Monday, April 4, 2022

राज ठाकरे भाजप मध्ये विलीन झाले आहेत का? raj thackeray emerged his political party into bhajap (bjp).


(Blog ला नक्की follow करा)
जर राजकारणाकडे तुम्ही भावनिक नजरेने बघत असाल तर हा blog तुमच्यासाठी नाहीये..राजकारण हा एक पूर्णवेळ व्यवसाय आहे आणि आपण त्याचे भांडवल ही खूणगाठ एकदा पक्की आपल्या मनाशी बांधून घ्या.. आणि मार्गक्रमण करा.. आता मुद्याकडं येऊ.. राज यांनी भूमिका बदलल्याची खंत असण्याचे कारण नाही, महाराष्ट्रातील सगळ्या पक्षांनी भूमिका बदलल्या आहेत, तात्कालिक गरज म्हणून, खुद्द बाळासाहेब आणि पवार यांनी भूमिका बदलल्या आहेत. पाडव्याच्या भाषणात राज हे तडजोड करताय हे स्पष्ट दिसत होतं, त्यात आतून निघालेला आवाज आणि तळमळ नव्हती, तर एक गरज आणि अपरिहार्यता म्हणून केलेला रीतसर तह होता.. म्हणजे डील ओ.. दोन तीन वर्षाआधी त्यांनी ,घड्याळ, घालून आपला वेळ बघितला पण तो बदलला नाही..अगदी मोठ्यामोठ्या मुलाखती झाल्या, सभा झाल्या, मोदींना झाप-झाप झापल तरी सुद्धा घड्याळं काही आपलंसं म्हणायला तयार झालं नाही.. विचारसरणी बदलायची तयारी ही राज ठाकरे यांनी केली होती, पण तो मार्ग विस्कटलाच.
दुसरा मुद्दा म्हणजे राज यांनी संघटना बांधणी आणि इतर गोष्टी सध्या दुय्यम ठेवल्याचं दिसत आहे, मनसे ची ब्रँड किंमत ही स्वतः राज ठाकरे आहेत, आणि त्यांनी आता त्यातच गुंतवणूक करायचे ठरवले आहे.कालच्या भाषणात आपल्याला ते प्रकर्षाने जाणवले असेल, जर काही ठिकाणी सत्तेत वाटा मिळाला किंवा मोठ्या पक्षासोबत जाऊन जनाधार आणि संघटन ही वाढेल, असा विचार राज ठाकरे यांनी केलेला दिसतो. सत्ता आली तर पक्ष जगत असतो, टिकत असतो नाहीतर खंडणी आणि धमक्या देऊन पैसे मागावे लागतात, आणि ते ठाकरे यांना नको आहे. आणि जर नव्याने पक्ष संघटन उभारायचे असेल तर ते वेळखाऊ आणि ठाकरे यांच्या तापट स्वभावला साजेसं नाहीये.. त्यामुळे त्यांनी हा शॉर्टकट मारलेला दिसतो.

दोन ते तीन वर्षांपूर्वी जेव्हा मनसेचे अधिवेशन झाले, तेव्हाच त्यांनी भाजप चा झेंडा हाती घेतला होता, आठवा, भगव्या रंगाचा झेंडा, मोठा इव्हेंट आणि फडणवीस यांच्या झालेल्या सतत भेटी.. म्हणून राज यांनी काल केलेलं भाषण ही काही दोन दिवसात झालेली स्क्रिप्ट नाहीये, तर डायरेक्टर देवेंद्र फडणवीस हे गेल्या अनेक(दोन-तीन)त्या स्क्रिप्टवर काम करताय. भाजप ने ज्या अडचणी राज यांच्यासोबत जाण्यात सांगितल्या होत्या, त्या सगळ्या राज ठाकरे यांनी आपल्या पाडव्याच्या भाषणात स्पष्ट केल्या आहेत, जस की उत्तरप्रदेश च्या मुख्यमंत्र्यांची स्तुती, प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली टीका. जर सेनेचा मुकुटमणी, मुंबई, जर खाली खेचला तर शिवसेना खिळखिळ होईल हे फडणवीस यांना माहीत आहे, आणि या युतीचा तात्कालिक फायदा तोच आहे. जर राज यांचा पूर्ण महाराष्ट्रभर विचार केला तर सध्या तरी ते सेनेची जागा घेण्यास असमर्थ आहेत, हे स्पष्ट आहे. पण भाजप ने जर राज यांच्या रुपात आपला नैसर्गिक पार्टनर जर बघितला तर ती जोडी होण्याला वेळ लागेल.. आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेचे ग्रामीण भागातील कॅडर चांगले आहे.. त्यामुळे किल्ला खाली करायला वेळ तर नक्कीच लागणार आहे.. आणि फडणवीस यांचा स्वभाव बघितला तर ते कुणालाही डोक्यावर घेत नाहीत, त्यामुळे राज यांनी सुद्धा ते फक्त खांद्यावरच घेतील.


या नव्या प्रयोगात मनसेचा आणि भाजपचा सुद्धा फायदा आहे, मनसेत थोडा जीव येईल,आर्थिक परिस्थिती सुधारेल, चर्चा होईल, आणि जर मुंबईत सत्ता आलीच तर सत्तेत वाटा सुद्धा मिळेल.. पण जर दूरगामी परिणामाचा विचार केला तर सेनेला त्रास देण्यासाठी आणि मत फोडण्यासाठी राज यांचा फायदा भाजप नक्कीच घेईल.. पण किती दिवस सांभाळेल यात मात्र मला शंका आहे.(ब्लॉग ला follow करा.. आवडला तर कंमेंट्स नक्की करा).

3 comments:

Latest post

Vijay of tamilnadu politics.. (english translation of article written in 2024)

Vijay is a globally recognized artist from Tamil Nadu if you prefer, call him a hero. Now, he is becoming active in state politics. Just lik...