय या आघाडीचा कारभार तसा दिशाहीनही होता. आपल्या देशात तेव्हापासून तिसरी आघाडी हा विनोदाचा विषय झाला आहे त्यावर गांभीर्याने कुणी विचार करताना डी यानंतर तिसरी आघाडी पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न झाले; पण या ना त्या कारणांनी ते फिसकटलेच. २००९ साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पुढाकार घेऊन मायावतींना पुढे करून हा प्रयत्न केला होता. पण मतदारांनी माकप व मायावतींच्या पदरात एवढे कमी खासदार टाकले की, तिसरी आघाडी आपोआपच चर्चेतून बाद झाली, तिसऱ्या आघाडीची चर्चा upa च्या दुसऱ्या शासनाच्या वेळेस सुद्धा झाली होती,आणि काल उद्धव ठाकरे व kcr यांच्या भेटीमुळे या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे,तिसरी आघाडी यशस्वितेबद्दल रास्त शंका असू शकतात.तो प्रयोग आजच्या व्या व्यावहारिक आणि उथळ राजकारणात होऊ शकतो का?झाला तर टिकू शकतो का? पण १९९८ साली जेव्हा भाजपप्रणीत रालोआ(nda)सरकार सत्तेत आले, तेव्हाही हे सरकार किती दिवस टिकेल याची शास्वती कुणीच घ्यायला तयार नव्हते, काँग्रेस कडून सांगितल्या जात होतं की आज पडेल उद्या पडेल?नाही पडलं तर परवा नक्की पडेल पण तस झालं नाही, आजच उदाहरण घ्या महाविकास आघाडी ने दोन वर्षे पूर्ण केले आहेत, १९९९ साली सत्तेत आलेल्या वाजपेयी सरकारने अगदी सहजपणे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. १९९८ साली जेव्हा डझनभर पक्षांचे वाजपेयी सरकार सत्तेत आले, तेव्हा काँग्रेसने याची ‘खिचडी सरकार’ म्हणून थट्टा केली होती आज जशी तीन चाकाची सायकल म्हणून थट्टा होते तशी, व ‘एकला चलो रे’ अशी भूमिका जाहीर केली होती.अगदी तसच  काँग्रेसला २००४ व २००९ साली असेच खिचडी सरकार बनवावे लागले. एवढेच नव्हे तर वाजपेयी सरकारप्रमाणे मनमोहन सिंग यांच्या सरकारनेसुद्धा दोन्ही खेपेला कार्यकाळ पूर्ण केला. याचाच अर्थ असा की भाजप आणि काँग्रेस योग्य वेळी योग्य ते धडे शिकले.काँग्रेस सोडून एका तिसऱ्या आघाडीचा विचारात काही तथ्य आहे का?हे आपल्याला लवकरच कळेल..

Tuesday, February 1, 2022

मराठी माणसाचा पाठीराखा ते हिंदुहृदयसम्राट.. बाळासाहेब ठाकरे कसे झाले..

बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ध्रुवतारा जो आजही आपल्या विचाराने शिवसेनेला आणि शिवसैनिकीला प्रेरणा देत आहेत..आज आपण शिवसेनेच्या राजकीय उदयावर बोलू, राज्यात शिवसेना कशी सत्तेवर आली ,राज्यव्यापी पक्ष कसा झाला हे जाणून घेऊया..1966 साली मराठीच्या मुद्दयावर शिवसेनेची स्थापना झाली, लोकांचा चांगला पाठिंबा शिवसेनेला मिळत होता,मराठी माणूस या मुद्द्यावर शिवसेनेचे काही प्रतिनिधी निवडून सुद्धा येऊ लागले आणी एक स्थानिक पक्ष म्हणून शिवसेना चांगलाच जम बसवू लागली आणी लोक सुद्धा स्वीकारू लागले,पण पाहिजे असे यश आणी प्रसिद्धी शिवसेना 1990 पर्यंत मिळवू शकली नव्हती.कारण मराठीचा मुद्दा राज्यव्यापी होत नव्हता मुंबई पुणे नाशिक इथपर्यंत शिवसेनेचे अस्तित्व दिसत होते, तसेच काही शिवसैनिक जे जोमाने आणि अत्यंत प्रामाणिकपणे शिवसेनेसाठी काम करत होते ते शिवसेना ग्रामीण भागात पोहोचवत होते  आज जेष्ठ असलेल्या बऱ्याच नेत्यांचा त्यात सहभाग होता. ,
1070 साली कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पहिला आमदार झाला त्यांच नाव होत आनंद महाडिक,कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर बाळासाहेब आणि शिवसेनेवर मोठे गंभीर आरोप झाले होते.
1968 साली मुंबई पालिकेत प्रवेश मिळाला असला तरी सेनेचे पहिले महापौर खुर्चीत बसायला 1971 साल उजाडलं. दादरचे डॉ. हेमचंद्र गुप्ते शिवसेनेचे पहिले महापौर झाले. 1972 साली प्रमोद नवलकर विधानसभेत गेले. तर त्याच्या पुढच्या वर्षी सतीश प्रधान ठाण्याचे महापौर झाले.त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एका मोठ्या राष्ट्रीय मुद्द्याला हात घातला तो म्हणजे आणीबाणीचा,सगळ्यांना थक्क करत शिवसेनेने 1975 साली आणीबाणीला पाठिंबा जाहीर केला. पण सत्ता हस्तगत करण्यासाठी हे पुरेसं नव्हतं काहीतरी ठोस आणि भावनिक व राज्यव्यापी मुद्दा असणं गरजेचं होतं आणि ते शिवसेनेला 1985 च्या नंतर मिळालं.गिरणी कामगारांचा संप आणि राममंदिर आंदोलन व बाबरी मस्जिद पडल्यानंतर शिवसेनेने घेतलेली भूमिका या दोन गोष्टी शिवसेनेच्या राजकीय उदयासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.(13)पण डिसेंबर 1992 मध्ये जे झालं त्याने बऱ्याच जणांचं राजकीय नामकरण आणी पुनर्वसन केलं त्यामध्ये ,मराठी माणसाचा पाठीराखा ते हिंदू हृदय सम्राट हा प्रवास बाळासाहेब यांनी फक्त दोन वर्षात केला (1992-1993)बाबरी मस्जिद प्रकरण आणी त्यानंतर उसळलेल्या दंगली बाळासाहेब यांना राष्ट्रीय ओळख देऊन गेल्या ,कुठे एक स्थानिक पक्ष जो मराठी माणसाच्या हक्कासाठी लढतो किंवा लढला तो आता हिंदूंसाठी लढणार होता.1995 च्या निवडणुकीत शिवसेनेला त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा फायदा झाला शिवसेना सत्तेवर आली, पण तो प्रभाव कायमस्वरूपी टिकला नाही (1993 मुंबई दंगे )कारण आजपर्यंत शिवसेना एकदाही एकहाती सत्ताआणू शकलेली नाहीये,पण एक बिनधास्त आणी धाडसी हिंदू नेता म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची ओळख पूर्ण देशात झाली. दुसरा मुद्दा हा गिरणी कंगरसंदर्भातला आहे,2 ते 3 लाख गिरणी कामगार मुंबईत होते दत्ता सामंत हे मोठे कामगार नेते होते, त्यांचा प्रचंड प्रभाव मुंबईतील कामगारांवर होता,सगळ्यात लांबलेला आणि पुढे ठोस असा निष्कर्ष न निघलेल्या संपाच ते नेतृत्व करत होते,1985 नंतर मुंबई मध्ये डावे पक्ष आणि नेते हतबल होत चालले होते, त्यांचा आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव कमी होत चालला होता, पुढे संप इतका ताणला की तो कायमचाच तुटला आणि कामगारांमध्ये प्रचंड नैराश्य आलं आणि त्याचा फायदा शिवसेनेला झाला. त्या काळात हा निराश झालेला कामगार जो होता तो शिवसेनेच्या जवळ गेला. शिवसेनेनं त्याचा जो न्यूनगंड जो होता, तो अहंगडात परावर्तित केला.मराठी माणसाच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक होतीच, पण याच काळात बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्चाचा मुद्दा उचलताच अनेक जण सेनेकडे आले. बहुसंख्य गिरणी कामगार हे मराठी होते. त्यातही कोकणी होते. जरी शिवसेनेनं संपाच्या काळात विरोधी भूमिका घेतली होती तरीही नंतर मराठी आणि हिंदुत्व या दोन्ही मुद्द्यावर कामगार आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या सेनेकडे आकर्षित झालेल्या पहायला मिळतात. त्यानं मुंबईवरचं सेनेचं वर्चस्व प्रस्थापित केलं.इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राममंदिरासारखे मुद्दे देशभरात मोठे होऊ लागले. बाळासाहेब ठाकरेंनी जहाल हिंदुत्वाची भूमिका घेतली. त्याला हिंदू-मुस्लिम असा रंग चढत गेला. त्यातून त्यांचा जनाधार वाढत गेला. संपाच्या काळात नैराश्यानं झपाटलेलं मराठी जनमानस त्यांनी एकत्र केलं होतं..शिवसेनेचा हा म्हणजे 0 तुन विश्वनिर्मितीचाच म्हणावा लागेल.. आज शिवसेनाच मुख्यमंत्री राज्यात आहे, आणि मताच्या राजकारणात आज शिवसेना यशस्वी आहे...

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...