हातावर मोजता येतील एवढेच नेते राज्याने स्वीकारले त्यांच्यातील माणुसपण, गुण दोष दोन्हीही गोष्टी लोकांनी स्वीकारल्या, त्यापैकीचं एक माणूस होता एकनाथ शिंदे राज्याचे माजी मुख्यमंत्री.. राज्यभर ओळख असणारे किंवा लोकप्रिय नेते महाराष्ट्रात बरेच आहेत, पण ज्यांच्या नावाने मते मिळतात, राजकारणाशी निगडित नसणाऱ्या लोकांच्या चर्चेतला एक विषय होणे, लोकांना तुमच्याबद्दल आदर तसेच आपुलकीचा भाव वाटणे हे मात्र लोकनेता किंवा जनतेचा नेता असण्याचे मोठे लक्षण आहे.. जे की आजचे तथाकथित PR आणि consultant करू पाहतात.. आपल्या मुळातच रंगाने काळा किंवा सावळा असणारा एखादा व्यक्ती, नेता गोरा करू पाहतात.. पण ते शक्य होत नाही.. त्यासाठी निदान 50-60 टक्के गोष्टी उपजत असणे अत्यंत गरजेचे असते.. असलेल्या उद्योगाचा विस्तार करणे सोपे असते पण नवीन उद्योग थाटून तो मोठा करणे हे खूप अवघड असते.. एकनाथ शिंदे यांच्या उद्योगाचे भांडवल हा त्यांच्या स्वभाव, साधेपणा, दानशूर नेता, तत्परता हे होते.. पण असलेला उद्योग न सांभाळता शिंदे कुटील, धूर्त आणि संधीसाधू राजकारण करायले गेले आणि नेमके तिथेच फसले जो की त्यांचा पिंड नव्हता तसेच त्यांच्या राजकारणाचे भांडवलही नव्हते..
आपली ताकद संघटना किंवा राजकीय समीकरणात नाही तर लोकांच्या मनात आणि आपल्या स्वभाव तसेच कार्यशैलीत आहे.. हे शिंदे किंवा त्यांच्या जवळच्या लोकांना त्यांनी hire केलेल्या consultant लोकांना नेमके कसे कळले नाही?
राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळाल्या नंतर राज्यातील जनतेच्या समिश्र होत्या तसेच जेव्हा निकाल लागले तेव्हासुधा लोकं अस्वथ वाटत होते.. एवढा अभूतपूर्व निकाल लागूनही सत्ता स्थापनेला 1-2 महिने लागतात, का? कुणामुळे? कशासाठी?.. संघटना, प्रचार, अपप्रचार, मेहनत या तुम्हाला निवडणुकी जिंकून देऊ शकतात, बहुमत देऊ शकतात, पण एकहाती सत्ता आणि लाचार विरोधीपक्ष हे समीकरण जुळवून आणणारी सत्ता आणण्याची ताकद संघटना किंवा कोणतीच यंत्रणा ठेवू शकत नाही.. त्यासाठी जादूई किंवा वलय लाभलेला नेता, जनतेने हातात घेतलेला एखादा मुद्दाच लागतो..
तळे राखायला दिलेला भाडोत्री जेव्हा तळे स्वतःच्या नावे करायला पाहतो तेव्हा मालकाला धडकी बसते.. नेमकं शिंदेच्या बाबतीतही कदाचित तेच झाले असावे, आधी शिवसेना आणि नंतर लाभलेली प्रचंड लोकप्रियता हा भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांना परवडणारा नव्हता.. राज ठाकरेंच्या मदतीने किंवा सहमतीने भाजपने सुरुवातीला शिंदेना बऱ्याच वेळेस, काही गोष्टी या तुमच्याकडे नाहीत हे दाखवन्याचा प्रयत्न केला पण शिंदेनी कोणत्याच ठाकरेंना जुमानले नाही.. ठाकरेंचा सन्मानही केला आणि राजकीय दृष्ट्या त्यांना अंगावरही घेतलं.. दुसऱ्या बाजूला भाजपने मात्र शिंदेना थोपवन्यासाठी उद्धव ठाकरे, अजित दादा अश्या नेत्यांचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष उपयोग करून शिंदेना नेहमीच एका असुरक्षिततेत ठेवलं..
निधीवाटप, मराठा आरक्षण, वैद्यकीय कक्ष, जाहिरातबाजी आणि जनसंपर्क, प्रशासनातील शिंदेचा वावर हा अत्यंत प्रभावी ठरत होता.. एक दुय्यम दर्जाचा किंवा बसवलेला मुख्यमंत्री हा फक्त मुख्यमंत्रीच नाही तर एक नेता म्हणून जनतेच्या मनात घर करत आहे ही गोष्ट अत्यंत महत्वाची आणि अनपेक्षित होती.. यामुळेच विधानसभा निवडणुकी नंतर भाजपने प्रसिद्धीसाठी हजारो कोटी रुपये खर्च करून हा विजय हिंदू मतांचे एकत्रिकरण, rss चा थेट जनसंपर्क, लाडकी बहीण, फडणवीस यांची रणनीती यांचा आहे.
पण लोकांना हे ऐकायला बरं वाटत होत पण निकाल मात्र पचत नव्हता त्याचं मुख्य कारण कदाचित शिंदे या महत्वाच्या घटकाचा निकालाचे विश्लेषण करताना न झालेला उल्लेख..
विधानसभा निकलानंतर संयमी आणि शालिन वाटणारे शिंदे आपला तोल ढासळत होते, संयम आणि विवेक समजुदारपनाचा मार्ग सोडून, प्रतिकार आणि सत्तेकडे मार्गस्थ झाले होते.. जे की शिंदेना जमने शक्यच नव्हते.. निःस्वार्थ भावनेने, तळमळीने जनतेला मदत करणारा, मागेल त्याला मागेल ती मदत करणारा मुख्यमंत्री, हा आज सत्तेसाठी रुसत आहे, कारभार सोडून गावी बसत आहे? ही शिंदेची प्रतिमा जनतेत जाणे.. त्यांच्या उतरत्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात होती.. शिंदे सरकार बाहेर राहून अधिक जोमाने किंवा कदाचित पहिल्यापेक्षा जास्त ताकदीने काम करू शकले असते मुख्य म्हणजे त्यांच्या स्वभावाला आणि कार्यपद्धतीला शोभेल असे काम त्यांनी सरकार बाहेर राहून कदाचित करून दाखवले असते.. पण तसे न होता ते सरकार मध्ये जाऊन बसले, सत्ताधीश झाले पण आपली अल्पकाळात दिलदार आणि दानशूर नेता अशी तयार झालेली प्रतिमा मात्र गमावून बसले.. जे की सत्ताधारी भाजप, राष्ट्रवादी अजित दादा गट यांनाही हवे होते आणि करोधकांनाही हवे होते..
मुख्यमंत्री फडणवीस सत्तेवर आल्यानंतर हे पूर्णपणे वेगळे फडणवीस दिसले, शांत, निवांत तसेच विरोधकांचा सन्मान आणि सहकार्याची भाषा करणारे फडणवीस राज्याला बघायला मिळाले.. याचे कारण कदाचित त्यांचा बदललेला स्वभाव आणि राजकीय गणित असुही शकतात पण पूर्वीच्या मुख्यमंत्र्याशी तुलना झाली तर आपण तिथेही कमी पडायला नको हा समज जास्त दिसतो.. सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वात आधी काही झालं असेल तर मंत्री आणि प्रशासकीय अधिकारी यांचे बहुतांश अधिकार मुख्यमंत्र्यांनी आपल्या कक्षेत घेतले जे की शिंदेच्या ताकदीचे दोन अंग होते.. नंतर जुने प्रकल्प आणि त्यांच्या आमदार, मंत्र्यांशी निगडित भ्रष्टाचाराची प्रकरण.. आधी कमी झालेली राजकीय आणि प्रशासकीय ताकद, नजरेत येणारे भ्रष्टाचाराचे आरोप, माध्यमान्नी बदललेली भूमिका शिंदेना दिवसेंदिवस एक सर्वसाधारण आणि हतबल नेता बनवत होती.. शिंदे तिकडे पक्ष वाढवत होते, नेते पदाधिकाऱ्यांचा प्रवेश पक्षात करवून घेत होते.. पण त्यांची लोकप्रियता, सकारात्मक प्रतिमा आणि जनतेचा मुख्यमंत्री हा सन्मान मात्र शेवटाकडे वाटचाल करत होता..
#cm shinde #eknathshinde #एकनाथशिंदे
No comments:
Post a Comment