आणल्या जाऊ शकत नाही, एवढंच नाही तर जात आणि धर्माच्या पलीकडे जाऊन ठळकपणे हा 'सावळा गोंधळ, आपल्याकडे चालू असतो. इतिहासातही यावर अपेक्षित बोलल्या गेलं नाही, वर्तमानात आपण ही समस्या एकतर हसण्यावारी नेतो किंवा दुय्यम ठरवतो. पण हे खरंच दिसत तेवढं सोपं आहे का? शाळेपासून ते आत्तापर्यंत गोऱ्या मुली आणि सावळ्या मुली यांच्यात होणारा सगळ्या स्थरावरचा भेदभाव मी बघितला आहे, वयक्तिक आणि व्यावहारिक आयुष्यात लागणाऱ्या गोष्टी आणि लोक जर रंग बघून जवळ येत असतील तर ही आधुनिक अस्पृश्यता नाही का? ही सामाजिक समस्या नाही का? आपल सामाजिक कर्तव्य नाही का, की एखाद्या मुलाला, मुलीला फक्त रंगाच्या आधारे भेदभाव होता कामा नये याची काळजी घेण्याचा.. जसा जसा व्यक्ती मोठा होत जातो तेव्हा त्याला कळायला लागतं की माणूस आतून कसा आहे याला काहीही किंमत नाही, तो बाहेरून किती चमकतो याला महत्व आहे.. तसेच समाजाची आणि जवळच्या मानलेला लोकांचे खरे काळेकुट्ट चेहरे समोर यायला लागतात.. आणि मग चालू होतात ते गोर होण्याचे प्रयोग, इंस्टा फिल्टरचे प्रयोग, म्हणजे थोडक्यात काय तर आजूबाजूची माणसंही मनाने काळीकुट्ट आणि ते माणसं
दाखवणारी इंस्टाग्रामची नजरही काळीकुट्ट..कित्येक मुलींचे हल्ली मुलांचे रंगामुळे लग्न मोडतात किंवा बळजबरी होतात ही गोष्ट सोपी नाहीये, अभिनय क्षेत्रात, मीडिया क्षेत्रात वाढत्या स्पर्धेचा मुकाबला करण सोपं आहे पण या ,सावळ्या, रंगाची जी गडद पट्टी समाजावर आणि प्रवाहातील मुख्य लोकांवर बसली आहे ना ती काढणं लय अवघड आहे..
No comments:
Post a Comment