Tuesday, May 24, 2022

राजे तुम्ही चुकताय..

लहान तोंडी मोठा घास घेऊन बोलायचं धारिष्ट्य करतोय.. यात मी फक्त माझ्या वयक्तिक भावना मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.. यात मी कोणतेही तर्क किंवा समीकरणं जुळवण्याचा प्रयत्न केलेला नाही.. राजे तुमचं वजन किंवा उपद्रव्यमूल्य हे निवडणुकीत नाहींचये.. तुम्ही याआधीही प्रयत्न केलात तेथेही फसलात हरकत नाही.. मराठा मोर्चात प्रयत्न केला तेथेही फसलात हरकत नाही.. पण आता चक्क तुम्ही पदाची मागणी करताय? तुम्ही कोण
 आहात? तुमच्या नावाच्या आधी राजे लागतं ही राज्यसभेपेक्षा मोठी पत आहे, आणि ती जर एकदा गमावली तर सर्वस्व गमावून बसाल.. सर्व राजकीय पक्ष आणि लोक आता चतुर झाले आहेत, जातीय आणि सामुदायिक एकता फोफायतीये आणि त्यातून वंशज या प्रजातीचे महत्व संपत आहे.. लोक ना आंबेडकरांच्या वंशजाला गाह्य धरतात ना शाहूंच्या वंशाजाला गाह्य धरतात.. आज कित्येक इतिहासातील मोठ्या लोकांचे वंशज नोकरी करून पोट पोसतात.. हे सत्य आहे राजे.. भावनिक दिलासा आणि मतरुपी दिलासा यात फरक आहे.. शिवसेना असो की धूर्त भाजप कावेबाज राष्ट्रवादी आणि दलबदलु मनसे हे गिधाड आहेत, यांच भक्ष होऊ नका राजे.. जिथे फायदा तिथे वायदा याच तत्वावर या लोकांनी राज्यसभेवर उमेदवार पाठवले आहेत, त्यामुळे ते तुम्हाला का पाठवतील? आम्हाला तुमच्याशी किंवा तुमच्या इतर वंशजांशी कर्तव्य नाही, पण आमचा जाणता राजा आमचे छत्रपती आमच्यासाठी जीव आहेत, मनाच्या आणि बुद्धीच्या कोपऱ्यात ते आजही वावरतात निदान त्यांच्यासाठी तरी आपण आपला स्वाभिमान जपावा कारण आपल्या आणि आपल्या इतर भावांच्या वागणुकीतून वेळोवेळी महाराजांना अपमानित  व्हावं लागत आहे.. तुम्हाला महाराष्ट्र नक्कीच स्वीकारेल राजे.. आजमावून तर पहा.. सवंगडी तर गोळा करा, आधी महाराष्ट्र हिंडा तरी.. काही वर्ष सक्रिय राजकारणात द्या राजे.. प्रकाश आंबेडकरांनी केलेली चूक करू नका राजे..

No comments:

Post a Comment

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...