व्यंधत्व असलेल्या जोडप्यांना दुसऱ्यांची लेकरं चांगली वाटतात किंवा त्यातच समाधान मानावे लागते,दुसऱ्याच्या लग्नात नाचणे असे बरेच शब्दप्रयोग काल कानावर पडले.
त्यात काही प्रमाणात तथ्य होत पण उदाहरण योग्य नव्हती, एका बाजूला तुमचं अस्तित्व संपत आहे पण तुम्ही फक्त आकसापोटी जर तुमच्या शत्रूच्या पराजयात देशाचे भवितव्य शोधत असाल तर नक्कीच तुम्हाला "नागपूरच्या "खुराकाची गरज आहे.
बंगाल ची निवडणूक जर एखाद्या ठोक अश्या सामाजिक किंवा विकासाच्या मुद्दयांवर झाली असती तर बंगालच्या long term राजकारणावर तिचा फरक पडला नसता, कारण निवडणुकीचा संदर्भ आणि निकाल दोन्हीही अल्पकाळासाठी गाह्य धरल्या गेले असते, मग त्यात भाजप जरी जिंकलं असतं तरी त्याचा परिणाम राज्याच्या सामाजिक आणि राजकीय स्तिथीवर झाला नसता, राज्याच्या प्रादेशिक अस्मितेवर झाला नसता.
पण ही निवडणूकच झाली ती धर्म आणि अस्मितेच्या नावावर आणि तिथे भाजप सरशी करताना दिसून येत.
स्पष्ट करून सांगतो, सेनेच्या 1990 च्या आधी खूप कमी जागा होत्या अगदी अल्प पण 1990 च्या नंतर हिंदुत्वाचा मुद्दा हाताशी घेऊन राज्याची प्रादेशिक अस्मिता भाजप सोबत निलाम केली आणि हिंदुत्वाचे राजकारण महाराष्ट्राचा पाया झाला, काँग्रेस चा मतदार दुसऱ्या बाजूला वळाला,महाराष्ट्रात जातीपातीचे राजकारण चालू झाले, मराठीच्या मुद्दयांवर निवडणुका होणं बंद झालं.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाया बदलला आहे हे कळायला जसे अनेक वर्ष गेले तसेच बंगाल च्या राजकारणाचा सुद्धा "खेळा" झालाय हे कळायला 10 वर्ष नक्कीच लागतील.पण दुर्दव्य हे आहे की विश्लेषक आणि पत्रकारांना हे लोकांना सांगायचं नाहीये, आपली वैचारिक कट्टरता जोपासण्याच्या नादात निवडणुकीचे सखोल अंदाज आणि पैलू हे टक्केवारीनवर अवलंबून असतात हे पण कदाचित ते विसरले आहेत, असो
एका बाजूला 55 जागा जिंकलेला पक्ष, आपल्या साठी संघर्ष प्रतीक आणि कडवी झुंझ असू शकते (पावसाची सभा ) आणि दुसऱ्याच बाजूला 75-78 जागा जिंकणे ते पण 3 जागांवरून आपल्यासाठी "खेळा "कसा असू शकतो ?
मुळाला छेद देणे कशाला म्हणतात "दलित, आदिवासी आणि बंगाली अस्मितेला धरून नसलेला आणि हिंदुत्वाकडे जाणारा हक्काचा मतदार भाजप चा तयार झालेला आहे.
जे लोक म्हणताय की प्रादेशिक अस्मितेचा विजय झाला आहे, ते साफ खोट आहे कारण जिथे 48% च मतदान ममता यांना पडलं आहे मग बाकीचे 50% बंगाली अस्मितेचा भाग नाहीत का ?अस्मितेचा विजय असता तर ममता यांना 70% तरी मत पडायला हवी होती.
तामिळनाडू मध्ये आपण म्हणू शकतो की अस्मितेवर निवडणुका झाल्या म्हणून कारण तेथे समोरचा पक्ष हा पण प्रादेशिक अस्मितेवर लढणाराच असतो पण बंगाल मध्ये तस म्हणता येणार नाही.
भाजप ने ध्रुवीकरणाचा डाव साधला आहे, बंगाल चे पीच (खेळपट्टी ) ही आता लखनऊ आणि आयोध्ये सारखी बनवली जाईल त्याची सुरुवात लवकरच कोरोना झाल्यावर होईल, आणि बंगाल मधून दर महिन्याला काहीतरी नवीन ऐकायला येइल.
आपल्या जेष्ठ वर्गमित्रांची फक्त सदिच्छा भेट घेण्यातच ममता यांचं राजकीय भवितव्य टिकून आहे, काही नवीन राजकीय जळवाजुळावं किंवा समीकरण जुळवण्याचा प्रयत्न ममता यांनी केला तर बंगालही भाजपकडे अपेक्षेपेक्षा जास्त लवकर जाईल.
Good...
ReplyDeleteThanks.
ReplyDeleteभाजप पक्षाने 3 जागेवरून 76 जागा जिंकल्या हे त्यांचे यश जरूर मात्र हे यश अपेक्षा पेक्षा कमीच...दुसरी गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजपा अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी तिकडे आपले सर्वस्व पणाला लावले. ते पण एका बाईला हटवण्यासाठी एवढे जीवाचे रान केले मात्र जेवढ्या जागा अपेक्षित होत्या तेवढ्या जागा मिळवू शकले नाही हे सत्य...
ReplyDeleteत्या लढल्या त्या जिंकल्या.
ReplyDelete2019 ford fusion hybrid titanium
ReplyDelete2019 ford fusion fusion hybrid titanium. - by Steve Stevens. the first fusion titanium bracelet fusion remmington titanium fusion cobalt vs titanium drill bits product from the i-Vitamins titanium bolts line has been produced titanium engagement rings with a mixture of