(हा स्पेसिअल विषय घेऊन पुन्हा एकदा लिहिणार आहे )
जशी तुम्ही कुटुंबव्यवस्था नाकारू शकत नाही तसच काहीतरी काँग्रेस या पक्षाचं सुद्धा आहे. काँग्रेस हा पक्ष होता तो 1947 च्या आधी त्यानंतर ती एक व्यवस्था झाली. सर्व लाभार्थ्यांची एक हक्काची जागा झाली, नंतर एक एक क्षेत्र काँग्रेसमय होत गेलं, भारतातील लोकांना फक्त कुणीतरी शासन करणारा हवा असतो राज्यकारभार हाकणारा कुणीतरी हवा असतो "सक्रिय गुलामगिरीची "जाणीव होऊ नये यासाठी. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा हेतू जरी व्यापक असला तरी भारतीयांची गुलामगिरीची सवय त्यापेक्षाही "मूलगामी "होती. उगाच एखादा पक्ष देशावर 70 वर्ष अभाधित राज्य करत नाही त्यामागे इतिहास आणि इतिहासातील लोकांच्या मानसिकतेची जडणघडण महत्वाची असते.
काँग्रेस ची स्तिथी या निवडणुकीच्या निकालात जरी जैसे थे अशी असली तरी काँग्रेस संपली अस म्हणणाऱ्यांनी एकदा एखांदी स्पर्धा परीक्षा बिना नेहरू आणि गांधींचा अभ्यास न करता पास करून दाखवावी ?भारताचा 5 हजार वर्षाचा हिंदू धर्माचा इतिहास अधिकृतपणे पाठयपुस्तकात शिकवला गेला तेव्हा आपण म्हणू शकतो काँग्रेस डळमळलीये.
काँग्रेस ची विचारधारा ही ते भांडवल आहे जे स्वस्तात आणि सहज उपलब्ध आहे, तो पर्यायी प्रश्नांमधील सगळ्यांना पास करेल असा प्रश्न म्हणजे काँग्रेस ची विचारधारा आहे. कोणत्याही कार्यशाळा न भरवता विचारधारेचे bumbarding न करता काँग्रेस पक्ष तग धरू कसा शकतो ? काँग्रेस ची विचारधारा ही गरिबी,दारिद्री आणि कामिशिक्षीत लोकांच्या विचारांशी मिळती जुळती आहे, ज्यांच्यासाठी अन्न आणि कुटुंब महत्वाच आहे देश हा दुय्यम आहे आणि देशप्रेम तेच आहे जे पाठयपुस्तकातून शिकवल्या जात.
आज जरी देशप्रेमाची व्याख्या बदलली असली तरी वरील कुटुंबांना देशप्रेमाची व्याख्या काँग्रेस नेच घालून दिलेली आहे ती एका अधिकृत सरकार च्या रूपात.
कधी विचार केलाय का की 565(69)छोटे देशासारखे संस्थान कशाच्या आधारे भारतात आणल्या गेले?आणि मुख्य म्हणजे एकत्रित टिकले कसे ? त्याच मुख्य कारण आहे काँग्रेस पक्षाची आणि तत्कालीन सरकारची एक विचारसरणी असणं.
सांस्कृतिक विचारसरणीवर चालणाऱ्या पक्षांच्या काही मर्यादा असतात अगदी पेट्रोल आणि डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांसारख्या त्यांचं आयुष्य हे पैसे आणि इंधनावर असत या उलट सायकल जर बुरशी येऊन जरी पडलेली असेल तरी तिला नीट करायला पैसा कमी लागतो आणि इंधनाचीही गरज पडत नाही.
कदाचित हीच काँग्रेस ची स्ट्रेंथ असावी ज्यामुळे काँग्रेस मुळापासून संपवता येत नाही.(यावर पुन्हा सविस्तर लिहणार आहे )
No comments:
Post a Comment