Wednesday, April 20, 2022

शरद पवार यांच्याघरावरचा हल्ला आणि काही प्रश्न..

(Blog ला follow करा) हल्ला हा शब्द इतका सहजतेणे हल्ली आपण वापरत असतो, त्यामुळे मराठी माध्यमांच्या कृपेने आणि तुमच्या स्वारस्यातून या दोन तीन वर्षात हल्ला, टोला, आणि असे काही शब्द आपल्या रोज कानावर पडत असतात.. असो.. शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला हा निषेधार्थच आहे.. यात दुमत नाही..पण एखाद्या घटनेचे परिणाम किंवा परिणाम साधण्यासाठी केलेली घटना या दोन्ही गोष्टीतून फायदा कुणाला तरी होत असतो.. नक्कीच होत असतो.. लेख लांबता लिहण्याचा विचार आहे, त्यामुळे अनेक पैलू
 मांडण्याचा प्रयत्न मी येथे करणार आहे.. मराठा मोर्चा हा स्वतंत्र होता, पण तो शेवटपर्यंत स्वतंत्र होता का? मोर्चात राजकीय शक्ती घुसल्या आहेत, अशा अनेक चर्चा तेव्हा चालू होत्या.. अगदी शरद पवार हे या मोर्चाला फंडिंग करताय अशी चर्चा चालू होती.. या 58 मराठा मोर्चातून एकही नेतृत्व उदयाला आलं नाही, अगदी एकही नाही, आरक्षण तर मिळालंच नाही, पण एक झालेला समाज एक नेता का देऊ शकला नाही? कधी तरी निवांत विचार करा की मराठा नेतृत्व जर राज्यात तयार झाले तर अनेक पक्षांना ते धोकादायक ठरणार होते.. म्हणून मोर्चा किंवा आंदोलनं हे कधीच अराजकीय नसतात हे मान्य करा.. किंवा ध्यानात ठेवा. आरक्षण मिळणार नाही किंवा मिळूच शकत नाही हे काही जाणकारांना माहीत होते, तरीही त्यांनी ,जातीनं, लक्ष घालून सांगितलं नाही की तुम्ही माघार घ्या? आता st आंदोलनाची तुलना वरील मांडलेल्या मुद्द्यांशी करा.. अगदी बऱ्याच गोष्टी सारख्या आहेत, गुणरत्न सदावर्ते तेव्हाच्या सरकारला धोकादायक होते आता या आंदोलनात ते या सरकारला
 धोकादायक आहेत.. चालू परिस्थितीत सदावर्ते यांचा फायदा भाजप उचलत होता, ते स्वाभाविक आहे..महाविकास आघाडी ही आधीच अनेक अडचणीत सापडली आहे, त्यातली त्यात सदावर्ते यांचा त्रास म्हणजे ते त्यांना अधिक जड गेलं असतं.. म्हणून तर सदावर्ते यांना राज्यात या ठिकाणावरून त्या ठिकाणावर फिरवल्या जात नाही ना? या आंदोलनातून एक दलित किंवा आजच्या भाषेत सांगायचं झालं तर बहुजन नेतृत्व समोर येणार होत, नक्कीच येणार होत, याची खात्री अनेकांना होती, कारण 1 लाखांच्या वर कर्मचारी पाच महिने त्या व्यक्तीसाठी थांबले याचा अर्थ नक्कीच सदावर्ते यांचा मोठा प्लॅन असेल.. संप टिकवणं हे काही खुळ्या माणसाचे काम नाही, किंवा दंगली घडवण्यासारखे सोपे काम ही नाही.. ते
 सदावर्ते यांना जमलं होत.. चांगलंच जमलं होत. त्यांची देहबोली आणि रगेल बोलणं तेच सांगून जातं होत की हा माणूस कोणत्यातरी तयारीत आहे, मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष.. घटनेच्या काही तांत्रिक बाजू बघितल्या तर खूप विरोधाभासी चित्र दिसतं.. पोलिसांना चार दिवस आधी माहीत होतं की हल्ला होऊ शकतो तरीसुद्धा बंदोबस्त नाही? जर पोलिसांना याची कल्पना होती की काहीतरी कट शिजत आहे, मग तरीपण पुरेशी तयारी पोलिसांनी का केली नाही? की घटना होऊ दिली, कारण या घटनेतून सहानुभूती नक्कीच मिळणार होती, आणि सदावर्ते व त्यांच्या बायकोला अटकही करता येईल, असा हेतू तर त्यामागे नव्हता ना? सदावर्ते यांनी कट रचला की नाही हे अजून सिद्ध झाले नाही.. पण आपण असं समजून जरी चाललो की त्यांनी कट रचला, पण त्यांनी रचलेल्या कटाचा फायदा घेण्यासाठी, नेते आणि पोलीच काही काळासाठी अडाणी तर नव्हते बनले ना? सदावर्ते यांना अटक केल्यानंतर त्यांच्या जुन्या गुन्यांना काढून त्यांना फिरवला जात आहे.. शेवटी तो गुन्हा आहे, पण संजय राऊत, राज ठाकरे, शरद पवार आणि कधी कधी आपले मुख्यमंत्री सुद्धा ओघात काहीतरी प्रशोभक बोलून जातात, मग त्यांच्यावर केस होत नाहीत किंवा
 त्यांच्यावर असलेल्या केसेस ना वर काढलया जात नाही असं का?सदावर्ते यांच्या बाहेर राहण्याचे नुकसान महाविकास आघाडीलाचं होणार आहे त्यामुळे तर त्यांना अनेक केसखाली आत टाकल्या जात आहे.. उदयनराजे शुद्धीत नसतात असं कित्येक वेळा राष्ट्वादी आणि शिवसेनेच्या नेत्यांनी त्यांना संबोधले आहे.. मग त्यांना अटक का होत नाही? केंद्राला सूडभावनेने वागण्याचे आरोप हे राज्यातील नेते करतात मग सदावर्ते यांच्यासोबत सध्या वेगळं काय होतंय?
St चा प्रवास पूर्ण खाजगीकरनाकडं चालू आहे आणि त्यातून कुणाचा फायदा आहे, हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही st च्या थडग्यावर काही दिवसात अनेक नेत्यांची आणि पक्षांची घर भरणारार आहेत.. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे.. हा पैलू सुद्धा आपण या केसमध्ये धान्यात ठेवायला हवा.. या प्रकरणातील शेवटची आणि महत्वाची गोष्ट जी कुणाच्याच नजरेत आली नाही ती म्हणजे माध्यमांनी शरद पवार यांच्या घरावर हल्ला किंवा आंदोलन होणार आहे हे पोलिसांना का कळवलं नाही? हल्ला झाल्याच्या नंतर जवळपास सगळ्या मराठी चॅनेल्स वर एकच हेडलाईन होती, माझ्या समाधानासाठी हा योगायोग होता, असे मी माझ्या मनाला सांगितले पण दोन दिवस तोच मुद्दा आणि सारखा सारखा टीव्हीवर तोच विषय असं का? काही चॅनल्स वर तर ज्या राष्ट्रवादी नेत्यांना कोणी ओळखत नाही, त्यांचं नाव आणि चेहरा सुद्धा लोकांना माहीत नाही अशा काही लोकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या बाईट्स मराठी चॅनेल्स नि दाखवल्या.. आणि हो अगदी पत्रकार सुद्धा नवेच होते बरं का? घटनेच्या दुसऱ्या ते तिसऱ्या दिवसापासून परिस्तितीचा फायदा किंवा गरज लक्षात घेऊन सर्व चॅनेल्सनी सदावर्ते यांच्या विरोधात बातम्या लावणं चालू केलं, मी हे माझ्या अनुभवातून सांगतोय, वाटलंच तर तुम्ही दोन तीन दिवस निरीक्षण करा, त्यांच्या वयक्तिक आयुष्याचा आणि या प्रकरणाचा काहीएक संबंध नाही, मग त्यांचं, घर, त्यांच्या गाड्या, किंवा इतर काही गोष्टींची रेपोर्टिंग कशासाठी? महाराष्ट्रात इतक्या नेत्यांवर आरोप झाले कधी त्यांच्या शेजारच्या घरात जाऊन का नाही रेपोर्टिंग केली आपल्या चेंनेल्सनी? असं का? या सर्व गोष्टी वरवर जरी योगायोग वाटत असल्या तरी यात कुणाचातरी स्वार्थ, राग, द्वेष, आणि चिंता लपलेली आहे.. आणि हो सदावर्ते यांच्या बायकोमुळेच अनिल देशमुख आतमध्ये आहेत.. आणि खरं काय आहे ते सदावर्ते बाहेर आल्यावर कळेलच.

1 comment:

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...