काँग्रेस पक्षाला नवीन अध्यक्ष मिळणे, भारत जोडो यात्रा, राजस्थानमधील काँग्रेसचे नवसंकल्प चिंतन शिबीर या तिन्हही गोष्टी साधारण जून 2022 ते जानेवारी 2023 च्या आहेत. या सोबतच काँग्रेस नेते जयराम रमेश यांची काँग्रेस पक्षाच्या माध्यमं आणि जनसंवाद (media and communication ) प्रभारी पदी निवड होणं ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट होती. ती सुद्धा जून 16-17 ला झाली. या काही तत्कालीन महत्वाच्या घडामोडी ज्या काँग्रेससाठी अत्यंत महत्वाच्या होत्या. काँग्रेस, राहुल गांधींच्या प्रतिमा उजळन्याला फक्त एवढ्याच गोष्टी पुरेश्या नाहीत पण अलीकडच्या काळातील काही महत्वाच्या नोंदी तुमच्यासमोर मांडल्या.
राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी हे दोनही नेते 'मेहनती' या प्रवर्गात मोडतात, मोठ्या किंवा प्रसिध्द माणसाचे अनेक पैलू असतात तसे या दोनही नेत्यांचे आहेत, कदाचित त्यांच्या काही विशेष गुणांमुळे ते आज देशातील दोन महत्वाचे नेते ठरले असतील हे आपल्याला मान्यच करावं लागेल. हे दोनही नेते एकमेकांना गांभीर्याने घेतात हे मात्र नक्की आहे. राहुल गांधी ते मान्य करतात आणि मोदी ते खाजगीत मान्य करत असतील कदाचित. समाज आणि समूह वाढले पाहिजे, टिकले पाहिजे तसेच इतिहासातील कडू-गोड घटना या वर्तमानासाठी आरसा असतात असा विचार नरेंद्र मोदी करतात किंवा करत असावेत. दुसऱ्या बाजूला प्रत्येक व्यक्ती हा महत्वाचा आहे, सामाजिक न्याय, गरिबांना पायाभूत विकास नाही तर दोन वेळच अन्न आणि मुख्य प्रवाहात महत्वाची जागा ही राहुल गांधी यांची विचारसरणी आहे.
प्रसंगी हे दोनही नेते जवळच्या लोकांनुसार आपल्या मतात आणि निर्णयात बदल करतात. तुम्ही मोदी किंवा राहुल गांधी यांच्या तोंडातून कधीच त्यांच्या खाजगी किंवा वयक्तिक आयुष्याबद्दल ऐकलं नसेल कदाचित तुम्ही ते ऐकणारही नाही. काही खास मित्र आणि सहकारी वगळता हे नेते कधी कुणाजवळ व्यक्त झाले असतील का? हा महत्वाचा प्रश्न आहे. मोदींचे युवापण हे वाचन आणि सामाजिक-धार्मिक भेदभाव आणि संघर्ष पाहण्यात गेलं, काश्मीर, शीख दंगे, गुजरात दंगे, बंगाल, केरळ मध्ये संघाच्या कार्यकर्त्यांचा छळ, 1993 मुंबई बॉम्ब ब्लास्ट, समाजातील उच्च आणि कनिष्ठ समाजातील भेदभाव, पुर्वोत्तर भारत आणि दिल्लीमधील अंतर अशा अनेक गोष्टींचा प्रभाव मोदींच्या आयुष्यावर पडलेला आहे, त्यामुळे त्यांचे मूळ विचार आणि राजकीय विचार हे एकमेकांशी जुळतात, एक संवेदनशील माणूस पण कट्टर धार्मिक नेता अशी मोदींची स्वभाव ठेवण आहे.
गेल्या 12-13 वर्षात घरात पाळलेल्या कुर्त्याला (श्वानाला )जशा गरजेच्या वस्तू देऊन त्याला दत्तक घेतल्या जातं किंवा गुलाम बनवल्या जातं तसंच मोदींनी भारतातील काही नामांकित समादकांसोबत केलं, विचार, आणि पेशा माणूस सगळं गहाण टाकू शकतो ते या गोष्टीतून सिद्ध झालं. मोदींना यातून फक्त काही राजकीय हीत साधायचं होत असं मुळीच नाही, 2014-2019 च्या निवडणुकीत भाजप आणि मोदींनी सोशल मीडिया आणि मुख्य मीडिया च्या मदतीने निवडणूक जिंकली, त्यामुळे ते फक्त मुख्य मीडियावर अवलंबून नव्हते पण मी वर उल्लेख केलेल्या घटना, त्यांच्यावर गुजरात 2002 दंग्यावरून झालेले मीडिया ट्रायल हे मोदींच्या नजरेत मीडियाला एकतर्फी आणि विकाऊ यंत्रणा बनवण्यासाठी पुरेसे होते. काही ठराविक चॅनेल्सच नाही तर एकूणच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ कसा 'चोथा' झाला आहे हे जगाला आणि काही ठराविक लोकांना दाखवण्यासाठी मोदींनी अक्षरशः मीडियाला लोळवत ठेवले, आपले कामही काढून घेतले आणि आम्ही पत्रकार आहोत असं सांगायलाही लाज वाटेल अशी विपरीत परिस्थिती मोदींनी आणून ठेवली.
आज तुम्ही बऱ्याच युट्युब चॅनेलवाल्यांना बघत असाल तर ते आधीच सांगतात आम्ही पत्रकार नाही आहोत, आम्ही विकलेले किंवा स्वतंत्र युट्युबर आहोत.
2009-2010 च्या दरम्यानची गोष्ट असेल राहुल गांधी पुन्हा पंतप्रधान होणार अशा चर्चा सुरु होत्या, गांधींनी ते नाकारलं आणि पक्ष वाढवायला सुरुवात केली. नेमकी हीच ती वेळ होती जेव्हा मोदी आणि गांधी हे दोनही नेते अनाधिकृतपणे आपापल्या पक्षाचे पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित झाले होते. मोदींच्या टिकेचा रोख राहुल गांधीकडे होता तर भाजपच्या टिकेचा रोख सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांच्याकडे होता. दोनही नेत्यांना येणाऱ्या भविष्याची चाहूल लागली होती, मोदींची पक्षातील स्पर्धा ही बाकीचे जेष्ठ उमेदवार बाजूला सावरण्याची होती तर गांधींची धडपड ही टाकाऊ किंवा बेजबाबदार नेते बाजूला सारून पक्षाला उभारनी देण्याची होती. राहुल गांधींनी 2005-2007 दरम्यान पक्षाच्या एकूण कार्यपद्धतीत अनेक महत्वाचे बदल केले, सिंदिया, पायलट, रणदिप सुरजेवला, राजीव सातव अशा अनेक नेत्यांना मुख्य प्रवाहात आणत संघटना मजबूत केली, कदाचित भाजपच्या आक्रमक राजकारणाचा आणि बदलत्या प्रचार शैलीचा अंदाज राहुल गांधींना आलेला असावा. त्यांचा वाढता हस्तक्षेप आणि व्यापक धोरण हे काँग्रेसमधील काही खानदानी आणि भोगवादी नेत्यांना पसंत पडले नाही, सत्ता आहे तर ती वापरायची संघटना आणि शिस्त होत राहिलं असं धोरण त्यावेळच्या नेत्यांनी अवलंबल, दबावामुळे गांधींना माघार घ्यावी लागली सौम्य व्हाव लागलं.
2008-2009 च्या दरम्यान गांधी आपली राजेशाही ओळख पुसण्यासाठी शेतात गेले, गरिबांच्या घरी जेवले, रोजगार हमी योजनेच्या प्रचारासाठी ते शेतात राबले, हे सगळं त्यांनी आताच्या तरुण किंवा पंचांविशीत असलेल्या तरुणांच्या नकळते पणात केलं त्यामुळेच ज्या नवीन पोरांना गांधी आधी पप्पू वाटायचे तेच गांधी आता त्यांना एक धीर-गंभीर आणि क्रेडिबल नेता वाटत आहे. फक्त तरुणच नाही तर काँग्रेस-भाजपमधील अनेक नेते, इतर पक्षातील अनेक नेते आणि सर्वसामान्य जनता यांचा दृष्टिकोन सुद्धा गांधी यांच्याकडे बघण्याचा बदलला आहे. काही ते मान्य करतात तर काही ते करत नाहीत. थोडक्यात काय तर गांधी बदलले नाहीत तर आपण बदललो आपला दृष्टिकोन बदलला. हा दृष्टिकोन बदलायला मदत झाली ती काँग्रेसच्या नव्या मीडिया टीमची आणि नव्या मीडिया धोरणाची. जनसंवाद आणि जनतेशी बातचीत हा राहुल गांधींचा मूळ स्वभाव आहे, गरज होती ती एका प्रचार यंत्रनेची आणि नेमकं तेच काँग्रेसने केलं.
2000 ते 2012 हा कार्यकाळ मोदींच्या प्रतिमेवर आघात करणारा होता, काँग्रेस आणि तत्कालीन समविचाराच्या नेत्यांनी मोदींना वैचारिक दृष्ट्या अस्पृश्य केलं. कट्टर धार्मिक आणि असंवेदनशील असलेला नेता अशी प्रतिमा मोदींची पसरवण्यात तत्कालीन काँग्रेस नेत्यांना आणि मीडियाला यश आले होते. पण काँग्रेसवरचा लोकांचा राग, गांधींची घराणेशाही, आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर, गुजरात मॉडेल या गोष्टी मोदींची 'मौत का सौदागर' ही प्रतिमा धूसर करण्यात यशस्वी झाल्या.
अगदी तसंच राहुल गांधींच्या बाबतीत आहे 2012 ते 2022 हा गांधीसाठी अत्यंत निसरडा आणि पडतीचा काळ. काँग्रेसचा पक्षाला आणि विचारधारेला उतरती कळा लागली होती, संघटना नाजूक वळणावर होती आणि त्यातली त्यात 'पप्पू' हा टॅग गोचीडा सारखा चिकटला होता. 2017 साली तीन राज्याच्या विधानसभा जिंकल्यानंतर राहुल गांधींचा गयावया झाला पण तो अल्पकालीन होता कारण भाजपच्या निवडणूक यंत्रणा आणि प्रचार पद्धतीसमोर तो विजय टिकणारा नव्हता आणि टिकलाही नाही.
2019 च्या निवडणुकीत आपल्याच पक्षातील अनेक नेते माझ्या पाठीशी उभे राहिले नाही असे म्हणत राहुल गांधींनी पक्षातील एकता आणि पक्षातील जेष्ठ नेत्यांचे पक्षाबद्दलचे विचार समोर आणत अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. काँग्रेस बदलायला निघालेला व्यक्ती स्वतः बदलला, काम करण्याची पद्धत बदलली काही विदेशी सल्लागार तर देशातील काँग्रेसच्या विचाराशी साधर्म्य ठेवणाऱ्या कंपन्याशी करार केला तसेच त्यांना कायमस्वरूपी संघटनेचा भाग करून घेतले. भाजप सोबत लढायचे असेल तर त्यांच्याच पद्धतीने लढावे लागेल, काँग्रेस पक्षाला आक्रमक होऊन आपले मुद्दे रेटावे लागतील, भाजपच्या फक्त टिकेला उत्तर देऊन चालणार नाही तर आपल्या प्रश्नांवर भाजपला बोलत करावं लागेल. पक्षातील राजकीय आणि संघटनेसंदर्भातील निर्णयापासून राहुल गांधींनी 2019 नंतर बऱ्यापैकी फारकत घेतली सल्ला देण्यापूरते राहुल गांधी मर्यादित राहिले, याच निर्णयातून काँग्रेसने अनुभवी नेते खरगे यांना पक्षाध्यक्ष केले आणि घरणेशाहीचा मुद्दा काही काळासाठी का होईना बाजूला पडला.
कोरोनादरम्यान जेव्हा सगळे जग शांत होते तेव्हा काँग्रेसचा नवोदयाचा आराखडा रचण्यात येत होता, पक्षातील काही महत्वाचे नेते, ज्यांना प्रचार-प्रसार आणि नवीन तंत्रज्ञान थोडं समजत यांच्यासोबत प्रशांत किशोर जवळपास 6 महिने चर्चा करत होते. कोविड चा प्रभाव थोडा कमी झाल्यावर किशोर यांनी दिलेल्या आराखड्यावर काम करायचे ठरले. पण किशोर यांच्या राजकीय महत्वाकांक्षा काँग्रेसला झेपणाऱ्या नव्हत्या म्हणून तो विषय बारगळला. पण किशोर यांनी दिलेले सल्ले, गांधींना संघटना आणि राजकारण याच्यापलीकडे जाऊन काम करण्याची दिलली मोकळीक, आधुनिक पद्धतीने काम करणाऱ्या आणि वैचारिक खाद्य पुरावणाऱ्या पीआर कंपन्या येत्या एका वर्षात काँग्रेसला निदान जिवंत आणि लढावन्यायोग्य बनवणार होत्या.
#rahulgandhi #narendramodi #congresssocialmedia
#loksabhaelection2019
#congresscampaignstratgy
#bjpitsell
#dnayaneshmoreblogs
No comments:
Post a Comment