मोठेपणा आणि अविर्भावात सत्य आणि विवेकाचे अस्तित्व जसे फडफडणाऱ्या दिव्यासारखे असते,तसेच काही आज काही प्रादेशिक पक्षांचे झाले आहे आपल्या तथाकथित पक्षाचा महान इतिहास आणि संघर्ष,स्थानिक नेत्यांना खऱ्या आणि वास्तविक परिस्तितीची जाणीवच होऊ देत नाहीये..
पुतळे बांधून, आपल्या दिवंगत आणि हयात असलेल्या नेत्यांच्या नावांनी योजना चालू करून पक्ष बळावत नसतो तर फक्त जस्याश तसा राहतो किंबहुना परस्परावलंबी बनत असतो.
मुळात निवडणुका जरी आकड्यांचा आणि समीकरणांचा खेळ असला तरी राजकारण आणि लोकमान्यता ह्या गोष्टी समीकरणांवर तग धरू शकत नाहीत,त्याच उत्तम उदाहरणं म्हणजे मोदी आणि इंदिरा गांधी राजकारणाच्या खेळात यशस्वी झाले,आणि दुसऱ्या बाजूला मोरारजी देसाई,कामराज आणि शरद पवार हे भावी पंतप्रधान म्हणूनच राहिले,असंख्य तडजोडी,खोटारडेपणा आणि बरच काही.....काहीच कामी आलं नाही.
माणसाचे अस्तित्व त्याचे कर्म आणि आयुष्यातील सक्रियतेत असते,जिवंत असण्यात नाही तसेच प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व हे स्थानिक भावना आणि प्रश्नात असते,आकड्यात नाही.
काँग्रेस च्या काळात म्हणजे नेहरूनपासून ते अगदी राहुल गांधींपर्यंत कोणत्याही राज्याच्या स्थानिक अस्मिता बळकावण्याचा प्रयत्न हा कमी प्रमाणात झालेला दिसतो,दरबारी राजकारणाची प्रथा जी प्रचलित आहे ती अशी की,स्थानिक एखादा नेता जो लोकप्रिय आहे आणि बहुसंख्यनच्या गटातला आहे (मराठा,धनगर रेड्डी,शीख,जाट,मुस्लिम )त्याच्याकडे नेतृत्व सोपवलं जायचं आणि सर्व हक्क दिल्लीकडे अबाधित ठेवायचे,हे नेहरूंपेक्षा इंदिरा गांधींनी चांगल्या प्रकारे राबवलं.
काँग्रेस च्या विरोधात त्याकाळी जे लोक आणि पक्ष उभे राहत होते,काही पर्याय उभे राहत होते ते फक्त काही काँग्रेस विरोधांमुळेच उभे राहत होते असं मुळीच नव्हतं.
आपण वाचून आकलन करतो पण वास्तविक आणि तर्कशुद्ध आकलन करत नाही,त्यामुळे आपले अंदाज चुकतात.
आज खलिस्तानी अस्मितेवर उभे राहिलेले पक्ष कुठे आहेत?त्यांच्या विचारधारेचं काय झालं ?
आज द्राविडी अस्मितेवर उभे राहिलेले पक्ष कुठे आहेत ?त्यांना राजकीय तडजोडी का कराव्या लागल्या ?आंध्र अस्मिता आज का विभागली ?उत्तरपूर्वेकडील देश आज दिल्लीप्रती इतके संवेदनशील कसे झाले ?ज्या मराठी अस्मितेवर महाराष्ट्राची निर्मिती झाली,त्या विचारांची आणि अस्मितेची धडगत का झाली (उडाली)शेतकरी चळवळी,डाव्या चळवळी आणि इतर सामाजिक चळवळी आज गलितगात्र आणि हतबल का झाल्या?
भारतात भावनिक आणि मूर्तिपूजक लोक जास्त राहतात त्यामुळे संस्कृती ला विचारधारेसोबत जोडूनच लोकांना एकत्रित बांधता येऊ शकत हे सर्वात आधी कट्टर हिंदुत्ववादी आणि इस्लामिस्ट संघटनांनी हेरलं आणि त्याचेच हे परिणाम आहेत की,आज लोकांना संस्कृती आणि धर्मातला फरक कळत नाही.
नमस्कार मी ज्ञानेश्वर मोरे, सर्वप्रथम तुम्ही माझ मत जाणून घेण्यासाठी इथपर्यन्त आलात त्याबद्दल तुमचे आभार! या ब्लॉगस्पॉटमार्फत मी देशातील राजकीय गोष्टीवरील माझे निरीक्षण आणि त्याच झालेलं माझं आकलन मी याठिकाणी लिहीत असतो. "व्यक्ति तितक्या प्रवृत्ती" या गुणधर्मानुसार, इथे लिहिलेली मते ही सर्वस्वी माझी मते असल्याने ती सर्वाना पटतील असं नाही. पण याठिकाणी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन की येथील मते ही निपक्षपाती आणि सर्वसामान्य लोकांना आकलनात येतील अशी असतील.
Tuesday, April 27, 2021
प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व पणाला........(पार्श्वभूमी आणि भाग 1)
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)
Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...
-
देशात लोकसभेच्या निवडणूकीचा वेगळा ट्रेंड सुरु होता, आणि दक्षिण भारतात खास करून आंध्र प्रदेशात वेगळा ट्रेंड सुरु होता.. एका टी-ट्...
-
विजय तामिळनाडू मधील जगप्रसिध्द असलेला एक कलाकार हव तर हिरो म्हणा.. राज्याच्या राजकारणात सक्रिय होत आहे.. सूर्याची जशी दुरून आपण वर्णने करतो,...
-
2024 विधानसभा निवडणुका या राज्यातील प्रादेशिक तसेच महत्वाच्या दोन्हीही राष्ट्रीय पक्षांसाठी एक निर्णायक संदेश देणार्या होत्या. निवडणुकीपूर...
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्ष ह्याच मुद्यावरून एकत्र आले असावेत का??
ReplyDeleteकारण भाजप सोबत राहून शिवसेना चे अस्तित्व पण कमी होत होते ???
राष्ट्रवादी हा पक्ष स्वतः ला प्रादेशिक पक्ष मानत नाही,त्याच्या मागे पवारांच्या इच्छा आणि महत्वकांक्षा होत्या,पण ते कधीच जमलं नाही.
ReplyDeleteभाजप पेक्षा जास्त धोका राष्ट्रवादीकडून सेनेला आहे,हे बाळासाहेबांना माहीत होत,म्हणून त्यांनी ते टाळलं.