https://youtu.be/EY2m8z8O5Bg (link of my youtube channel..नक्की बघा.. वेगवेगळ्या राजकीय मी घडामोडींवर विडिओ बनवत असतो).
विचारसरणीशी आणि प्रादेशिक अस्मितेशी प्रामाणिक असलेल्या नेत्यांच्या आज एकहाती सत्ता आहेत, राज्यात भाषा आणि विकासाची वृद्धी होत आहे.दुर्दवाने महाराष्ट्र झाल्याच्या 62 वर्षांनंतर आज कुठे मराठी भवन उभं राहतं आहे.(2april)अस का?शिवसेनेची सत्ता तर 1995 ला आली होती,एवढंच नाही तर महानगरपालिकेत तर गेल्या कित्येक दिवसापासून त्यांची सत्ता होती मग तरीही मराठी आणि मराठी माणूस उपेक्षित का?तामिळ अस्मितेचा मुद्दा असो की वेगळ्या तेलंगणाचा आज aidmk aani trs हे राज्यातील सत्ता खेचणारे पक्ष आहेत, का? वैचारिक
io नैतिकता आणि तटस्थता..निदान आपला मूळ वैचारिक गाभा आणि जनतेची तळमळ या नेत्यांनी सोडली नाही(उदाहरण)या नेत्यांनीही देशपातळीवर राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण ,झेंडा भल्या कामाचा सोडला नाही, दक्षिणेतील लोकांना आणि उत्तर भारतातील लोकांना हाकलून देने हा कधीच योग्य आणि दूरगामी पर्याय असू शकत नाही.. आणि बाळासाहेबांनी(शिवसेनेने)तेच केलं, उद्याचा विचार न करता तात्पुरते यश बघितले.. भावनिक लाटेवर स्वार होऊन दूरगामी विचार न करता 1966-70 च्या दरम्यान दक्षिणेतील लोकांविरोधात मोहीम उघडली.. बर मान्य केलं ती तत्कालीन गरज होती म्हणून तस केलं..आज मुंबईत उडप्याचे गाडे कोणाचे आहेत?किती मराठी लोक तिथे धंदा करतात?या प्रश्नांची उत्तरे आज कोण देणार आहे.
जर परिस्थितीच बदलली नाही तर नक्कीच तेव्हा घेतलेल्या भूमिका या तकलादू आणि भावनिक होत्या.. मराठी माणसाचे अज्ञान आणि तत्कालीन गरज म्हणून लोकांनी शिवसेनेची ती भूमिका स्वीकारली..बाळासाहेबांचा उल्लेख वारंवार येतोय कारण 80 पर्यंत
सेना म्हणजेच बाळासाहेब होते.संघटन कौशल्य असणाऱ्या व्यक्तीच्या कमतरता सहज झाकून जातात, कारण लोक युक्तिवाद करणं टाळतात आणि बाळासाहेब यांचे संघटन कौशल्य तर अफाट होते.. ते सगळ्या नेत्यांनी त्यांच्याकडून शिकले पाहिजे. मराठी माणसाचा मुद्दा उचलून शिवसेनेने भावनिक आणि संवेदनशील मुद्याला हात घातला होता, अडगळीत पडलेला आणि हिनावलेला मुद्दा शिवसेनेने किंबहुना बाळासाहेबांनी जनतेसमोर आणून एका नव्या राजकीय अध्यायाला सुरुवात केली होती.. मुळात तो मुद्दा चर्चेला आणण गरजेच होत आणि सेनेन केल याबद्दल एक मराठी माणूस म्हणून कायमच ऋणी राहील.पण नंतर शिवसेनेला आपला राजकीय कंगोरा अंग सापडत नव्हते म्हणजे डावे, उजवे की काँग्रेस अश्या पेचात शिवसेना अडकली होती..आपल्या राजकीय तडजोडीला वैचारिक त्याग किंवा गरज संबोधने म्हणजे ,भिकाऱ्याने उद्योगासाठी कर्ज काढण्यासारखे आहे, आणि हे आपल्याकडे नेहमीच होत आले आहे..आज जे लोक म्हणतात की शिवसेना काँग्रेस सोबत गेली नसती वैगेरे-वैगेरे (जर बाळासाहेब असते तर)पण तीच शिवसेना सुरुवातीला काँग्रेस च्या मदतीला धावली होती.. शिवसेनेला सुरुवातीच्या दिवसात 'वसंत' सेना ही म्हंटल्या जात असे.
The good thing about your blog that you maintain that balance B/w inclination towards to any idealogy and yours keep writing
ReplyDeleteThanks sanket..
ReplyDelete