Monday, October 16, 2023

आंदोलनाचा 'जरांगे पॅटर्न' manoj jarange aandolan, maratha aarakshan, jalna

14 ऑक्टोबर 2023 ला झालेली सभा ही फक्त एक सभा नव्हती तर मराठ्यांनी साजरा केलेला एक सोहळा होता. आजकाल सभेसाठी किंवा कार्यक्रमासाठी प्रामाणिकपणे लोकं गोळा करणे हा एक मोठा जटील प्रश्न नेत्यांसमोर असतो. जरांगे यांच्या आंदोलनाच्या बऱ्याच गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील, बघितल्या असतील काही जनांनी तर त्या अनुभवल्या ही असतील. त्यांच्या आंदोलनाची ब्रँड व्हॅल्यू आहे त्यांची देहबोली आणि त्यातील प्रामाणिकपणा, अज्ञानात सुख आहे असं म्हणतात पण साधेपणताही सुख आणि आकर्षण आहे हे आपणं समजून घेतलं पाहिजे. मोठ्या मोठ्या प्रचार (PR ) कंपन्या नेत्यांच्या प्रतिमा आणि राजकीय विस्तार करण्यासाठी त्यांच्या कपड्यापासून ते भाषेपर्यंत सगळं बदलतात पण जरांगे यांना ते नैसर्गिक रित्या मिळालं असल्यामुळे त्यांचा साधेपणा आणि भाषा हीच त्यांच्या आंदोलनाची एक महत्वाची बाब बनली. 
जनतेच्या रोशाला फुंकर घालण्यासाठी जनतेला किंवा समाजाला एका चेहऱ्याची गरज असते, तो चेहरा जनतेला दिसला की लोकं त्या व्यक्तीला थेट पुजायला लागतात किंवा भजायला लागतात. नेमकं तेच काम जरांगे यांनी केलं, फक्त सभेला संबोधित न करता जर सतत जनतेत राहिलं तर त्याचा फायदा नेत्याला होतं असतो. उद्धव ठाकरे यांच्या सहानुभूतीची धग कमी होण्याचं मुख्य कारण हेचं आहे की त्यांच्या सहानुभूतीला संघर्षाची किनार मिळू शकली नाही.
आपणं आळशी किंवा मस्तवाल झालो आहोत असं जरांगे यांनी भासू दिलं नाही आणि महिनाभर ते सतत व्यस्त राहिले. राज्यातील बाकीच्या नेत्यानींसुद्धा आता समजून घेतलं पाहिजे की फक्त सभा घेऊन आता लोकं आपल्या बाजूने खेचता येत नाहीत, लोकांत जावं लागेल, बसावं लागेल, त्यांचं ऐकावं लागेल भलेही तुमची ईच्छा असो किंवा नसो पण तुम्हाला लोकांमध्ये फेरफटका मारल्याशिवाय पर्याय नाही.

जरांगे यांच्या आंदोलनातील तिव्रता कायम ठेवली ती TV आणि सोशल मीडियाने, जरांगे tv ला कंटेन्ट पुरवत होते तर सोशल मीडियावर मराठा बांधव आणि इतर काही समविचारी लोकांनी आंदोलनाची धग कमी होऊ दिली नाही. जेव्हा विचारात प्रामाणिकता असते, तेव्हा लोकं पैशाची अपेक्षा न करता तुम्हाला साथ देत असतात. आज मोठे नेते त्यांच्या PR (प्रतिमा ) करोडो खर्च करत असतात पण त्यामध्ये तकलादूपणा असतो प्रामाणिकता नसते पूर्ण व्यवहार असतो. मराठा आरक्षण मिळेल किंवा नाही ही गोष्ट अनिश्चित आहे पण मराठवाड्यातील जनतेला जरांगे यांच्या सभेने एक हरवलेली सामूहिक ओळख आणि स्वाभिमान बहाल केला आहे, मराठवाडा आणि त्याच नैतिक, अधिकारिक अस्तित्व मराठा आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा समोर आलं याचा मला आंनद आहे..

1 comment:

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...