Wednesday, July 8, 2020

लॉकडाउन एक व्यापक कट


Dayaneshwar more.
9623480172
लोकशाही , अभिव्यक्ती या गोष्टी फक्त आपल्याला साजेसं असं काही घडत असेल किंवा घडलं असेल असेल तेव्हाच तर गाह्य धरल्या जातात अन्यथा ते सर्व तकलादू आणि थोतांड असत.कायदा फक्त घर दारापर्यंत. जीवावर कायदा उठला की माणूस कायदेशीर कायद्याची बोली लावतो अगदी 50 पासून ते लाखापर्यंत आणि हे सर्व करण्यासाठी गरज असते ती संधीची एका किचकट आणि प्रतिकूल वेळेची एकदा का ती वेळ गाठली की माणसात लपलेला राक्षस किंवा आदिमानव हा पावसातल्या बेडकाप्रमाणे हळूच वर यायला लागतो अगदी कायदा आणि धरमाच्या छाताडावर पाय देऊन अधिकार आणि सत्तेच्या जोरावर आणि लोकांच्या उदासीनतेचा फायदा घेऊन मग रचल्या जातो एक कट.जपान वरती अनुबॉम्ब टाकण्यासाठी झालेल्या चर्चेचा वेळ ,1993 मध्ये बाबरी मस्जिद पाडल्याच्या नंतर मुंबई मध्ये झालेले स्फ़ोट यामध्ये गेलेला वेळ ,2008 साली झालेल्या 26/11 च्या हल्याचा कट रचण्यासाठी लागलेला वेळ ,ही सर्व उदाहरणं जरी विषयाशी निगडित नसली तरी मी मुद्दाम पणे ती तुम्हाला दिली आहेत कारण एखादी चांगली किंवा अनुचित गोष्ट अमलात किंवा जमिनीवर प्रत्यक्ष उतरवण्यास  साधारण किती वेळ लागतो ?वरील सर्व घटना या नकारात्मक असल्या तरी त्या 6 महिन्याच्या आत आखून प्रत्यक्ष जमिनीवर कृतीत उतवरवल्या आहेत.
आजची परिस्थिती थोडी वेगळी आहे 78-80 वर्षाचा म्हातारा (म्हातारी )जेव्हा घरात निपचित पडून असते आणि डॉक्टर सांगतात की आता 5 -6 महिने जगतील त्यामुळे सगळे जवळ रहा आता मुद्दा असा आहे की आपला माणूस तर जाणार आहे असं डॉक्टर सांगतायेत त्यामुळे आता शोक किंवा चिंता करून काही अर्थ नाही पण अर्थ नाही याचा अर्थ असा होत नाही की फायदा नाही.प्रसंग आणि प्रासंगिकता याचा अचूक वेध घेऊन कुटुंब सदस्य कामाला लागतात. ज्या व्यक्तीवर अमाप खर्च केला जीव लावला त्याच व्यक्तीच्या मरनाची वाट आता सगळं कुटुंब बघतय.आपले लोक फक्त कायदा किंवा तत्सम गोष्टीच नाही तर वेळ पडल्यावर देव ,धर्म ,पाप पुण्य सुद्धा manage करतात अगदी तसंच ह्या कुटुंबातील लोक्कांनी केलं दोन महिने चांगली काळजी घेतल्या नंतर मात्र सगळयांची बुद्धी "मंथरे "सारखी चालू लागली आणि विकल्प गोळा करू लागली.प्रामाणिक आणि सभ्य कुटुंब सदस्य  सुद्धा विचार करू लागले की जाणार्रा  तर जाणारच आहे पण आपल्याला काही देऊन गेला तर ?न सांगताच गेला तर ?मला काही मिळेल ना ?या उदाहरणाचा उद्देश असा की lockdown चा  कट किंवा षडयंत्र मन्हजे काही prlambit किंवा लांबलेली सरकारी फाईल नाहीये जी नेहमी हतबल किंवा सभ्य लोकांच्या माथी मारली जाते
ही ती फाईल आहे जी मुजोर आणि माजुरडे लोक आणि बेजबाबदार प्रशासन लगेच मंजूर करत किंवा पुढे पाठवत.मी काही घटना आणि प्रश्न तुमच्या समोर मांडणार आहे जे की आपल्यावर "जबाबदारी आणि खबरदारी "च्या नावावर खपवले आहेत.त्यातून तुमच्या सुद्धा द्यानातं येईल की हा कसा एक "उत्स्फूर्त कट आहे ते "
साधारण फेब्रुवारी ची गोष्ट आहे केंद्र आणि राज्य दोन्हीही स्तरावर माहिती आहे की कोरोना नावाची  काहीतरी रोगराई विदेशात चालू आहे मुख्यतो चीन अमेरिका ,इटली आणि काही देश. तेव्हा भारतातील रुग्ण होते 0% तेव्हा आम्ही वेगळ्या craze मध्ये होतो social media नावाच्या दलदलित फसून आभाशी जगात व्यर्थ आणि अजाण पनात nrc, caa या तत्सम गोष्टींचे समर्थन आणि विरोध करत होतो.वाढता प्रतीक्रियावाद हा समाजाचं सामाजिक आणि व्यक्तीची  मानसिक स्तिथी खीळखीळ करण्याचं काम करत असतो.उठ सुठ फालतू आणि फाझील गोष्टींवर व्यक्त होण्याची सवय लागली तर गंभीर आणि आवश्यक विषय बाजूला पडून फक्त चर्चेचा आणि prime time चा विषय होतात.कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार न करता आकलन ,विश्लेषण या गोष्टी फक्त नावालाच उरल्या आहे का असं वाटायला लागत.आणि तीच या कटाची पार्श्वभूमी आहे  100 दिवसाचा lockdown कोणत्याच  देशामध्ये लावण्यात आला नाही कारण तिकडे लोक्काना भावनिक साद घालून खोटी आशा दाखवून वेळकाढूपणा करता येत नाही आणि तेथील नागरिक ,पत्रकार ,activist,आणि क्रांतिकारक हे वेळेवर ठणकावतात आणि विरोध करतात आपल्याकडे झोपेचं सोंग घेऊन वेळ बघून विरोध करतात.
संकटकाळी मिळणाऱ्या सहानुभूतीचा फायदा घेणारे नीच आणि संधीसाधू नेते आणि अधिकारी हे सुद्धा तिकडे नसतात.हा कोरोना विमान मार्गे आला जेथून अजून बरेच रोग आपल्याकडे येतात.सगळं माहिती असताना सुद्धा तुम्ही त्याचा प्रतिबंध का केला नाही तुम्ही दारातील दुखणं घरात कशाला घेतलत ?जर सगळ्या यंत्रणा माणूस मेल्या नंतरच दखल घेत असतील तर विमा कंपन्या आणि शासनामध्ये फरक काय तो?ते ही गोड बोलतात गोल गोल बोलतात आणि हे ही गोड आणि गोल बोलतात.
जसं शुगर किंवा साखर बिमारी असणाऱ्या माणसांना साखर बंद सांगितलेली असते मग ती ती थोडी खाल्ली काय अन जास्त खाल्ली काय हानिकारक तर ती असतेच.मग lockdown च्या बाबतीत असं का नाही झालं मुख्यमंत्री साहेब हे lockdown फक्त सर्वसामान्य लोक्कांनीच का पाळलं ,त्यांनीच बेदम मार का खाल्ला आरोग्य आणि गरजेच्या नावाखाली लोक्कांचा मानसिक आणि शारीरिक छळ का केला ?
Lockdown सुरु झाल्याच्या नंतर सुद्धा नाशिक मधील एक मोठा कारखाना कसा चालू होता?तो आमदार साहेबांचा होता त्यामुळे चालू होता का ?नाशिक मधीलच घटना आहे एका डॉक्टरला mim चे नगरसेवक जाऊन बेदम मारतात 10-12 जण सोबत घेऊन ते पण तेव्हा त्यांना "पोलीसी"खाक्या कोण दाखवणार ग्रहमंत्री साहेब ?का त्यांना कोरोना होत नाही की तुमचेच हात दगडाखाली आहेत?
तुम्ही परप्रांतीय लोक्कांना नेऊन घालण्यासाठी जवळपास st आणि रेल्वेने मिळून 150 कोटी खर्च केले.त्याचा हिशोब विचारणार नाही तो विचारला तर राजकारण होईल नाही का ?पण तुम्ही लॉकडाउन असून सुद्धा तब्बल महिनाभर काम करणाऱ्या ऊसकामगारांची दखल का नाही घेतली?lockdown असून सुद्धा त्यांनी फक्त भीतीच्या पोटी तेथे काम केलं आणि राहिले असं का महोदय आपले आहेत याचा अर्थ असा होत नाही ना की त्यांनी वाऱ्यावर सोडा मन्हून.तुम्ही st अगदी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या थोडं बाहेर पर्यंत चालवली मग राज्यात मजुरांसाठी तुम्ही st का नाही चालवली परब साहेब ?कोरोना फक्त का मराठी माणसालाच होत काय?की st येत्या वर्षात तोट्यात दाखवून भाडेवाढ करून खासगी वाहनांची चांदी तर नाही करायची ना ?आम्ही दारू चालू करणार आहोत कारण ती गरज आहे पण एक सांगा महोदय दारू बंद कधी होती?बंद होती ती फक्त दुकान दारू nahi.कोटींची दारू या lockdown मध्ये बेकायदेशीर पणे विकल्या गेली हे जगजाहीर आहे त्यांना lockdown नव्हता का त्यांनी धंदा कसा केला ?आज चार महिने होत आहेत सर्वसामान्य माणूस तुम्हाला सहकार्य मन्हून सगळं काही बंद ठेवतोय मग दारू कशी विकल्या जाते?दारूचे कारखाने कोणाचे आहेत टक्केवारी कोणाची आहे ?ह्या बेकायदेशीर पणे विकलेल्या दारूचा हिशोब एवढ्या कायदेशीर पणे कसा येतो ?lockdown मधेच सापडलेल्या खोट्या नोटांच्या प्रकरणाचं काय झालं ग्रहमंत्री साहेब आठवत नसेल तर सांगतो पुण्याची घटना आहे ही.त्या बरोबरच आपल्याच राज्यतील एका आमदार पत्नीच्या दारूच्या दुकानाचा परवाना रद्द केला होता महोदय त्याच काय झालं lockdown मध्ये दारू विकल्याचा आरोप त्याच्यावर होता.10 ते 15 टक्के हजेरीचा नियम आपल्या मंत्री व आमदार साहेबांना नव्हता का मा महोदय?मागे झालेल्या सत्तेच्या वस्त्रहरनात सहभाग घेण्यासाठी हे आमदार आणि आजचे मंत्री मिळेल ते वस्त्र घालून वाऱ्याच्या वेगाने मुंबईला पोहचायचे.तेच आमदार आणि मंत्री कामावर का नाहीत महोदय तुम्ही त्यानां विनंती किंवा "वाघ डरकाळी "का नाही फ़ोडलीत महोदय?की सत्ता पडण्याची भीती आहे?
राज्यात मुख्य पदावर मराठी माणूस पाहिजेच पण तस होत नाही असो तो विषय वेगळा आहे.नंतरचा मुद्दा हा आहे की आपले ग्रहसचिव मेहता साहेब हे फरार घोषित असणाऱ्या वाधवाण कुटुंबाला लोणावळा ते महाबळेश्वर माझे कुटुंबीयच आहेत असं मन्हून कस काय पास देऊ शकतात?बाकीचे लोक काय मूर्ख आणि निराधार आहेत काय?दोन दोन दिवस कधी कधी तर 7 दिवस फक्त या जिल्ह्यतून त्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवानगी काढायला लागतात आणि वाधवाण कुटुंबाला स्वःताहुन ग्रहसचिव परवानगी देतात कसकाय ते?ed ने घोषित केलेल्या फरार आरोपीला ग्रहसचिव अशीच परवानगी देतात न सांगता न विचारता?मन्हजे अधिकारी लोक समांतर शासन तर नाही चालवत ना
अधिकारी लोकांची वाढती एकाधिकारशाही हा कशाचा परिणाम की ग्रहमंत्री सुद्धा त्यात सामील आहेत?सत्तावाटप होताना फक्त खात्याचा विचार केला जातो व्यक्तीचा नाही आणि त्यातूनच एक अकार्यक्षम आमदार मंत्री या पदावर विराजमान होत असतो त्याच्या अडाणी आणि मूर्खपणाचा अधिकारीवर्ग सर्रास उपयोग करतात हे वेगळं सांगायची गरज नाही.
आता सोनू सद या अभि"नेत्याने"चांगले काम केले लोक्काना आपापल्या गावी सोडले ज्यातील बहुतांश लोक पुन्हा परत येत आहेत विषय तो नाहीये ती सगळी काम पोलीस हजर असताना होत होती पोलिसांबरोबरंच काही अधिकारी सुद्धा तेथे असायचे हे कसकाय ग्रहमंत्री साहेब?ही काही राजकीय पूर्वतयारी तर नव्हती ना भाजप सोबत संसार थाटायची आणि विद्यमान मुख्यमंत्री यांच्यावर दबाव टाकण्याची कारण असंही फडणवीस एका मुलाखती मध्ये बोलले होते की राष्ट्रवादीची आम्हाला खुल्ली offer होती.असो तो ही आपला विषय नाहीये पण तुमच्या कानावर टाकावंस वाटलं नाही का.एकदा आपले अन्न व औषधी मंत्री शिंगणे साहेब मुंबईतील एका दुकानात जाऊन आढावा घेत होते की bow sanitizer विक्री मध्ये काही घोळ किंवा भाववाढ तर होत नाहीना.मग 50 ची बॉटल 100 ला  कशी मिळत होती शिंगणे साहेब?पोलिसांनी टाकलेल्या एका धाडीत हजारो लिटर sanitizer ते पण भेसळयुक्त सापडून सुद्धा तुम्ही त्याला आवर घालण्याचा प्रयत्न का नाही केला.राज्यात दोनच महिन्यात वेगवेगळ्या नावाच्या sanitizer कंपन्या कश्या चालू होतात शिंगणे साहेब?सलमान खानचा being human ब्रँड सुद्धा sanitizer विकतो शिंगणे साहेब या साऱ्या प्रक्रिया एवढ्या जलद कश्या होतात
हे सर्व लोक विचारत नसले तरी मंत्री आणि अधिकारी निर्लज्ज आहेत का ?हे sanitizer सोडा पण मास्कच काय?पाच लाख मास्क माननिय ग्रहमंत्र्याच्या हजेरीमध्ये पकडले गेले ते पण 2 अडीच महिन्याआधी त्या नंतर एवढा वेळ असताना सुद्धा राज्यात चालू असलेला मास्कचा काळा बाजार आपण थांबवलात का ग्रहमंत्री साहेब?
तुम्ही सुशांत सिंग च्या प्रसिद्धीचा फायदा घेण्यासाठी सांगितलं की कसून चौकशी होईल आणि जातीने त्याकडे लक्ष दिल पण आपल्या राज्यात जवळपास 5-7 सामूहिक आत्महत्या झाल्या होत्या त्यापैकी पुण्याची शिंदे परिवाराची तर खूपच हृदयदावक होती तेव्हा ह्या लोकांच्या आत्महत्येचा विचार आणि चौकशी शासन का करीत नाही ग्रहमंत्री साहेब?पालघर आणि नांदेड येथे झालेल्या साधूंच्या हत्येचा तपास कुठंपर्यंत आला आहे महोदय ?lockdown असताना सुद्धा राज्यात खून दरोडे चोऱ्या काळे धंदे सगळं काही चालू होत काल परवाच माझ्या तालुक्यातील एका मुलीला भर चौकात चाकू खूपसून मारलं एकतर्फी प्रेमातून याची जशी हवी तशी दखल आपले माध्यम आणि शासनाने घेतली का ?की ते सुद्धा आम्ही lockdown आहे त्यामुळे विसरून जायचं?
पूर्ण राज्यात कुठेना कुठे थोडयाफार का प्रमाणात होईना घराची बांधकाम चालू होती त्यांना माल आणि वाळू कोण आणि कशी पुरवत होती त्यांची दुकान कशी चालू होती?वाळूचे ठेके तर बंद होतेना पण राज्यातून हजारो ब्रास रेती (वाळू)कशी काय निघते महसूल मंत्री थोरात साहेब?आपले तथाकथित धाडसी अधिकारी तर या मध्ये सहभागी नाहीत ना की स्थानिक आमदारच वाळूच्या ठेक्यात टक्केवारी मध्ये पार्टनर आहेत?मुंबई मध्ये lockdown madhe सुद्धा बेकायदेशीर इमारतीच्या कश्याकाय बांधल्या जातात त्या पण धारावी मध्ये त्यांना परवानगी कशी काय मिळते कोण देतो ती परवानगी?हे "आव्हाड" हे सगळं
यातील काहीतरी आपल्या कानी किंवा पचनी पडतकाय मुख्यमंत्री साहेब की अजून 10-12 फेसबुक live तुम्ही घेणार आहात?80%रुग्ण मुंबई आणि परिसरात होते ते गावाकडे जिल्हाबंदी असताना सुद्धा कसकाय गेले?त्यांनी सीमा कशीकाय ओलांडली?
काही गुप्त मार्ग तर नसेना ना ?हो गुप्त मार्ग च आहे पण त्यासाठी तुमच्या जवळ पाचशे ते 10 हजार रुपये हवेत ते का तुम्ही एकदा सीमेजवळ उभे असणाऱ्या पोलिसाला दिले की तुम्ही तुमच्या गावी आहे का नाही गुप्त मार्ग?सर्वात जास्त भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा जर कुठे झाला असेल तर तो जिल्हाबंदी या तथाकथित उपायावर.हो हे खरं आहे जिल्हाबंदी ही लावली तेव्हाही फोलच होती आणि आजही आहे कारण अगदी मिळेल ते पैसे घेऊन आणि लोकसुद्धा देता येतील तेवढे देऊन मोठा पराक्रम करून जिल्हासीमा पार करायचे?(अपवाद वगळता)या विषयाकडे आपण कानाडोळा का केलात महोदय होत असलेला गोंधळ तुम्हाला दिसत नव्हता का ?की पूर्ण महाराष्ट्र कोरोनाग्रस्त करून अजून lockdown तर वाढत ठेवायचं नव्हतं ना?
राहुल कुलकर्णी हे पहिले पत्रकार असतील ज्यांच्या बातमीची दखल परप्रांतीय सुद्धा घेतात त्याहुन ही चांगलं वाटलं की ते मराठी बातम्या बघतात.बघा ग्रहमंत्री साहेब ते मराठी बातम्या बघतात मग तुम्ही सुद्धा मराठीतच बोलत जा ना नाही वाटायला तरी पाहिजे की महाराष्ट्राचा मंत्री आहे मन्हून.असो पण 10 हजार लोकांची गर्दी होते ती पण वेगवेगळ्या भागातून लोक येतात पोलिसांना कानोकान बातमी नाही?lockdown काय फक्त मराठी माणसासाठी होता काय ?गर्दी होऊ न देण हे तुमचं आद्यकर्तव्य होत जे की तुमच्याकडून झालं नाही.आणि ही गर्दी काय एकदा किंवा दोनदा झाली नाही महोदय फक्त मुंबईमधेच 5 ते 7 वेळेस हजारोच्या संख्येने लोक कसे काय जमतात?फक्त मुंबई मध्येच नाही तर पुणे कोल्हापूर औरंगाबाद नाशिक येथे सुद्धा हजारोंच्या संख्येने लोक जमा होत होते?जर लोक जमा होताच आहेत तर वारी किंवा तत्सम कार्यक्रम रद्द करण्यात काय तो पुरषार्थ मुख्यमंत्री आणि माननीय ग्रहमंत्री साहेब?पवार बोलले होते की tabalikkina काही बोलू नका बर पवार साहेब पण आपण "बांद्रा"येथील गर्दीबद्दल का बोलला नाहीत ग्रहमंत्री आपलेच होते ना ?की पुन्हा काही राजकीय हेतू त्यामागे नव्हता ना?
पूर्वी आपल्याकडे जिवंत माणसाचं अपहरण होत असे पण आपल्याकडे मात्र मृत शरीर सुद्धा या lockdown मध्ये विकल्या गेले किंवा चोरल्या गेले.हे खरं आहे मुंबई आणि बाकीच्या काही ठिकाणावरून चोरीला गेलेले मृतदेह नंतर परत मिळाले का त्यांचं पुढे काय झालं?माननिय आरोग्य मंत्री आणि मुंबई आयुक्त व महापौर
रक्ताचा साठा नेमका lockdown मध्येच कसाकाय संपतो?मुंबई वगळता तेव्हाची रुग्ण संख्या ही काही जास्त प्रमाणात नव्हती.मग संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तूटवडा कसा काय जाणवू लागला?आणि मुंबईमध्ये चालणारी बेकायदेशीर देहविक्री ,अवयव तस्करी ,रक्तविक्री हे सर्व काळे धंदे या अधिकारी आणि नेत्याना अनोळही नाहीयेत.कदाचित मुंबईमध्ये तेच तर घडत नाहीयेना ?
लाख आणि कोटींची हॉस्पिटलस बिल आली तरी सुद्धा आपले मंत्री ,आमदार , भरतील सुद्धा त्यामुळेच तर त्यांना नांदेड,बीड ,मुंब्रा येथून उचलून अलगद मुंबईच्या महागड्या हॉस्पिटल मध्ये ठेवतात.पण सर्वसामान्य माणूस नाही ना भरू शकत एवढं बिल.धुळ्यात एका जेष्ठ नागरीकाचा मृतदेह 7 दिवस संडास मध्ये पडून होता कोणी सुद्धा फिरकल नाही तिकडे अगदी सफाई कर्मचारी सुद्धा नाही.
सध्या 5 लाख लोक रोज शिवभोजन खात आहेत असं मुख्यमंत्री मागे बोलून गेले खरंच 5 लाख लोक एका दिवसात जेवत असतील का ?जेवणारी लोक कोण आहेत की फक्त तो एक आकडा आहे ?आम्ही कधी जमिनीवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतच नाही तिथेच नागरिक चुकतात.
राशन वाटपामध्ये घोळ होत आहे त्याच वितरण अनियमित आणि बेकायदेशीर पणे होत आहे गरजून पर्यंत ते कधी पूर्ण  पोहचत तर कधी अर्धवट.मागे हा सगळा घोळ कसा होतो हे सगळं एका विडिओ मधून समोर आलं होत आणि काही दुकानदारांवर कार्यवाही सुद्धा झाली होती पण तो सगळा काळाबाजार पूर्णपणे थांबलाय का?lockdown असताना सुद्धा बेकायदेशीर पणे धण्याची ने आन करण्यासाठी ट्रक कुठून येतात आणि कुठे जातात "भुजबळ"साहेब.रॉकेल आणि साखर फक्त नावालाच गोदाम मध्ये आहे का भुजबळ साहेब?
आता शेवटचं या वर्षांमध्ये बियाणं निकृष्ट आणि खराब दर्जाचे आल्यामुळे बहुतांश शेतकरी दुबार पेरणी करून बसले आहेत आता पुढे जे काही होईल ते पण बियाणं बनण्याची जी प्रक्रिया आहे तेव्हा आपली यंत्रणा कुठे होती "भुसे"साहेब बियाणं खराब आहे हे उगवून आल्यावर का कळलं ?त्या आधी त्याची तपासणी ,तपशील आणि प्रात्यक्षिक तुम्ही किंवा तुमच्या अधिकाऱ्यांनी घेतले होते का ?की शेतकरी मेल्यावरच त्याच्या चिंतेत मदत निधी फेकायचा "भुसे साहेब"
घटना ,प्रसंग खूप आहेत पण पूर्ण मांडणी येथे शक्य नाही त्यामुळे मी काही आवश्यक उदाहरणं वर दिली.
त्याचा उद्देश असा की पावसाळ्यात पावसात भिजल्याच्या नंतर मलविसर्जन किंवा मूत्रविसर्जन केल्याच्या नंतर जसं ते त्यात सामावून जातं त्याच प्रकारे शासन आणि प्रशासन आपल्या सगळ्या चुका ,गुन्हे ,भ्रस्टाचार आणि अनैतिक कामे lockdown च्या आड लपवू पाहत आहे आपले धूर्त आणि कपटी राजकारण करू पाहत आहे. या दोन्हीही व्ययस्था आपल्याला "व्यथा"बनू नये मन्हजे झालं.
द्यानेश्वर मोरे.
9623480172

5 comments:

  1. अतिशय पोटतिडकीने तू व्यक्त झाला आहेस मित्रा ..असाच व्यक्त होत रहा.

    ReplyDelete
  2. Very critical blog
    Think all people

    ReplyDelete

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...