अट्टहास नेमका चाललाय कुणासाठी? निसर्ग तुमची गरज पूर्ण करू शकतो हाव नाही या वाक्याचा प्रत्यय नेहमी चित्रपट बघताना येत असतो, मुख्य पात्राच्या चेहऱ्यावर कमालीची अध्यात्मिक शांतता असते, जणू काही मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरीमोठं राज्य उभे करून त्याचा राज्यकारभार तो वृद्ध व्यक्ती करत असावा इतके आतून आणि बाहेरून स्थिरभाव त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर असतात.. जर कर्मवादी बनून आयुष्यात स्थिरता आणि समाधान मिळत असेल तर यशस्वी होण्याचे काही मंत्र जाणून घेण्याची गरज आहे का? कदाचित यशस्वी होणे ही झुंडीची मानसिकता झाली आहे की काय असे वाटत आहे, सामाजिक दडपण, बदलते जग, ढासळती नैतिकता माणसाला अधिक वेगवान आणि निष्ठुर करत आहे.. जी लोक ह्या सगळ्यांपासून लांब आहेत ती स्वतःजवळ
आहेत, आपण आणि आपले अस्तित्व ते बहुदा आपल्यापेक्षा चांगलं जाणत असावेत.. रस्त्यात अपघातात पडलेल्या लोकांना आपण उचलण्याचे कष्ट घेत नाही.. पण चित्रपटातील पात्र मात्र मेलेल्या मोरांचा अंत्यसंस्कार करून चुकीच्या आरोपात जेलमध्ये जाते.. त्याला हे माहीतच नसते की हल्ली प्राण्यांना आणि लोकांना मदत करण्याची पण क्षिशा भेटते.. जेव्हा जज त्या व्यक्तीला विचारतात की तुम्ही मोरांना मारले का? ते म्हणतात ,मोर आमच्या दैवताचे वाहन आहेत(मुरुगण)आम्ही त्यांची पूजा करतो अन त्यांना हानी कशी पोहचवू? हा निर्दोष सुटण्याचा पुरावा जरी नसला, पण माणूस असल्याचा पुरावा नक्कीच आजच्या जगात आहे..विजयने या चित्रपटात एका वेडसर माणसाची भूमिका साकारली आहे.. जो सतत देवाचा दाखला देत असतो.. त्याच्या भूमिकेचे आकलन मला करता आले नाही.. तुम्हाला करता आले तर नक्की करा.. आणि हा चित्रपट नक्की बघा..
No comments:
Post a Comment