आज दोन्हीही पक्ष (भाजप-काँग्रेस ) जनतेसमोर आपल्या उपलब्ध असलेल्या साधनातून एकही नेरेटिव्ह सेट करू शकले नाहीत.. गेल्या सहा महिन्यापासून दोन्हीही पक्ष आपल्या बाजूने अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत पण ते होताना दिसत नाहीये.. 2 मिनटात मॅगी, आणि 1 मिनटात कन्टेन्ट देणाऱ्या जमान्यात आपला नेरेटिव्ह सेट करायला या पक्षांना अपयश आले आहे.. राम मंदिर, सनातन, राष्ट्रवाद, अदानी प्रकरण, निवडणूक रोखे, भारत जोडो 2.0 असे मोठे इव्हेंट्स आणि घटना सुद्धा तग धरताना दिसत नाहीये..
जनतेच्या वाढत चाललेल्या अपेक्षा, शॉर्ट टर्म मेमरी, व्यक्तीकेंद्री होत चालेलेले राजकारण, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देण्याची वाटणारी गरज.. या काही गोष्टी आहेत ज्या दोन्हीही पक्षांना अजेंडा सेट करताना अडचणीच्या जात आहेत.. जर कोणताच मुद्दा किंवा वातावरण नसताना भाजपला विजय मिळाला तर तो दयेच्या स्वरूपातील असेल आणि तो कोणत्याच पक्षाला नको असतो.. कारण ती दूरच्या राजकारणातील तुमच्या शेवटाची सुरुवात असते.. दुसऱ्या बाजूला.. काँग्रेस काही प्रमाणात परिश्रम घेताना दिसत आहे पण ते आम्ही प्रयत्न करत आहोत हे जनतेपर्यंत पोहचले नाही.. त्यामुळे जर काँग्रेसच्या काही जागा जरी वाढल्या तरी त्या जनेतेने दिलेली भीक वाटायला नको.. निदान एवढे प्रयत्न करताना तरी काँग्रेसने दिसायला पाहिजे.. सोशल मीडिया आणि प्रचारातील वेगळेपण यातून काँग्रेसने देशातील काही भागात का होईना पक्षाला सक्रिय आणि जनतेला आकर्षित केले आहे.. याचा त्यांना उत्तर आणि नॉर्थ ईस्ट मध्ये फायदा होऊ शकतो.. याच आधारावर भाजपला तेलंगणा आणि तामिळनाडू मध्ये फायदा होऊ शकतो..
मोदींचे जनतेसमोर सारखे सारखे येणे हे भाजपला नेरेशन आणि कम्युनिकेशन सेक्टर मध्ये काही प्रमाणात मागे घेऊन गेले आहे.. जनतेला आपल्याला ऐकावस न वाटणे हि संबंधित पक्षासाठी आणि नेत्यासाठी कमीपणाची गोष्ट आहे.. त्यामुळे मोदींनी गेल्या अनेक दिवसापासून लेख, पेपर्सना इंटरव्हिव्ह द्यायला सुरुवात केली.. डिजिटल कन्टेन्ट क्रियेटर्सना घेऊन जनतेसमोर आले.. या आधी स्वतः मोदी सेन्टरला राहायचे पण यावेळेस युट्युबर्स सेन्टरला होते.. हि गोष्ट आपल्याला बरेच काहीतरी सांगून जाते..
दुसऱ्या बाजूला राहुल गांधींची लोकप्रियता आणि त्यांना गांभीर्याने ऐकणाऱ्या लोकांची संख्या वाढली पण पक्षाची सुस्त पडलेली संघटना, अंतर्गत संवादाचा अभाव या गोष्टी मारक ठरल्या.. आणि राहुल गांधी एक चांगला माणूस बनून राहिले, संवेदनशील माणूस बनून राहिले.. चांगले पर्यायी नेता म्हणून जनतेपर्यंत पोहचले नाही..
No comments:
Post a Comment