तिसरी आघाडी हे नाव तुम्ही ऐकलं असेल, काहींना त्याचा अर्थ माहीत असेल, काहींना नसेल, त्यांच्यासाठी हा लेख आहे, तिसऱ्या आघाडीचा पर्याय सध्या शक्य आहे का?
मोरारजी, चरणसिंह, व्ही. पी. सिंह, चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल, वाजपेयी असे सात काँग्रेसेतर पंतप्रधान आघाड्यांच्या प्रयोगातून आजवर मिळाले. यात वाजपेयी वगळता एकालाही कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही..म्हणजे हे काम फार किचकट आहे..काही पक्षांचे मिळून सरकार असेल तर ते अवघड जाते,बिगर भाजप व बिगर काँग्रेस’ शक्तींची युती पुन्हा चर्चेत आली आहे. अशी संयुक्त आघाडी याअगोदरच १९९६ साली सत्तेत आली होती. त्याआधी हा प्रयोग झाला होता पण त्याला तिसरी आघाडी म्हणता येऊ शकत का नाही हे सांगता येत नाही, कारण आजचा भाजप सुद्धा त्यात होता पण नाव वेगळं होत,इंदिरा गांधींच्या विरोधात जनसंघ सुद्धा त्यावेळी होता, त्यानंतर सत्तेत आलेली 1996 ची संयुक्त आघाडी दोनच वर्षे सत्तेत होती आणि या दोन वर्षांत या आघाडीला दोन पंतप्रधान द्यावे लागले..यावर लाडाने किंवा थट्टेने तेव्हा अस म्हंटल जायचं की चड्डी बद्दलल्यासारखे पंतप्रधान बदलत आहेत, शिवाय या आघाडीचा कारभार तसा दिशाहीनही होता. आपल्या देशात तेव्हापासून तिसरी आघाडी हा विनोदाचा विषय झाला आहे त्यावर गांभीर्याने कुणी विचार करताना डी यानंतर तिसरी आघाडी पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न झाले; पण या ना त्या कारणांनी ते फिसकटलेच. २००९ साली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पुढाकार घेऊन मायावतींना पुढे करून हा प्रयत्न केला होता. पण मतदारांनी माकप व मायावतींच्या पदरात एवढे कमी खासदार टाकले की, तिसरी आघाडी आपोआपच चर्चेतून बाद झाली, तिसऱ्या आघाडीची चर्चा upa च्या दुसऱ्या शासनाच्या वेळेस सुद्धा झाली होती,आणि काल उद्धव ठाकरे व kcr यांच्या भेटीमुळे या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे,तिसरी आघाडी यशस्वितेबद्दल रास्त शंका असू शकतात.तो प्रयोग आजच्या व्या व्यावहारिक आणि उथळ राजकारणात होऊ शकतो का?झाला तर टिकू शकतो का? पण १९९८ साली जेव्हा भाजपप्रणीत रालोआ(nda)सरकार सत्तेत आले, तेव्हाही हे सरकार किती दिवस टिकेल याची शास्वती कुणीच घ्यायला तयार नव्हते, काँग्रेस कडून सांगितल्या जात होतं की आज पडेल उद्या पडेल?नाही पडलं तर परवा नक्की पडेल पण तस झालं नाही, आजच उदाहरण घ्या महाविकास आघाडी ने दोन वर्षे पूर्ण केले आहेत, १९९९ साली सत्तेत आलेल्या वाजपेयी सरकारने अगदी सहजपणे पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. १९९८ साली जेव्हा डझनभर पक्षांचे वाजपेयी सरकार सत्तेत आले, तेव्हा काँग्रेसने याची ‘खिचडी सरकार’ म्हणून थट्टा केली होती आज जशी तीन चाकाची सायकल म्हणून थट्टा होते तशी, व ‘एकला चलो रे’ अशी भूमिका जाहीर केली होती.अगदी तसच काँग्रेसला २००४ व २००९ साली असेच खिचडी सरकार बनवावे लागले. एवढेच नव्हे तर वाजपेयी सरकारप्रमाणे मनमोहन सिंग यांच्या सरकारनेसुद्धा दोन्ही खेपेला कार्यकाळ पूर्ण केला. याचाच अर्थ असा की भाजप आणि काँग्रेस योग्य वेळी योग्य ते धडे शिकले.काँग्रेस सोडून एका तिसऱ्या आघाडीचा विचारात काही तथ्य आहे का?हे आपल्याला लवकरच कळेल..
No comments:
Post a Comment