बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ध्रुवतारा जो आजही आपल्या विचाराने शिवसेनेला आणि शिवसैनिकीला प्रेरणा देत आहेत..आज आपण शिवसेनेच्या राजकीय उदयावर बोलू, राज्यात शिवसेना कशी सत्तेवर आली ,राज्यव्यापी पक्ष कसा झाला हे जाणून घेऊया..1966 साली मराठीच्या मुद्दयावर शिवसेनेची स्थापना झाली, लोकांचा चांगला पाठिंबा शिवसेनेला मिळत होता,मराठी माणूस या मुद्द्यावर शिवसेनेचे काही प्रतिनिधी निवडून सुद्धा येऊ लागले आणी एक स्थानिक पक्ष म्हणून शिवसेना चांगलाच जम बसवू लागली आणी लोक सुद्धा स्वीकारू लागले,पण पाहिजे असे यश आणी प्रसिद्धी शिवसेना 1990 पर्यंत मिळवू शकली नव्हती.कारण मराठीचा मुद्दा राज्यव्यापी होत नव्हता मुंबई पुणे नाशिक इथपर्यंत शिवसेनेचे अस्तित्व दिसत होते, तसेच काही शिवसैनिक जे जोमाने आणि अत्यंत प्रामाणिकपणे शिवसेनेसाठी काम करत होते ते शिवसेना ग्रामीण भागात पोहोचवत होते आज जेष्ठ असलेल्या बऱ्याच नेत्यांचा त्यात सहभाग होता. ,
1070 साली कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा पहिला आमदार झाला त्यांच नाव होत आनंद महाडिक,कृष्णा देसाई यांच्या हत्येनंतर बाळासाहेब आणि शिवसेनेवर मोठे गंभीर आरोप झाले होते.
1968 साली मुंबई पालिकेत प्रवेश मिळाला असला तरी सेनेचे पहिले महापौर खुर्चीत बसायला 1971 साल उजाडलं. दादरचे डॉ. हेमचंद्र गुप्ते शिवसेनेचे पहिले महापौर झाले. 1972 साली प्रमोद नवलकर विधानसभेत गेले. तर त्याच्या पुढच्या वर्षी सतीश प्रधान ठाण्याचे महापौर झाले.त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी एका मोठ्या राष्ट्रीय मुद्द्याला हात घातला तो म्हणजे आणीबाणीचा,सगळ्यांना थक्क करत शिवसेनेने 1975 साली आणीबाणीला पाठिंबा जाहीर केला. पण सत्ता हस्तगत करण्यासाठी हे पुरेसं नव्हतं काहीतरी ठोस आणि भावनिक व राज्यव्यापी मुद्दा असणं गरजेचं होतं आणि ते शिवसेनेला 1985 च्या नंतर मिळालं.गिरणी कामगारांचा संप आणि राममंदिर आंदोलन व बाबरी मस्जिद पडल्यानंतर शिवसेनेने घेतलेली भूमिका या दोन गोष्टी शिवसेनेच्या राजकीय उदयासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत.(13)पण डिसेंबर 1992 मध्ये जे झालं त्याने बऱ्याच जणांचं राजकीय नामकरण आणी पुनर्वसन केलं त्यामध्ये ,मराठी माणसाचा पाठीराखा ते हिंदू हृदय सम्राट हा प्रवास बाळासाहेब यांनी फक्त दोन वर्षात केला (1992-1993)बाबरी मस्जिद प्रकरण आणी त्यानंतर उसळलेल्या दंगली बाळासाहेब यांना राष्ट्रीय ओळख देऊन गेल्या ,कुठे एक स्थानिक पक्ष जो मराठी माणसाच्या हक्कासाठी लढतो किंवा लढला तो आता हिंदूंसाठी लढणार होता.1995 च्या निवडणुकीत शिवसेनेला त्यांनी घेतलेल्या भूमिकेचा फायदा झाला शिवसेना सत्तेवर आली, पण तो प्रभाव कायमस्वरूपी टिकला नाही (1993 मुंबई दंगे )कारण आजपर्यंत शिवसेना एकदाही एकहाती सत्ताआणू शकलेली नाहीये,पण एक बिनधास्त आणी धाडसी हिंदू नेता म्हणून बाळासाहेब ठाकरे यांची ओळख पूर्ण देशात झाली. दुसरा मुद्दा हा गिरणी कंगरसंदर्भातला आहे,2 ते 3 लाख गिरणी कामगार मुंबईत होते दत्ता सामंत हे मोठे कामगार नेते होते, त्यांचा प्रचंड प्रभाव मुंबईतील कामगारांवर होता,सगळ्यात लांबलेला आणि पुढे ठोस असा निष्कर्ष न निघलेल्या संपाच ते नेतृत्व करत होते,1985 नंतर मुंबई मध्ये डावे पक्ष आणि नेते हतबल होत चालले होते, त्यांचा आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव कमी होत चालला होता, पुढे संप इतका ताणला की तो कायमचाच तुटला आणि कामगारांमध्ये प्रचंड नैराश्य आलं आणि त्याचा फायदा शिवसेनेला झाला. त्या काळात हा निराश झालेला कामगार जो होता तो शिवसेनेच्या जवळ गेला. शिवसेनेनं त्याचा जो न्यूनगंड जो होता, तो अहंगडात परावर्तित केला.मराठी माणसाच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक होतीच, पण याच काळात बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्चाचा मुद्दा उचलताच अनेक जण सेनेकडे आले. बहुसंख्य गिरणी कामगार हे मराठी होते. त्यातही कोकणी होते. जरी शिवसेनेनं संपाच्या काळात विरोधी भूमिका घेतली होती तरीही नंतर मराठी आणि हिंदुत्व या दोन्ही मुद्द्यावर कामगार आणि त्यांच्या पुढच्या पिढ्या सेनेकडे आकर्षित झालेल्या पहायला मिळतात. त्यानं मुंबईवरचं सेनेचं वर्चस्व प्रस्थापित केलं.इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर राममंदिरासारखे मुद्दे देशभरात मोठे होऊ लागले. बाळासाहेब ठाकरेंनी जहाल हिंदुत्वाची भूमिका घेतली. त्याला हिंदू-मुस्लिम असा रंग चढत गेला. त्यातून त्यांचा जनाधार वाढत गेला. संपाच्या काळात नैराश्यानं झपाटलेलं मराठी जनमानस त्यांनी एकत्र केलं होतं..शिवसेनेचा हा म्हणजे 0 तुन विश्वनिर्मितीचाच म्हणावा लागेल.. आज शिवसेनाच मुख्यमंत्री राज्यात आहे, आणि मताच्या राजकारणात आज शिवसेना यशस्वी आहे...
छान लिहिला आहे 👌
ReplyDeleteधन्यवाद..
ReplyDelete