Thursday, March 10, 2022

शिवसेना आत्मघाताकडे जात आहे का?

प्रत्येक पक्षाची एक वेगळी ओळख असते..शिवसेनेची ही होती, मराठी माणसाची आणि नंतर हिंदुत्वाची पण आता कोणती विशेष ओळख त्या पक्षाची तुम्हाला देता येईल.. राजकारण हा आकड्यांचा आणि धारणांचा खेळ असतो.. शिवसेनेने आधी वैचारिक दिवाळखोरी तर केलीच आहे.. कोणताही दूरगामी विचार न करता, पण आता जर भाजप सोबत जाण्याचा विचार पुन्हा जर शिवसेनेने केला तर तो एक कलंक शिवसेनेवर आयुष्यभर राहील.. राष्ट्रवादी हा पक्ष राज्यात तुकड्यात विखुरलेला आहे, नेत्यांना जहागिर्या वाटून दिल्या आहेत, वैचारिक आणि राज्य स्थरावर एकतेचा अभाव पक्षात दिसत होता, पण तो आता राष्ट्रवादी मध्ये येत आहे कारण मुंबई आणि महाराष्ट्र द्रोहाच नवं शस्त्र त्यांना सापडलं आहे, आणि त्याला पाठिंबा देणारा हा शिवसेनेचा पारंपरिक मतदार सुद्धा आहे.
राज्यात एकहाती सत्ता आणण्याची ताकत ठेवणारा शिवसेना हा एकमेव पक्ष महाराष्ट्रात होता.. पण नजीकच्या फायद्याच्या नादात त्या पक्षाने लांबच्या पल्ल्याच्या विचार केलेला दिसत नाही.. आता या तर इतर राज्यात पण ते निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहेत.. पण आधी राज्यात लक्ष देणे गरजेचे आहे..कारण दोन दिवस आलेले पाहुणे घर लुटून घेऊन जाण्याच्या मार्गावर आहेत.. राजकीय आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून शिवसेनेला अति मवाळ आणि पूर्ण धारनिरपेक्ष होणे परवडणारे नाहीये(नवाब मलिक)आणि त्यातली त्यात भाजप सारखा कर्मठ आणि हट्टी स्वभावाचा विरोधी पक्ष(नेता)असताना..

No comments:

Post a Comment

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...