Wednesday, May 11, 2022

अवतारच्या निमित्ताने..अवतार philosophy..

अवतार म्हंटल की बऱ्याच जणांना लगेच आपल्या हुशारकीची जाणीव होते, आणि दुसऱ्याच्या अंधश्रद्धेची.. असो 2009 साली आलेला अवतार नावाचा सिनेमा खूप गाजला अगदी हजारो कोटींची कमाई चित्रपटाने केली.. आता याच वर्षात त्याचा दुसरा भाग येत आहे.. अवतार 2. सिनेमा तांत्रिक दृष्ट्या तर उत्तम होताच पण चित्रपटाचा आशय आणि विषय हा तंत्रज्ञानाच्या पलीकडे होता, हे मात्र नक्की.. अवतार ही संकल्पना आपल्याकडे इतकी धार्मिक आणि कुचंबीत करून टाकली की त्याला कर्मकांड आणि अंधश्रद्धेचं रूप देऊन टाकलं.. मला समजत नाही मारवल आणि डीसी यांचे चित्रपट पाहणारे लोक कल्पनाविश्वात रमतात, अगदी तत्वज्ञान आणि इतर वैचारिक चर्चा त्यावर करतात, पण मग अवतार सिनेमा च्या तत्वज्ञानावर कोणी बोलत नाही.. कारण भारतीय संस्कृतीची पार्श्वभूमी ज्या गोष्टीला असते ती आपल्यासाठी संकुचित आणि कालबाह्य ठरत असते.. चित्रपटाचे नावच हे नवनिर्मितीचा संदेश देते, अवतार म्हणजे तारणहार समाजाला वाचवणारा हिरो असा त्याचा आजच्या काळात अर्थ घेतला तरी चालेल..गीतेच्या ओळींमध्ये अवतार या शब्दाचा उल्लेख सापडतो धर्मस्थापणेच्या निमित्ताने मी पुन्हा पुन्हा अवतार घेईल आणि धर्माची स्थापना करेल.. अवतार सिनेमाचे कथानकही त्याच अंगाने पुढे सरकते..माणसाच्या महत्वाकांक्षा या अतिशय राक्षसी आणि क्रूर बनत चालल्या आहेत, आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो, हत्या करणे आणि ताकतिच्या जोरावर साधनसमत्तीची लूट करणे हे भयानक आणि क्रूर वास्तव आपल्याला अवतार मध्ये दिसते.. दुसऱ्या बाजूला एक असं जग आहे जेथे मानवी संवेदना या शुद्ध आहेत, हिंसेचा विचारही त्या लोकांच्या मनाला शिवत नाही.. पण दुसऱ्या जगात वावरणारी माणूस नावाची जमात आपल्या फायद्यासाठी त्यांचं जग उद्धवस्त करू पाहत आहे.. हे जरी दोन वेगळे जग दाखवले असले तरी यातून समाजाचे दोन भाग, तसेच माणसाचे दोन पद्धतीचे विचार नैतिकता आणि क्रूरता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो.. आणि आपल्यासमोर एक प्रश्न ठेऊन जातो की नेमकी विकासाची व्याख्या काय आहे? आज आपण चंद्रावर आणि मंगळावर घर शोधत आहोत, ठीक आहे आपण आपले कल्पना विस्तार करत आहोत पण हे निसर्गाच्या नियमाला धरून आहे का? महत्वकांक्षा आणि लालूच या दोन गोष्टीत फरक आहे.. आणि नेमकं तेच अवतारमध्ये आपल्याला दिसत.. सिनेमा अप्रत्यक्षपणे राजकीय आणि
 सामाजिक भाष्य करतो आणि त्यासाठी निसर्गाचा आणि अध्यात्माचा उपयोग करतो..कृष्णाचा मूळ कलर हा धर्मग्रंथात निळा दाखवलेला आहे आणि यातील दुसऱ्या जगात राहणारे लोकसुद्धा (pandora) निळे असतात.. म्हणजे त्याच्यामागे कदाचित तेथे राहणारे लोक हे देववृत्तीचे आहेत असा प्रयत्न कदाचित दिग्दर्शक करत असावेत.. अवतार सिनेमा हा फक्त आपण तांत्रिक दृष्ट्या किती पुढं गेलो आहोत एवढंच सांगण्यासाठी मुळीच नाहीये, तर आपण पुढे जाण्याच्या नादात उद्याच्या पिढीसाठी काय
 ठवून जात आहोत.. आज निदान आपण विचार तरी करू शकतो पण उद्या कदाचित आपल्याला विचार करायचं सुद्धा काम पडणार नाही.. मानव जात म्हणून आपण क्रूर आणि भकास तर होतंच आहोत पण एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून विचार करणे ,निर्णय घेणे, बोलणे या गोष्टी ज्या आपलं अस्तित्व दाखवत असतात त्या तरी शाबूत राहतील का? 

No comments:

Post a Comment

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...