(Blog ला follow करा)
सूचना-राजधर्म या सदराखाली काही राजकीय आणि ऐतिहासिक लेख तुम्ही वाचू शकता.. त्यातला हा पहिला लेख)
आज शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला दुर्दैवी आहे.. राजकारण ही एक निष्ठुर गोष्ट आहे, हे तुम्ही मान्य करा मी ही करतो, तेव्हा कुठे मला लिहायला आणि तुम्हाला वाचायला काही आत्मीय दुःख किंवा आनंद होणार नाही.मुळात जे काही आपण महाराष्ट्र अस्मिता आणि आमची संस्कृती या नावाच्या खाली जे खपवतो आधी ते आपण बंद केलं पाहिजे. प्रत्येक नेता आणि पक्ष आपापल्या परीने महाराष्ट्र धर्म सांगत असतो. अश्लील बोलायचं, शिव्या द्यायच्या आणि महाराष्ट्रधर्म शिकवायचा, हे म्हणजे खुंटीला माळ टाकून रस्सा ओरपण्यासारखं आहे की o..सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून एका सामान्य माणसाला काही नेते बंगल्यावर नेऊन मारहाण करतात.. तेव्हा त्याच्या अभिव्यक्तीचा आणि तुमच्या महाराष्ट्र धर्माचा विचार बरोबर बासनात पडतो हवं तर बाजूला पडतो म्हणा.. जसा दर्जा, सामाजिक आणि आर्थिक स्थर तेवढा कायदा तुमच्या जवळ अशी स्थिती आज झाली आहे.. जेव्हा फडणवीस यांना फक्त ब्राम्हण
असल्यामुळे पंढरपूरमध्ये पूजा करू दिली नाही, तेव्हा सुद्धा आंदोलनचं चालू होतं,(मराठा आरक्षण मोर्चा)रोज त्यांच्या बायकोचा आणि आईचा उद्धार होत होता, तेव्हा आपली राजकीय संस्कृती कुठे जाते?तो काळ आठवून बघा आणि स्वतःच्या मनाला एकदा विचारा की ते योग्य होत का?तेव्हा आपण विलक्षण आणि विशिष्ट जातीय अस्मितेला बांधल्या गेल्यामुळे ,विवेक, वापरून कामच करत नव्हतो.. जर आपण आपल्या चष्म्यातून एकच बाजू पाहणार असू तर आपल्याला एकच बाजू दिसेल ना? वास्तव आपण बघितलं पाहिजे.. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शिवसेना आणि संजय राऊत हे महाराष्ट्र धर्माची, संस्कृतीची आठवण करून देतात, बऱ्याच काही गोष्टी सांगतात, पण बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सभ्य आणि नितळ राजकीय संस्कृतीत काय भर घातली आहे नेमकी?बाळासाहेबांचे काम आणि त्यांचे महत्व महाराष्ट्र जाणतो पण जर राजकीय संस्कृतीची गोष्ट असेल तर बाळासाहेबांनी आणि शिवसेनेने कायमच उग्र आणि हिंसेचे राजकारण केले आहे, बाळासाहेबांची भाषणातील भाषा, असो की लेख बऱ्याचदा ते शिवराळ भाषेत लिहीत, कदाचित तेच पुढे राऊत चालवत असावेत, पण रौतांनी हे विसरू नये की ते बाळासाहेब होते. पत्रकार निखिल वागळे, आचार्य अत्रे यांच्यासोबत शिवसेनेनं केलेले पराक्रम जगजाहीर आहेत, विरोधात लिहलं म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण अत्रे आणि वागळेंना झालेली आहे.
अत्रे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक मोठं नाव होते, त्या माणसाच्या उपकाराने महाराष्ट्राची निर्मिती झाली असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही, त्या व्यक्तीला शिव्या आणि चपला शिवसेनेनं दिलेल्या आहेत.. शिवसेना या पक्षाची वैचारिक रणनीती आणि नाव हे अत्रे यांनी 1962 ला सांगितले होते, पण ते काम ते करू शकले नाहीत पुढे याचाच आधार घेऊन1966 साली शिवसेना स्थापन
झाली.. म्हणजे अत्रे यांची संकल्पना घेतली, त्यांचं कार्य सुद्धा घेतलं तरी एकाही ठिकाणी त्यांचा फोटो आम्हाला दिसत नाही? ही आहे का महाराष्ट्राची राजकीय संस्कृती? आचार्य अत्रे यांनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर जेव्हा निपुत्रिक म्हणून टीका केली होती तेव्हा लगेच त्यांनी यशवंतराव चव्हाण यांची माफी मागीतली होती.. का कारण वयक्तिक स्वभाव आणि सामंजस्य.. आणि तत्कालीन राजकीय परिस्थिती जेथे खळलं खट्याक अजूनतरी चालू झालेलं नव्हतं.. महाराष्ट्राची राजकीय संस्कृती च्या नावाने असंख्य पापे आणि मुखवटे आज प्रत्येक पक्ष आणि काही नेते करतायत,ते अगदी तसच आहे जस एखादे कुटुंब आपल्या कुमारच्या हुष्यरक्या किंवा हुशारी लोकांना सांगण्यात धन्यता मानत असते, मुळात तो कुमार असतो अर्धवट बुद्धीचा आणि मूर्ख, पण आपली प्रतिष्ठा जपल्या जावी म्हणून आपल्या मुलाच्या हुशारक्या सांगत असतात.
राजधर्म या सदराखाली काही राजकीय आणि ऐतिहासिक लेख तुम्ही वाचू शकता.. त्यातला हा पहिला लेख
No comments:
Post a Comment